जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

अवकाळी नुकसान भरपाई महिनाभरात देणार-कृषीमंत्र्यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

“राज्य सरकारने केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे”-ना.अब्दुल सत्तार,कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, ‘महानंदा’चे चेअरमन राजेश परजणे,जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे,पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार,अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के,अरुण मुंढे,कृषी विभागाचे आयुक्त सुशिलकुमार चव्हाण,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,अ.नगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,’‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत.राज्य सरकारने केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर प्रसंगी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या आयोजना मागील भूमिका विशद केली.पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आपल्या मनोगतात जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराविषयी शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.यावेळी ‘पशुसंवर्धन दैनंदिनी’,‘योजनांच्या घडी पुस्तिका’ व ‘सुलभ शेळीपालन’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी केले आहे.अ.नगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे‌ यांनी आभार व्यक्त केले आहे.२५ व २६ मार्च २०२३ रोजी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close