कृषी विभाग
कोपरगाव तालुक्यात उद्या कृषी प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उद्या दि.२५ जानेवारी रोजी केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पी.एम.एफ.एम.ई.)या योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर दुपारी ०३ वाजता कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे जवळके बहादरपूर रोडलगत ठेवले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.
संकल्पित छायाचित्र.
कृषी क्षेत्रात विशेष संशोधन आणि विकास या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे.कृषी विभागाने फलोत्पादन विषयक अनेक योजना राबविल्या आहेत.परिणामी,राज्यामध्ये विपुल प्रमाणात फळ भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे.नाशिवंत मालावर विविध प्रक्रिया करून त्याची साठवणूक व विक्री व्यवस्थेचे सक्षम असे जाळे निर्माण केल्यास देशात व परकीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहे.त्याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे हे शिबिर आयोजित केले आहे”-मनोज सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,कृषी विभाग कोपरगाव.
देशात शेतीमालाचे उत्पादन वाढत आहे.त्यामुळे काढणीपश्चात किंवा अन्न प्रक्रिया क्रांती आणि मूल्यवर्धानाची गरज आहे.कृषी क्षेत्रात विशेष संशोधन आणि विकास या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे.कृषी विभागाने फलोत्पादन विषयक अनेक योजना राबविल्या आहेत.परिणामी,राज्यामध्ये विपुल प्रमाणात फळ भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे.नाशिवंत मालावर विविध प्रक्रिया करून त्याची साठवणूक व विक्री व्यवस्थेचे सक्षम असे जाळे निर्माण केल्यास देशात व परकीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहे.झपाट्याने बदलत चाललेल्या जनजीवन आणि राहणीमान यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ ही काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित केले आहे.त्यामुळे या शिबिराला महत्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उद्या दि.२५ जानेवारी रोजी केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पी.एम.एफ.एम.ई.)या योजनेअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम ठेवला आहे.ज्या इच्छुक शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी या कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम जवळके येथील प्रतिक रावसाहेब थोरात यांचे ‘साईकृपा वे ब्रिज’ बहादरपूर रोड येथे दुपारी ०३ वाजता संपन्न होणार आहे.याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोनवणे,कृषी सहाय्यक किशोर पिवळदकर यांनी शेवटी केले आहे.