जाहिरात-9423439946
कृषी विभाग

शेतकऱ्यांची सहनशीलता संपण्याआधी ऊस तोडून न्या-कोपरगावातून इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात अद्यापही हजारो टन ऊस गाळपाविना शिल्लक असून त्याचे रूपांतर खोडक्यात होऊ लागले आहे.या बाबत परीस्थिती गंभीर झाली असून दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची सहनशीलता संपण्याच्या आत हा ऊस त्वरित तोडून न्यावा अशी मागणी कोपरगाव येथील वकील संघाचे सदस्य अड्.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधिकडे केली आहे.

शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर उसतोडी अभावी आत्महत्या केली आहे.हि घटना ताजी असताना शेतकरी संघटनेने नुकतीच संघटनेचे उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथे ऊस परिषद घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली आहे.त्यांनी शिल्लक राहिलेल्या ऊसाला किमान एकरी एक लाख भरपाई द्यावी अशी मागणी करून शेतकऱ्यांना जागे केले आहे.त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे सहकारी कारखाना व्यवस्थापनास जाग आली असली तरी प्रश्न अद्याप सुटलेला नाही.मात्र याकडे लक्ष वेधून “आक्रोश” करण्याचे सोडून काही नेते भलतीकडे “कन्हकुद” करत आहेत”-अड्.योगेश खालकर,सदस्य कोपरगाव वकील संघ.

यावर्षीच्या हंगामात विक्रमी ऊस लागवड झाल्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात जटिल झाला आहे.उसाचा कालावधी संपल्यामुळे उसाला तुरे फुटून वजनात घट होत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे.बरेच कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी प्रयत्न करीत आहेत.मात्र यंदा उसाचे टिपरु ही गाळपा अभावी राहू देणार नाही.अशी भीमगर्जना उपमुखमंत्री अजित पवार यांनी केली आहे त्यांनी,”खाजगी तसेच सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत.तसेच मंत्रिमंडळ बैठक घेऊन अतिरिक्त ऊस गाळपासाठी वाहतूक अनुदान आणि साखर उतारा तुट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र तरीही हा प्रश्न सुटण्याची चिन्हे नाही.

राज्यात १९९ साखर कारखान्यांपैकी ७० कारखान्यांचा हंगाम बंद झाले आहेत,अजूनही शेतात एप्रिल महिन्याच्या अखेर ६५ ते ७० लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस कसा तोडून आणायचा याची डोकेदुखी यंदा कारखान्यांच्या शेतकी विभागाबरोबरच अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाला प्रचंड प्रमाणात झाली आहे.ऊस तोडणी कामगार मुकादम आणि शेतकरी यांचा मेळ कसा घालायचा,हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक सध्या ऊसतोड कामगारांकडून सर्रास लूट चालू आहे.अनेक शेतकऱ्यांना ऊस जाळून टाकण्याचा आत्मघातकी सल्ला दिला जात आहे.तशी तोड करण्यास हे मजूर तयार होत नाही.त्याला कारखाना व्यवस्थापनाची मूक संमती आहे की काय अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे.त्यामुळे कारखान्याच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी शेतकऱ्याचे वजनात जवळपास पंचवीस ते तीस टक्के घट होत आहे.या बाबत कारखाना व्यवस्थापनाने सोयीस्कर मौन पाळले आहे.अनेक ऊस क्षेत्रात उसास तुरे आले आहे.तुऱ्यामुळे ऊसास पोकळी निर्माण होऊन आधीच वीस ते पंचवीस टक्के घट झाली आहे.अवर्षण भागात उसाला पाणीच शिल्लक राहिले नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची अवस्था तर ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी झाली आहे.कारखाना व्यवस्थापणाने याबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.

शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर उसतोडी अभावी आत्महत्या केली आहे.हि घटना ताजी असताना शेतकरी संघटनेने नुकतीच संघटनेचे उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथे ऊस परिषद घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली आहे.त्यांनी शिल्लक राहिलेल्या ऊसाला किमान एकरी एक लाख भरपाई द्यावी अशी मागणी करून शेतकऱ्यांना जागे केले आहे.त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.सहकारी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आर्थिक जोखडात जेरबंद केल्याने त्यांच्यात आवाज उठवण्याची क्षमता शिल्लक राहिली नाही.

शेतकऱ्यांना साखर कारखान्यानी ऊस लागवडीस १२ ते १४ टक्क्यांनी कर्ज दिले आता हा ऊस गेला नाही तर कर्जफेड परत कशी करायची असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.याबाबत कारखानदारांनी भूमिका स्पष्ट करायला हवी.अन्यथा शेतकरी कर्जात बुडून मरतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकरी संघटनेच्या भूमिकेमुळे सहकारी कारखाना व्यवस्थापनास जाग आली असली तरी हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.मात्र याकडे लक्ष वेधून “आक्रोश” करण्याचे सोडून काही नेते भलतीकडे “कन्हकुद” करत आहेत असा त्यांनी टोलाही लगावला आहे.आपला ऊस नसला तरी शेतकऱ्यांच्या वेदना राजकीय नेत्याना समजत नसल्याने व त्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने आपल्याला हि भूमिका घ्यावी लागली असल्याचे कारण त्यांनी विषद केले आहे.

नगर जिल्ह्यातील २२ कारखान्यांपैकी ११ सहकारी व २ खासगी अशा १३ साखर कारखान्यांनी २६ एप्रिलपर्यंत १ कोटी २४ लाख ४८ हजार ७८६ मे टन उसाचे गाळप करून त्यापासून १ कोटी २१ लाख २४ हजार ४३३ साखर पोत्यांचे उत्पादन करून दैनंदिन साखर उतारा ११.६७ टक्के मिळविला आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात नेमका किती ऊस शिल्लक आहे हे माहिती मिळाली नाही.त्यामुळे कारखान्यांनी शिल्लक ऊस नवीन ‘ऊस तोडणी यंत्रे’ खरेदी करून निकाली काढावा अशी मागणी त्यांनी अड्.योगेश खालकर यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close