जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कांदा कसा साठवावा आणि टिकवावा ? -डॉ.वाघचौरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोरात चालू आहे.या हंगामातील कांदा साठवला जातो आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात तसेच आसपासच्या राष्ट्रांमध्ये पाठवला जातो.साठवलेल्या कांद्याला भाव निश्चितच चांगला मिळतो.केवळ गुणवत्ता असलेला कांदा चांगल्या भावाने विकला जातो.कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या सूचना इथे देत आहे.

“कांदा साठवणुकीसाठी कांद्याची चाळ सर्वप्रथम निर्जंतुक करून घ्यावी.परंपरागत विषारी कीटकनाशके चाळीत वापरू नये.मागील वर्षाचे खराब झालेले कांदे चाळीत असल्यास ते काढून टाकावे.चाळ स्वच्छ करून घ्यावी आणि चाळीमध्ये तळाला डेसिकेटर धुरळणी करावी तसेच टप्प्याटप्प्याने डेसिकेटर चा वापर करून कांदा सुकवून साठवावा.साधारणपणे एक टन कांद्यासाठी साडेसातशे ते ९०० ग्रॅम डेसिकेटर वापरून यशस्वी कांदा साठवणूक होते”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे.

कांदा काढताना शेवटचे पाणी ३० ते ४० टक्के कांद्याची पात पडण्याच्या आत द्यावे.यानंतर पाणी दिल्यास पाथ पडलेल्या कांद्याचे एक पाणी जास्त होते आणि असा कांदा पुढे साठवणुकीची लवकर खराब होतो. कांद्याची काढणी करत असताना त्याची शेतातच पोळी ने सुकवन केली जाते त्या पोळी मध्ये कांदे आणि माती मिश्रण करून टाकल्यास शेतातच कांदा खराब होतो आणि पुढे असा खराब कांदा साठवणूक की मध्ये चांगल्या कांद्याला खराब करतो. छोटा व अपरिपक्व कांदा वेगळा करावा. अपरिपकव कांदा चाळीत गेल्यास लवकर खराब होतो व त्यामुळे चांगला कांदा देखील खराब होतो.कांदाचाळी भरतांना त्यात अजिबात माती जाऊ देऊ नये.माती गेल्यास कांदा खराब होतो.चाळी मध्ये कांदा भरते वेळेस हाताळणी करताना करताना कांद्यास जखम होऊ देऊ नये.

जास्त जखमा झाल्यास कांदा खराब होतो तसेच दुभाळ कांदा आणि अपरिपक्व कांदा चाळीतगेल्यास त्यास कोंब फुटतात आणि तो पाणी सोडतो.त्यामुळे देखील कांदा सोडतो वरील सर्व उपाय योजना ह्या काटेकोरपणे कांदा साठवणूकी मध्ये महत्वाच्या ठरतात.कांदा शेतातच असताना तो शेतातच व्यवस्थित सुकला पाहिजे आणि चांगला सुकलेला,निवड केलेला कांदा साठवला गेला पाहिजे.कांदा जास्त उन्हामध्ये ठेवल्यास त्याचे वजन घटते त्यामुळे हवेशीर जागी सावलीमध्ये कांद्याच्या पोळी करून कांदा सुकवावा आणि आणि नंतर साठवा.

कांदा साठवणुकीसाठी कांद्याची चाळ सर्वप्रथम निर्जंतुक करून घ्यावी.परंपरागत विषारी कीटकनाशके चाळीत वापरू नये.मागील वर्षाचे खराब झालेले कांदे चाळीत असल्यास ते काढून टाकावे.चाळ स्वच्छ करून घ्यावी आणि चाळीमध्ये तळाला डेसिकेटर धुरळणी करावी तसेच टप्प्याटप्प्याने डेसिकेटर चा वापर करून कांदा सुकवून साठवावा.साधारणपणे एक टन कांद्यासाठी साडेसातशे ते ९०० ग्रॅम डेसिकेटर वापरून यशस्वी कांदा साठवणूक होते असे निष्कर्ष एन.एच.आर.डी.एफ.चितेगाव येथील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र येथील प्रयोगामध्ये आढळून आले आहे त्यामुळे विषमुक्त कांदा साठवणूक आता शक्य होत आहे. कांदा साठवणुकीच पेटंट नुकतंच लेखकाच्या नावे प्रकशित झाले आहे

वरील प्रमाणे महत्वाच्या बाबी कांदा साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील आणि हंगाम यशस्वी होण्यास मदत होईल ही रास्त अपेक्षा.

लेखक हे कोपरंगाव येथील रहिवासी असून आंतरराष्ट्रीय कीड रोग तज्ञ आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close