जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कृषी वीजग्राहक महावितरणचा थकबाकीदार नाही-…यांचे महावितरणला आव्हान

न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

राज्य विद्युत नियामक आयोगाने शेतीपंपासाठी ठरवून दिलेल्या विजदराच्या दोन तृतीयांश रक्कम शासनाकडून महावितरणला दिली जाते.उर्वरित एक तृतीयांश रक्कम शेती वीज ग्राहकांकडून विज बिल आकारणी केली जाते. म्हणजेच एकूण विजदराच्या ६७% रक्कम शासनाकडून महावितरणला कृषीपंप धारकांच्या वीज बिलापोटी जमा होत असल्याने कायद्याने शेती वीज ग्राहक महावितरणचा थकबाकीदार ठरत नाही. त्यामुळे थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून सुरू असलेली सक्तीची विजबिल वसुली मोहीम व त्यासाठी थेट विद्युत रोहित्रातून खंडित करण्यात येणारा शेतीचा वीजपुरवठा हा सर्व प्रकार बेकायदेशीर व मनमानी स्वरूपाचा असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे व जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांचेसह शेतकऱ्यांनी महावितरणला दिले आहे.

“विज प्रश्ना संदर्भात मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल पीआयएल क्र.४४/१२ मध्ये दि.७ फेब्रुवारी २०१३ रोजी महावितरणने शासनाकडून अनुदान मिळत असल्याचे मान्य करून त्या कारणास्तव परस्पर शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याबाबत आठवण करून दिली आहे.त्यामुळे हि वीज ऐन शेती हंगामात तोडणे शेतकऱ्यांवर अन्याय आहे”-बाळासाहेब पटारे.अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना.

या वेळी दिलेल्या निवेदनात,वीज कायद्यातील तरतुदीनुसार नियम ५६(१) नुसार १५ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिल्याशिवाय शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये असे आदेश उच्च न्यायालय मुंबई यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने दाखल रिट याचिका क्र.८६५१/१० मध्ये दिलेले असल्याचे निदर्शनास आणून देऊन विज प्रश्नासंदर्भातीलच मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल पीआयएल क्र.४४/१२ मध्ये दि.७ फेब्रुवारी २०१३ रोजी महावितरणने शासनाकडून अनुदान मिळत असल्याचे मान्य करून त्या कारणास्तव परस्पर शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याबाबत आठवण करून दिली आहे. दरवर्षी ऐन रब्बी हंगामातच शेतकऱ्यांना विजेची जास्त निकड असतानाच ठरवून जाणीवपूर्वक महावितरणची सक्तीची वीज बिल वसुली मोहीम सुरू होते.शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधींचे महावितरणला पाठबळ मिळत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी केला आहे.महावितरणने कायद्याने वागावे अन्यथा सर्व पातळीवर आंदोलनाचा लढा पुकारण्यात येईल असा इशारा महावितरणचे श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी श्रीरामपूर विभागाचे सहाय्यक अभियंता अक्षय विखे व संतोष कदम यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे,जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम,श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कदम,गंगाधर थोरात,बबन नन्नवरे, कैलास आबक,सुरेश आमले,नामदेव चौरे,राजीव उंडे,प्रमोद पाटील आदी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close