कृषी विभाग
संवत्सर येथे कृषी विभागाचा…हा कार्यक्रम संपन्न
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत कृषी दिन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यासाचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
दरवर्षी एक जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून ०१ जुलै ते ०७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी एक जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून ०१ जुलै ते ०७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्या पर्यंत पोहचवली जाते.त्यानिमित्ताने हा उपक्रंम संवत्सर येथे उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी शेतकरी बाळासाहेब रोहम,संदीप मैंद,बाबासाहेब खर्डे,चिमा दैने,संदीप रोहम,दिलीप आबक,जगनराव पेकले,रमेश गायकवाड व कृषि मित्र संभाजी भाकरे उपस्थित होते
सदर प्रसंगी तालुका कृषि अधिकारी कोपरगाव अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संवत्सर येथे कृषि संजीवनी सप्ताह व कृषि दिन निमित्त शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती दिली त्यात सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले व पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करून पेरणी करण्यास शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.बी.लागवड तंत्रज्ञान ( रुंदी वरंबा सरी तंत्रज्ञान ),१८ इंचावर सोयाबीन पेरणी,जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापरात १०% बचतीसाठी सेंद्रीय खत,कंपोस्ट खत,हिरवळीचे खत,गांडुळ खत यांचा वापर करणे,विकेल ते पिकेल,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड तसेच विविध विषयांवर कृषि सहाय्यक ए.पी.सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांचे कृषि मित्र संभाजी भाकरे यांनी आभार मानले आहे.