जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहराच्या विविध कामांसाठी पुन्हा निधी मंजूर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा ३९ कामांसाठी १५ कोटी निधी मंजूर करून आणला असल्याचा दावा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी केला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  

कोपरगांव नगरपालिका हद्दीतील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह बांधणे(०२ कोटी),माजी खा.कै.सूर्यभान पाटील वहाडणे सभागृह सुशोभीकरण करणे(२५लक्ष),कोपरगांव नगरपालिका प्रशासकीय इमारत विद्युत व्यवस्था व इतर सुविधा करणे (५०लक्ष),प्रभाग क्र.५ शनी मंदिर जवळील व्यायाम शाळा दुरुस्त करणे(२०लक्ष) असा ३९ कामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

कोपरगाव शहरात रस्ते आणि विविध कामांचा अनुशेष निर्माण झाला होता.त्या साठी सन-२०१९ सालच्या ऑक्टोबरच्या निवडणुकीत मतदारांनी आशुतोष काळे यांना आमदार म्हणून निवडून दिले होते त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळात गती दिली असल्याचे मानले जात आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले असल्याचे मानले जात आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीची आचार संहिता घोषणा होण्याच्या काही तास आधी त्यांनी शहरात आणखी निधी मंजूर केला असल्याचा दावा केला आहे.

  त्यात कोपरगाव शहराच्या विकासासाठी मिळणाऱ्या १५ कोटी निधीतून कोपरगांव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.२ मधील सुभद्रानगर येथील सर्व्हे नं.२०४/२९४ मध्ये सभामंडप बांधणे (१०लक्ष), प्रभाग क्र.५ मधील सि.स.न.९०६ मध्ये सभामंडप बांधणे (१५ लक्ष),कोपरगांव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.५ मधील सि.स.न.८८९ मध्ये सभामंडप बांधणे(१०लक्ष), प्रभाग क्र.९ मधील सर्व्हे नं.११८/२२ मध्ये सभामंडप बांधणे (१०लक्ष),प्रभाग क्र.१० मधील सर्व्हे नंबर ११२/१२ मध्ये सुशोभिकरण करणे(१०लक्ष), प्रभाग क्र. १३ मधील सर्व्हे नंबर १०५ मधील गजानन नगर भागात सभामंडप बांधणे(१५ लक्ष),

प्रभाग क्र.१३ मधील सर्व्हे नंबर १०५ मधील गोरोबा नगर भागात सभामंडप बांधणे(१०लक्ष), प्रभाग क्र.८ मधील सर्व्हे नंबर २१४ मध्ये सभामंडप बांधणे(१०लक्ष),प्रभाग क्र. १४ मधील सर्व्हे नंबर १०५ मधील गजानन नगर भागातील कब्रस्थान दुरुस्ती करणे(१५ लक्ष), प्रभाग क्र.५ मधील सर्व्हे नंबर २२१/२४/११५३ मध्ये सभामंडप बांधणे(१०लक्ष), प्रभाग क्र.५ मधील जिजामाता उद्यान विकसित करणे(५०लक्ष),प्रभाग क्र.४ मधील नगर मनमाड हायवे केबीपी विद्यालय ते स्टेशन रोड कडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता करणे(२०लक्ष),प्रभाग क्र.३ मधील साईबाबा कॉर्नर जवळील उद्यान विकसित करणे (०१कोटी),नगरपालिका हद्दीतील कोपरगांव शहरातील सर्व प्रमुख रस्ते सुशोभिकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे(०१.५० कोटी),प्रभाग क्र.११ व प्रभाग क्र. १३ मधील सोमासे घर ते गोरोबा मंदिर रस्ता करणे(४०लक्ष),प्रभाग क्र.९ व प्रभाग क्र.१० मधील मुख्य रस्ता करणे(५०लक्ष), प्रभाग क्र. १० मधील वाघ घर ते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे(६०लक्ष),प्रभाग क्र.२ मधील मार्केट कमिटी ते नगर मनमाड रस्ता करणे(७०लक्ष), प्रभाग क्र.४ मधील स्टेशन रोड ते महिला महाविद्यालय रस्ता करणे (४०लक्ष),कोपरगांव नगरपालिका हद्दीतील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह बांधणे(०२ कोटी),माजी खा.कै.सूर्यभान पाटील वहाडणे सभागृह सुशोभीकरण करणे(२५लक्ष),कोपरगांव नगरपालिका प्रशासकीय इमारत विद्युत व्यवस्था व इतर सुविधा करणे (५०लक्ष),प्रभाग क्र.५ शनी मंदिर जवळील व्यायाम शाळा दुरुस्त करणे(२०लक्ष), प्रभाग क्र.१४ मधील सि.स.नं.१६३३/११ मध्ये सुशोभिकरण करणे(१०लक्ष), प्रभाग क्र.१४ मधील सर्व्हे नं.८४ मध्ये सभामंडप बांधणे(०५ लक्ष), प्रभाग क्र.७ मधील सर्व्हे नं. १०९/१९६२ मध्ये सभामंडप बांधणे(१५लक्ष),कोपरगांव नगरपालिका हद्दीत हायमॅक्स बसविणे (८०लक्ष),प्रभाग क्र.२ मधील आढाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे(५०लक्ष),प्रभाग क्र.१ मधील साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सि.डी.वर्क सह रस्ता करणे (५०लक्ष),कोपरगांव नगरपरिषदेचे सर्व प्राथमिक विद्यालयाचे आधुनिकीकरण करून विकसित करणे (१.२० कोटी),प्रभाग क्र.१२ मधील मोरे घर ते दत्त मंदिर रस्ता करणे (३०लक्ष), प्रभाग क्र.४ मधील वडांगळे ते शेखर रहाणे घर रस्ता करणे (२०लक्ष),प्रभाग क्र.४ मधील सर्व्हे नं.१२ शारदानगर देवी मंदिरासाठी वालकंपाऊड करणे(१०लक्ष), प्रभाग क्र.७ मधील सर्व्हे नं. २१५ मध्ये सभामंडप बांधणे(१०लक्ष), प्रभाग क्र.४ मधील सातपुते घर ते घेमुड घर ते काळे घर रस्ता करणे(३०लक्ष), प्रभाग क्र.९ मधील गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे(३०लक्ष), प्रभाग क्र.१० मधील पटवर्धन घर ते आयडिया टॉवर पर्यंत भूमिगत गटार करणे(२०लक्ष),कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.४ कालिकानगर फरताळे दुकान ते सुकदेव कोळगे घर रस्ता करणे(२०लक्ष),प्रभाग क्र.१ खडकी येथे सामाजिक सभागृह बांधणे(१०लक्ष) असा एकूण १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close