कृषी विभाग
कीड नियंत्रण प्रात्यक्षिक संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर )
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालय लोणी येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील रोग व कीड नियंत्रणाची प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.
या वेळी सोयाबीनचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असे या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.यावेळी कृषी दूत आदित्य चेचरे,आहेर आदिश, संकेत बोरकर,निखिल कासलीवाल,संजय राऊत यांनी प्रात्यक्षिके करून दाखवले.यावेळी प्राध्यापक निलेश दळे,रमेश जाधव,अमोल खडके,प्राध्यापिका दीपाली तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी खंडाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत पदाधिकारी सोसायटीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.