कृषी विभाग
शिरसगाव येथे कपाशी शेतीशाळा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने क्रोपसप योजने अंतर्गत या खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांमध्ये की ड्रॉप खत पाणी व्यवस्थापन आदी विषयाबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पिकाची शेतीशाळा शिरसगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
या प्रसंगी शिरसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक उकिरडे, प्रगतशील शेतकरी शिवाजी जाधव,नंदू भागवत,अमोल भाऊ,गायकवाड,नितीन चौधरी,मोहम्मद भाई, प्रभाकर उकिरडे, पोलीस पाटील श्री साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी सी.एम.जवणे, कृषी पर्यवेक्षक सुनील गावित आदींनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले आहे.या शेतीशाळा वर्गामध्ये कापूस पिकाचे खत व्यवस्थापन,निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत,मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशीसाठी निंबोळी अर्काचा वापर तसेच विद्राव्य खतांचा वापर कापूस पिकामध्ये आंतरमशागत करताना सायकलच्या माध्यमातून केले जाणारे आंतरमशागत तसेच सापळा पिके धने,मका,ज्वारी त्याच्या लागवडीचे महत्व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे यांनी केले.कापूस पिकाबरोबरच सध्या शेतकरी प्रमुख समस्या असलेल्या सोयाबीनच्या पिवळेपणा घालवण्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्य विद्राव्य खताची फवारणी आधी विषयावर कृषी सहाय्यक सचिन शिंदे यांनी माहिती दिली व सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शेतीशाळा सदरा बद्दल शेतकरी बंधूंना माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंदात्मक उपायांचा वापर करत व सुरक्षित अंतराचे नियम पाळत शेतीशाळा घेण्यात आली या शेतीशाळेस परीसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.