जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कोपरगाव तालुक्यातील खत टंचाई दूर करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई जाणवत असून हि टंचाई दूर व्हावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकतीच केली आहे.या मागणीकडे लक्ष वेधल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शनिवार दि.१८ जुलै रोजी कोपरगाव तहसील कार्यालय येथे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आभासी यंत्रणेद्वारे कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला त्यावेळी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.यावेळी आ. काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची सदस्य स्थिती रुग्णांवर सुरु असलेले उपचार याची माहिती दिली.त्याचबरोबर मतदार संघातील अनेक समस्यांकडे देखील पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या युरिया खत टंचाई तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.

यावर्षी पर्जन्यमान चांगले होत असून शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतात पेरण्या केल्या आहेत. खरीप पिके प्रगतीपथावर आहेत. मात्र मतदार संघात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून शेतकऱ्यांना खतांच्या दुकानासमोर तासंतास उभे राहावे लागत आहे.खरीप पिकांना वेळेवर युरिया मिळाली नाही तर उत्पन्नात घट होवून नुकसान होवू शकते.त्यासाठी लवकरात लवकर युरिया खताचा साठा उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना याबाबत आदेश दिला असून कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेली युरिया टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले त्याबद्दल मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close