जाहिरात-9423439946
कृषी विभाग

रासायनिक खतांची लिंकिक थांबेना,शेतकरी हैराण !

न्यूजसेवा

कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)

  उत्तर नगर जिल्ह्यात रब्बी हंगाम जोरात असताना कंपन्या आणि विक्रेते यांनी संगनमत करून रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई केली असल्याने व लिंकिंग पद्धतीने डोके वर काढल्याने शेतकरी हैराण झाले असून आ.आशुतोष काळे यांच्या बैठकीनंतरही त्यात कोणताही फरक पडला असल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

  

  “खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी युरियाची गरज असताना शेतकऱ्यांना तो मिळेनासा झाला आहे.त्यात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.त्यातच लिंकिंग पद्धतीने डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.दुहेरी संकटात शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी कठोर कारवाई करणे अपेकक्षित आहे”-रमेश गायकवाड,शेतकरी संवत्सर,ता.कोपरगाव.

   कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया पुरवठा करणाऱ्या कंपन्यां आदींची दिनाक 08 जानेवारी रोजी गौतमनगर येथे संयुक्त बैठक घेतली होती.त्यात यांनी अधिकारी आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना,” कोणतीही कारणे सांगू नका,युरिया किती देणार ते सांगा”  अशी तंबी दिली होती.त्यावेळी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात ०२ हजार टन युरियाचा पुरवठा करणार असल्याची राणा भिमदेवी घोषणा केली होती.मात्र आता आठवडा उलटूनही त्यात कोणतेही बदल झाले असल्याचे दिसत नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आ.आशुतोष काळे यांनी कंपनी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांची घेतलेली बैठक.

  

“गेल्या महिनाभरापासून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात युरिया नसल्यामुळे माघारी परतावे लागत आहे.गहू,हरभरा,मका पिकांसह भाजीपाल्यास युरियाची आवश्यकता आहे.मात्र,दुकानात युरिया नसल्याने माघारी परतावे लागते.शासनाने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा”-चंद्रकांत नामदेव थोरात,प्रगतशील शेतकरी, जवळके,ता.कोपरगाव.

   दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने कोपरगाव तालुका कृषी कार्यालयात जाऊन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांची भेट घेतली असून याबाबत विचारणा केली आहे.त्यांनी या लिंकिंग बाबत दुजोरा दिला आहे.त्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या होत्या.त्यावेळी ही बाब आपण आ.काळे यांच्या लक्षात आणून दिल्यानेच त्यांनी अधिकारी आणि कंपन्याचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक गौतमनगर येथे आयोजित केली असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.व त्याबाबत अधिकाऱ्यांना आणि कंपनी प्रतिनिधींना स्पष्ट आदेश दिले होते.तालुक्याला रब्बी हंगामात एकूण 04 हजार मेट्रिक टन युरिया खतांची गरज आहे.त्यात आधी डिसेंबर 2025 मध्ये 01 हजार 776 मेट्रिक टन युरिया आली होती.त्यानंतर जानेवारीत 671 मेट्रिक टन युरिया आलेली आहे.तर आगामी काळात अजून 300- 350 मेट्रिक टन युरिया येणार असल्याची माहिती दिली आहे.



   दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जमिनीला पोत सुधारण्यासाठी नत्र,स्फूरद आणि पालाश गरजेचा असताना शेतकरी आपले रब्बीचे पीक वाढीसाठी एकतर्फी युरियाचा वापर करत असल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे.शिवाय जमिनीतील भूजल मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील भूजल पिण्याजोगे राहिलेले नाही हे वास्तव आहे.त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शेतकऱ्यांना नॅनो युरिया वापराचे आवाहन केलेले आहे.मात्र अजूनही शेतकऱ्यांत जागृती झालेली आढळून येत नाही परिणामी अद्याप शेतकरी पारंपरिक युरियाचा  मागणी करताना दिसत आहे.खत विक्री करणाऱ्या कंपन्याचा हा युरिया वापर कमी व्हावा व नॅनो युरियाचा वापर वाढवा यासाठी सरकारचा उपक्रम आहे.नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास नॅनो युरिया असे म्हटले जाते.पारंपरिक युरियाला नॅनो युरिया हा पर्याय होऊ शकेल आणि 50 टक्क्यांनी युरियाचा वापर कमी करू शकेल.नॅनो लिक्विड युरिया हे पूर्णपणे भारताने विकसित केलेले उत्पादन आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान द्रवरूप नॅनो युरिया दोन टप्प्यांत थेट पिकांच्या पानांवर फवारता येणार आहे.परिणामी पिकांना पूर्वीसारखे जमिनीतून युरिया पोहोचविण्याची गरज उरणार नाही.द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात.त्यामुळे भूजल प्रदूषित होत नाहीच पण जमिनीत मिसळले जात नाही.परिणामी जमिनीचा पोत सुस्थितीत राहतो.मात्र अद्याप शेतकऱ्यांत याची जागृती असल्याचे दिसून येत नाही परिणामी यासंधीचा गैरफायदा घेत आहेत.त्याचाच गैरफायदा कंपन्या आणि त्यांचे विक्रेते घेताना दिसत आहे.परिणामी त्यांचे अलबेल सुरू असून ते लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जुमेनासे झाले असल्याचे दिसून येत आहे.याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांत गावोगाव जागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करणे गरजेचे बनले आहे.याबाबत लोकप्रतिनिधी आणि कृषी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close