जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या ठिकाणी शेतकरी संघटनेचा मेळावा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी या ठिकाणी हनुमान मंदिराजवळ राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा व नामफलक अनावरण सोहळा येत्या रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वा.संपन्न होत असून वाकडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शेळके यांनी केले आहे.

  

शेतकऱ्यानां सपुर्ण कर्ज माफी करून सातबारा कोरा करावा,ऊसाला प्रतिटन ३,५५० रुपये पहिली उचल मिळावी,खरीप हंगामातील सोयाबीन,कापुस,मका, फळबागा,ऊस व इतर पिक विमा तातडीने शेतकऱ्याच्या बैंक खात्यात जमा करावा,दुधाला प्रती लिटर ५० रूपये दर मिळावा,शेती औजारे ठिबक सिंचन,स्प्रिंकलर यांचे अनुदान तातडीने बँक खात्यात जमा करावे आदी मागण्या करण्यात येणार आहे.

   भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे.त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे.भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे;म्हणून त्यांचे स्वास्थ्य व हित जपणारी शरद जोशी यांनी स्थापन केलेली संघटना ही काळाची गरज ठरली आहे.भारतातील शेतकरी चळवळ व आंदोलनांना स्वातंत्र्यपूर्व काळात जहागीरदार व जमीनदार यांच्या विरोधाची तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूध व शेतमालाला योग्य भाव आणि कर्जासारख्या सरकारसंचालित विषयांची पार्श्वभूमी आहे. ब्रिटिश राजवटीत देशावर प्रथमच एकछत्री अंमल निर्माण झाला.त्यापूर्वी देशात सरंजामशाही व राजे-रजवाडे आणि संस्थानिकांची सत्ता होती.आता लोकशाहीतील कायदेशीर चाकोरीत निर्माण झालेले जहागिरदार आणि साखर कारखानदार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडले आहे.

  

शेतकऱ्यांनी निवडणून दिलेले साखर कारखानदार आज शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत.ऊस,आणि खरीप रब्बी पिकांना उत्पादन आधारित किंमत मिळतं नाही.त्यामुळे शेतकरी नागवला गेला आहे.मात्र निवडणुका आल्या की साखर सम्राटांना आणि आधुनिक जहागिरदारांना शेतकऱ्यांची आठवण होत आहे.त्यांना वेळीच ठेचले तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.

   शेतकऱ्यांनी निवडणून दिलेले साखर कारखानदार आज शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत.ऊस,आणि खरीप रब्बी पिकांना उत्पादन आधारित किंमत मिळतं नाही.त्यामुळे शेतकरी नागवला गेला आहे.मात्र निवडणुका आल्या की साखर सम्राटांना आणि आधुनिक जहागिरदारांना शेतकऱ्यांची आठवण होत आहे.त्यांना वेळीच ठेचले तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना संघटीत करण्यासाठी वाकडी या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  सदर मेळाव्यात शेतकऱ्यानां सपुर्ण कर्ज माफी करून सातबारा कोरा करावा,ऊसाला प्रतिटन ३,५५० रुपये पहिली उचल मिळावी,खरीप हंगामातील सोयाबीन,कापुस,मका, फळबागा,ऊस व इतर पिक विमा तातडीने शेतकऱ्याच्या बैंक खात्यात जमा करावा,दुधाला प्रती लिटर ५० रूपये दर मिळावा,शेती औजारे ठिबक सिंचन,स्प्रिंकलर यांचे अनुदान तातडीने बँक खात्यात जमा करावे,जलसंपदा विभाग व पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी वाढीव पाणीपट्टी कमी करावी,निळवंडे कालवे लाभक्षेत्रातील प्रलंबित चाऱ्याची कामे तातडीने सुरू करावी,श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील शेतकन्यांच्या अकारी पडीत जमीन शेतकऱ्यांच्या वारसाला देण्यात यावी,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा,शेतमालाची निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी,शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा,साखर कारखान्याने ऊस बिलातून कुठल्याही बँकेचे कर्ज वसूली करु नये कारण जून २०२६ मध्ये कर्ज मुक्ती होणार आहे आदी मागण्या करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close