कृषी विभाग
…या सबस्टेशनवरून वाकडीस वीज पुरवठा करा-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाकडी गावातील ३३ केव्ही सबस्टेशनला श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या २२० केव्हीच्या सबस्टेशनला जोडण्यात येवून वाकडी सबस्टेशनमध्ये ५ एम.व्ही.ए.क्षमतेचा आणखी एक ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा.तसेच वीज तुटवडा असतांना जोपर्यंत २२० के.व्ही. सबस्टेशनचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत चितळी डिस्टीलरीला वाकडी सबस्टेशनवरून वीज पुरवठा जोडू नये अशी मागणी वाकडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आण्णासाहेब कोते यांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे जनता दरबारात केली आहे.

बाभळेश्वर येथून वाकडीकडे होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाने होत आहे.बाभबळेश्वर येथून ३३ केव्ही क्षमतेने येणारी वीज वाकडी सबस्टेशन पर्यंत पोहोचेपर्यंत वीज गळती होवून ती क्षमता ३३ के.व्ही.वरून २६ के.व्ही.होते.यामध्ये तब्बल सात केव्हीची तफावत होत असल्यामुळे ७ केव्ही वीजेच्या दाबाचा पुरवठा कमी होवून त्याचा परीणाम वीज पुरवठ्यावर होतो.
आ.आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात आण्णासाहेब कोते यांनी कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी,चितळी,जळगाव,धनगरवाडी आदी गावातील शेतकरी व नागरीकांच्या वतीने विजेचा प्रश्न मांडला.वाकडी सबस्टेशन वरून चितळी-जळगाव-धनगरवाडी एकूण चार गावांना व परीसराला विज पुरवठा केला जातो.वाकडी सबस्टेशनला बाभळेश्वर येथून ३३ केव्हीच्या दाबाने वीज पुरवठा केला जात आहे.बाभळेश्वर ते वाकडी २७ किलोमीटर अंतर असल्यामुळे बाभळेश्वर येथून वाकडीकडे होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाने होत आहे.बाभबळेश्वर येथून ३३ केव्ही क्षमतेने येणारी वीज वाकडी सबस्टेशन पर्यंत पोहोचेपर्यंत वीज गळती होवून ती क्षमता ३३ के.व्ही.वरून २६ के.व्ही.होते.यामध्ये तब्बल सात केव्हीची तफावत होत असल्यामुळे ७ केव्ही वीजेच्या दाबाचा पुरवठा कमी होवून त्याचा परीणाम वीज पुरवठ्यावर होतो.वाकडी सबस्टेशन वरील विजेचा दाब कमी होऊन चितळी-जळगाव-धनगरवाडी आदी गावांना वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी व वीज ग्राहक त्रस्थ झाले आहेत.
वाकडी सबस्टेशनच्या अंतर्गत सद्यस्थितीत वाकडी गावात पाच केव्हीचे एकच ट्रान्सफॉर्मर आहे.परंतु अजून एका पाच केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरची गरज आहे.पाच के.व्ही.चा एक ट्रान्सफॉर्मर बसवील्यास चार गावांना विजेच्या भारनियमाचा त्रास सहन करावा लागणार नाही.वाकडी सबस्टेशनवरून वीज वितरण करतांना अडचणी येतात अनेकदा शेतीला पाणी भरण्याच्या वेळीच विजेचा लपंडाव सुरु होतो. श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नव्याने २२० केव्ही क्षमतेचे सबस्टेशन उभारले जाणार आहे. त्याबाबतच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
श्रीरामपूर एमआयडीसी येथून वाकडी सबस्टेशनला वीज पुरवठा केल्यास जवळपास २७ किलोमीटरवरून होणारा वीजपुरवठा हा केवळ सात किलोमीटर होवून होणारी वीजगळती निश्चीतपणे कमी होवून चितळी, जळगाव, धनगरवाडी आदी गावांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.त्यासाठी वाकडी सबस्टेशन श्रीरामपूर एमआयडीसी २२० केव्ही स्टेशनला जोडून चितळी-जळगाव-धनगरवाडी एकूण चार गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणीकोते यांनी आ.काळे यांच्याकडे केली असता त्यांनी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.