जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

जमिनीचा पोत टिकविण्यासाठी सूक्ष्म सिंचन गरजेचे-..यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ऊस पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे.त्यासाठी सूक्ष्मसिंचनाचा वापर फायद्याचा ठरतो आहे.त्यासाठी शेतकऱ्यानी जास्तीत जास्त ठिबक जलसिंचनाचा वापर करावा असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचे माजी शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपल्या देशात दर दोन वर्षाने अवर्षण परिस्थिती निर्माण होणे नित्याचे झाले आहे अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर ठिबक व तुषार सिंचनद्वारे होईल.जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होणे गरजेचे आहे,शेतकऱ्यांनी कारखाना नर्सरीत तयार होणारे पायाभुत ऊस बियाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा”-सुनील कोल्हे,कार्यकारी संचालक,कर्मवीर काळे सहकारी कारखाना,गौतमनगर.

राज्यातील ऊस उत्पादनात सातत्याने घट होत असून ऊस वाढीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळावे यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना येथे उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे यांनी केले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोवर्धन परजणे, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम,सूर्यभान कोळपे,अनिल कदम,श्रीराम राजेभोसले,शिवाजी घुले,सुनील माळी, शंकरराव चव्हाण,श्रावण आसने,सुरेश जाधव माजी संचालक बाळासाहेब बारहाते,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,प्रगतीशील शेतकरी विजय जाधव,चंद्रशेखर देशमुख,राजेंद्र खिलारी,शिरीष लोहकणे,नारायण होन व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संतोष शिरसाठ,शेतकी अधिकारी कैलास कापसे आदी मान्यवरांसह व ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना अरुण देशमुख म्हणाले की,”ऊस उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताबरोबरच जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढविणे आवश्यक आहे.दिवसेदिवंस जमिनीची सामु व क्षारता वाढत आहे.त्यामुळे उत्पादकता कमी झाली असून ऊस पिकाला उत्पादन वाढविणेसाठी ठिबक सिंचनाचा वापर फायद्याचा आहे.कमी पाण्यात अधिकचे उत्पादन मिळविण्यासाठी खत मात्राच्या बचतीसाठी ठिबक शेती खात्रीचा मार्ग असुन त्यांचा अवलंब करावा.शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.ठिबक सिंचनाची सुरवात हि इस्त्रायल सारख्या देशात झाली.पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असणाऱ्या इस्त्रायल देशाने कृषी क्षेत्रात सर्वात मोठी भरारी घेतली आहे.त्याचे महत्वाचे कारण आहे.पाण्याचा काटकसरीने केलेला वापर आपल्या देशात सुध्दा इस्त्रायल तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसुन पाणी योग्य प्रमाणात व वेळेत देणे गरजेचे आहे.ऊस पिकास वेळोवेळी व प्रमाणशीर पद्धतीने रासायनिक व जैविक खते सुध्दा ठिबक सिंचनाने शक्य होते.ऊस शेती जगवायची असेल तर ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही.या शेतकरी मेळाव्यात जय गुरुदेव इरिगेशन प्रतिनिधी भाऊसाहेब मोरे व त्यांच्या सहकारी यांनी नेटाफिम कंपनीनेचे ठिबक संचाची माहिती करुन दिली तसेच शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पध्दतीने पाण्याच्या बचतीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून दाखविले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे.तर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी कैलास कापसे यांनी कारखान्याचे ऊस विकास योजनांची माहिती देवून कारखाना राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप रोहोम यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close