कृषी विभाग
अवकाळी नुकसान भरपाईसाठी कोपरगावात आंदोलन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात जून ते ऑगष्ट २०२२ दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.तालुक्यातील पाच मंडलापैकी सुरेगाव आणि पोहेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असून उर्वरित तीन मंडळातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने अंगठा दाखवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांत अच्छि-खांसी नाराजी आहे.त्यामुळे सदर भरपाई तात्काळ मिळावी यासाठी कोपरगाव तहसील समोर येत्या ३१ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्ते प्रवीण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री यांनी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यात जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग केली असली तरी अद्याप ६० टक्के शेतकरी बाकी असल्याचा आरोप आहे.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्यांना आपले नाक खाजवून दाखवले आहे त्यामुळे हा संताप व्यक्त होत आहे.
कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागालाही वादळ आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला होता.अनेक गांवांमध्ये फळबागांचे क्षेत्र मोठे आहे.आंबा,पेरु,डाळींब,चिक्कू अशा फळबागांसह शेतात भाजीपाला व उन्हाळी पिके वर्तमानात उभी होती.या भागात साधारणपणे ०७ जूनच्या नंतर पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते,परंतु यावर्षी आठ दिवस आधीच अवकाळी पावसाला प्रारंभ झाला होता.हा राडा साधारण ऑगष्ट पर्यंत कायम होता.पाऊस आणि वादळाची तीव्रता इतकी प्रचंड होती की,काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते.विविध फळांचा झाडाखाली अक्षरशः खच पडला असून द्राक्षे,चिक्कू,डाळींबाच्या बागाही त्यातून सुटल्या नाहीत,अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतलेली होती.परंतु भाजीपाला पिकांसह उन्हाळी पिके देखील वादळामुळे नष्ट झाली होती.हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीत हिरावून गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला होता.मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले होते.तर अनेक ठिकाणच्या घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेली होते.घरांचेही मोठे नुकसान झाले होते.त्यावेळी सरकारने नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याची घोषणा केली होती व त्या नुसार पंचनामे केले होते.त्या नुसार राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मदत देण्याची घोषणा केली होती.
त्यात जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा तत्कालीन कृषी मंत्री सत्तार यांनी केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी (शासन निर्णय क्रं.सी.एल.एस.प्र.क्रं.२९७ म.-३)घोषणा केली होती.त्या नुसार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली असल्याचे सांगितले असले तरी त्यातील ६० टक्के शेतकरी बाकी असल्याची माहिती आहे.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्यांना आपले नाक खाजवून दाखवले असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.
दरम्यान सरकारने दि.२२ जून २०२३ रोजी दुसरा शासन आदेश (क्रं.सी.एल.एस.२०२३ प्र.क्रं.५२,म-३) अन्वये काढला असून त्यात नुकसान भरपाई साठी जास्तीत जास्त हेक्टरी १७ हजार रुपयांची रक्कम निश्चित केली आहे.त्यात फळबागा आणि ऊस क्षेत्र वगळले आहे.त्यामुळे सरकारची नियत उघड झाली असल्याचा आरोप आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी अन्यायकारक रक्कम निश्चिती कमी केली असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.व त्यांनी शासनाने सापत्नपणा न करता पहिल्या आदेशा प्रमाणेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.व जो पर्यंत शासन शेतकऱ्यांना पूर्वाश्रमीची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करणार नाही तो पर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही असे जाहीर केले आहे.
सदर प्रसंगी शेतकरी नेते पद्मकांत कुदळे,कार्यकर्ते तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,विजय जाधव,सदाशिव रासकर,अनिल शेवते,श्री देवकर,आदी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.दरम्यान या आंदोलनामुळे तालुका प्रशासन हादरले आहे.