जाहिरात-9423439946
संपादकीय

गणेश निवडणुकीत भाजपमधील बंड पडणार महाग ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रंगात आली असताना सत्ताधारी महसूल मंत्री विखे यांचे गटा विरुद्ध भाजप (कोल्हे गट) व काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गट विरोधी ठाकले असून शेतकरी संघटनेने आपला स्वतंत्र पॅनल उभा केल्याने हि लढत आता तिरंगी होत असताना या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी (अभद्र) युती झाल्याने राज्यातील भाजप नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले असताना यात कोल्हे गटातील नेत्याविरुद्ध वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान भाजप हा पक्ष उत्तोरोतर मात्र शुक्ल पक्षातील चंद्रा प्रमाणे वाढत गेला आहे.कोणत्याही एकाधिकार राजवटीस ज्या प्रमाणे सर्व जनतेस सामावून घेण्याची गरज वाटत नाही तद्ववतच उत्तर नगर जिल्ह्यातील वर्तमान संस्थानिकांना महत्वाच्या निर्णयाबाबत वरिष्ठांना विश्वासात घेण्याची गरज वाटत नाही.एखाद्या निर्णयाची सांगोपांग चर्चा करून जनतेला किंवा कार्यकर्त्याना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे कधीच वाटत नाही.नेमकी इथेच भाजपची अडचण झाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक संपन्न होत असून याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे.हा सामना तिरंगी होत असून यात राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा जनसेवा,भाजपचे कट्टर विरोधक समजले जाणारे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळाचे विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी दंड थोपटले आहे.शेतकरी संघटनेचे ०७ उमेदवारांचा पॅनल रिंगणात आहे.तर कोल्हे गटाच्या एका उमेदवारांची वेळेत माघार न झाल्याने तो उमेदवारही अपक्ष म्हणुन रिंगणात आहे.१९ जागांसाठी ४७ उमेद्वार रिंगणात आहेत.हि निवडणूक आगामी शनिवार दि.१७ जून रोजी संपन्न होत आहे.मात्र या निवडणुकीत नेहमी प्रमाणे भाजप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे गटाचे विरुद्ध कोपरगाव तालुक्यातील त्यांचाच एक भाजपचा कोल्हे गटाच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा दुसरा गट उभा ठाकला आहे.हे सर्व नेते पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी हे सर्व वरिष्ठ नेते समजून घेत होते.पण ती काँग्रेस संस्कृती होती.त्यात ते अनेक दशके वरिष्ठ नेते दुर्लक्ष करून नाईलाजाने धकाधकी करताना होते.मात्र सन-२०१४ साली भाजप प्रबळ पक्ष म्हणून समोर आल्यावर व केंद्रातही या पक्षाची सत्ता आल्याने व हा पक्ष ‘शिस्तप्रिय पक्ष’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली असल्याने त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा पहिल्याच घासाला खडा लागावा अशी स्थिती ओढवली आहे.या सहकारातील नेत्याना हि सवय अंगवळणी पडलेली असली तरी भाजप सारख्या शिस्तीच्या पक्षात मात्र हि सर्व वल्कले त्यांनी त्याच पक्षात सोडून येणे अभिप्रेत असताना त्यांनी आपल्या काँग्रेसी सवयी आपल्या बरोबर आणल्या आहेत.शूद्र हेतूने केलेले उद्योगाचा शेवट देखील क्षुद्र होतो हा इतिहास असताना त्यांना सांगायचे कोणी असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्याच पक्षात राहून वरचढ ठरायला नको यासाठी पक्षांतर्गत विरोधकांचे पाय छाटण्याचे उद्योग या मंडळींना नवा नाही.प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीत तो वरिष्ठ नेत्याना दुर्गुण ठरू लागला आहे.कारण आगामी काळात महानगरपालिका,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समित्या आदींच्या निवडणुका संपन्न होणार आहे.त्या पाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा येत आहे.किंबहुना त्या एकाच वेळी होऊ शकतात अशा वेळी राज्यात हि,काँग्रेसची लस’ पसरली तर राज्यातील अन्य नेत्याना आणि कार्यकर्त्याना आवरायचं कसे ? असा सवाल निर्माण झाला आहे.भाजप मधील निर्णय प्रक्रिया नेमकी उलटी असून ते वरिष्ठ नेते मात्र भलतेच अस्वस्थ झाले आहे.

प्रत्येक राजकीय पक्षाची आपली विचारधारा असते.कार्यक्रम निश्चित असतात.मात्र सत्तेसाठी राजकीय पक्ष आपल्या निष्ठेला तिलांजली देताना दिसत आहेत.त्यात काँग्रेसी आणि राष्ट्रवादी यांची मोठी खासियत आहे.त्यांनी पक्षांतर करताना ‘ती’आपल्या सोबत आणली आहे.यशाचा शॉर्टकट सोपा असला तरी तो अल्पजीवी असतो हे सांगणे आज कार्यकर्त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्याना सांगणे आता कठीण बनले आहे.परिणामी भाजप मधील जुने निष्ठावान कार्यकर्ते बिघडले आहे किंवा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे राज्यात वेगळा संदेश जाण्याचा धोका आहे.त्यामुळे वरिष्ठ नेते नाराज झाले असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.वास्तविक हे सहकार चळवळीत मुरलेले नेते यांना पूर्वी काँग्रेस सारख्या पक्षाची गरज भासत होती कारण या पक्षाला जनतेचा मोठा जनाधार होता.मात्र उत्तोरोतर मात्र तो कमी झाला आहे.या काँग्रेसी नेत्यांनी आपले पक्ष आपले कपडे बदलावे अशे पक्ष बदलले आहेत.’कशाचा निष्ठा आणि कशाचे पक्ष’ हे नेते म्हणजे साखर आणि दारूच्या पैशावर स्वतःच पक्ष बनले आहेत.मात्र त्याची झळ आता भाजपाला बसू लागली आहे.विवेक कोल्हे यांनी तर गणेशच्या निवडणुकीत आडपडद्याने भाजप नेत्याना “आपण किंमत मोजायला तयार आहे” यासे म्हणून थेट आव्हान दिले आहे.त्यामुळे या अवस्थेत भर पडली आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ झाले आहे.

दरम्यान भाजप हा पक्ष उत्तोरोतर मात्र शुक्ल पक्षातील चंद्रा प्रमाणे वाढत गेला आहे.कोणत्याही एकाधिकार राजवटीस ज्या प्रमाणे सर्व जनतेस सामावून घेण्याची गरज वाटत नाही तद्ववतच उत्तर नगर जिल्ह्यातील वर्तमान संस्थानिकांना महत्वाच्या निर्णयाबाबत वरिष्ठांना विश्वासात घेण्याची गरज वाटत नाही.एखाद्या निर्णयाची सांगोपांग चर्चा करून जनतेला किंवा कार्यकर्त्याना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे कधीच वाटत नाही.नेमकी इथेच भाजपची अडचण झाली आहे.

मात्र सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला धोका दिल्याने त्यांना जादुई आकडा गाठता आला नाही पर्यायाने त्यांना अन्य पक्षाच्या नेत्यांच्या विशेषतः आपल्या बळावर निवडून येणाऱ्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पुढाऱ्यांच्या कुबड्या सत्तेचे सोपान चढण्यासाठी घ्याव्या लागल्या आहेत.मात्र ते येताना आपली काँग्रेसी संस्कृती विसलेले नाही ते भाजप मध्ये येताना ती घेऊन आले आहे.याचा विसर भाजप नेतृत्वास पडला होता.भाजपसाठी तत्व महत्वाचे ठरत आले आहे.मात्र पक्षात आलेले काँग्रेसी नेते आता मोठे दुखणे ठरत असल्याचे आ.राम शिंदे प्रकरणात उघड झाले आहे.भाजप मध्ये इतर नेत्याना घेताना त्यांना लगेच पदे देऊन नका असा इशारा प्रताप ढाकणे आणि राधाकृष्ण विखेंना घेताना निष्ठावान भाजप नेते विजय वहाडणे यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिला होता.मात्र त्याकडे तत्कालीन पालक मंत्री राम शिंदे आदी प्रभूतींना त्याचे चटके जाणवले नव्हते.मात्र सत्तेचे सोपान चढताना मात्र काँग्रेसी पुढारी या भाजप नेत्याना गोड वाटले मात्र आता त्यांचा जाच आता चांगलाच जाणवू लागला आहे.आपल्याच पक्षात राहून वरचढ ठरायला नको यासाठी पक्षांतर्गत विरोधकांचे पाय छाटण्याचे उद्योग या मंडळींना नवा नाही.प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीत तो वरिष्ठ नेत्याना दुर्गुण ठरू लागला आहे.कारण आगामी काळात महानगरपालिका,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समित्या आदींच्या निवडणुका संपन्न होणार आहे.त्या पाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा येत आहे.किंबहुना त्या एकाच वेळी होऊ शकतात अशा वेळी राज्यात हि,काँग्रेसची लस’ पसरली तर राज्यातील अन्य नेत्याना आणि कार्यकर्त्याना आवरायचं कसे ? असा सवाल निर्माण झाला आहे.भाजप मधील निर्णय प्रक्रिया नेमकी उलटी असून ते वरिष्ठ नेते मात्र भलतेच अस्वस्थ झाले आहे.परिणामस्वरूप आता या दुखण्याचा,’काटा उपट’ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आता या निवडणुकीत हा निर्णय होणार की हि निवडणूक झाल्यावर होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close