जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

…उलटा मामलेदार फौजदार को डांटे…!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील तहसीलदार विजय बोरुडे यांचा प्रताप जाहीर झाल्यानंतर या महाशयांनी आपल्या लाभार्थ्यांना कामाला लावून शहरात आपल्या सोयीने दोन तट पाडले असल्याचे दिसून येत असून त्यात आता नवनवी माहिती हाती येत असून त्यांनी कोपरगाव येथील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्याची धमकी दिली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे पण कहर तेंव्हा झाला जेंव्हा तालुक्यातील दोन राजकीय ध्रुवांना आपल्या निशाण्यावर घेतले आहे.या शिवाय माध्यम प्रतिनिधींनी बातम्या देऊ नये यासाठीही मोठ्या उठाठेवी केल्या असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आली असल्याने तालुक्यात एखादा अधिकारी कसा नसावा याचे उदाहरण निर्माण केले असल्याचे तालुक्यात मानले जात आहे.

मुळात मूळ घटनेनंतर लपून बसलेला अधिकारी रात्रभर कोणत्या हॉटेल मध्ये होता ? कोणाच्या संगतीत होता.त्याला एवढ्या रात्री कोणी देशी दारूचे दुकान उघडून मद्य पुरवले ? त्याचे सी.सी.टी.व्ही.फुटेज काढणे गरजेचे बनले आहे.सदर फुटेज पाहिले तर सदर घटना हि येवला नाका ते साईबाबा कॉर्नर याभोवतीच आढळण्याची शक्यता आहे.मग सर्व सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.त्यानंतर त्याच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या साजीद्यांना त्यांची जागा समजेल व ते पुन्हा डोके वर काढणार नाही असे दिसते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यामुळे या प्रकरणाने तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्यामुळे यावर मंथन होणे गरजेचे आहे.

दरम्यान दोन दिवसात सदर महाशयांनी आपल्या समर्थनार्थ आपले महसूल विभागातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी आणि त्यांचे हितचिंतक यांनाही कामाला लावून त्यासाठी स्वतः गायब होऊन आपला अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे.त्यात त्यांना तात्पुरता जामीन जिल्हा व सत्र न्यायालयायाने मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तथापि त्यात अजून कोपरगाव शहर पोलिसांचे म्हणणे गेलेले नाही.त्यामुळे पोलीस आणि चौकशी अधिकारी काय म्हणणे देणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.त्या नंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.व जामीनाचा प्रश्न खऱ्या अर्थाने निकाली निघणार आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी तहसीलदार यांना चौकशीसाठी आज पाचारण केले असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान या कोपरगावातील मामलेदाराचा मद्य प्राशन करून दोन्ही पोलीस ठाण्यात आणि आरोग्य विभागात केलेला अंमल तालुक्यात आणि जिल्ह्यातच चर्चेचा विषय ठरला आहे.हे आम्ही म्हणत नसून पोलीस ठाण्यातील आणि आरोग्य विभागातील दप्तर बोलत आहे.मात्र आरोपी चलाख आणि बौद्धिक पटात सरस असल्यावर काय होते ते वर्तमानात सर्व कोपरगावात शहरात दिसत आहे.
हिटलरने दुसऱ्या महायुद्धात आपला प्रसिद्धी प्रमुख म्हणून ‘जोसेफ गोबेल्स’ याची नेमणूक करून आपले महिमामंडन केले होते.त्याची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही,तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिलं जातं.असं म्हटलं जातं की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.”एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते.त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा.जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो,तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी.फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी.”याच तंत्राचा कोपरगावच्या अंमलदाराने प्रभावीपणे वापर केला असल्याचे प्रामुख्याने सांगितले पाहिजे.त्याने त्यासाठी आपल्या हाताखालील साजीद्यांना आणि आपल्या लाभार्थ्यांना हाताशी धरून आपले प्रताप झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.व आपण तालुक्यात मोठे काही तरी जनहितार्थ करत असल्याचा बडेजाव निर्माण करून आपले ‘महिमामंडन’ केले आहे.मात्र त्यासाठी दिड-दोन लाखांचा पगार घेतो हे सांगण्यास त्यांचे हे लाभार्थी सोयीस्कर विसरलेले दिसतात.विशेष म्हणजे त्यावर अनेकांचा विश्वास बसला आहे ! अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला आहे हे त्याहून विशेष ! अनेकांनी त्यासाठी दोन दिवस सामाजिक संकेतस्थळावर मोहीम चालवली असून त्यात वाळूचोरांचा समावेश आहे.यातच सर्व काही आले आहे.

कोणी एक महिला किरकोळ कारणासाठी थेट आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून घेणार नाही यावर विश्वास ठवायला हरकत नाही.कोणी अधिकारी कामावर नाही म्हणून तिची नोकरी जाण्याचा विषय नाही.जो हजर नाही त्याच्यावर कारवाई होईल.म्हणून कोण गैरहजर नोकराची वा अधिकाऱ्यांची नोकरी जाईल असे निदान लोकशाहीत तरी होणार नाही फार तर फार बदली होईल मात्र येथे महिलेवर मात्र संशय निर्माण केला जात आहे.त्यासाठी वेळ चुकीची निवडली आहे हे प्रामुख्याने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

दरम्यान या घटनेत हि बाब वाचकांनी समजून घेतली पाहिजे की,एखाद्या सामान्य माणसाच्या विरुद्ध,’ऍट्रॉसिटी’ किंवा ‘पोक्सो’विनय भंग आदींचा गुन्हा दाखल होतो तेंव्हा तो न्यायालयांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी चौकशी करूनच तो दाखल करावा लागत असतो.मग हि बाब जबाबदार अधिकाऱ्याला लागू होणारच हे सुर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे.असा विचार जनसामान्यांनी का करू नये. “एखाद्या महत्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या किंवा दंडाधिकाऱ्यांच्या विरुद्ध जेंव्हा एकदा गुन्हा दाखल होतो तेंव्हा त्या ठिकाणी वरिष्ठ महसुली आणि पोलीस अधिकारी ‘त्या’ घटनेची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय असा गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना परवानगी देणार नाही हे उघड आहे.कोपरगाव शहरातील दंडाधिकारी यांच्या बाबतीही ती घडली असणार यात शंका घेण्यास जागा फार कमी आहे.तरीही काही नेते आणि त्यांचे समर्थक या ‘ग्लोबेल्स’ तंत्रात सामील होत आहे हे आक्रीत मानले पाहिजे.ज्या नेत्यांना ज्या अधिकाऱ्याने थेट कोलून लावले त्यांचे समर्थन हे वरिष्ठ पदाधिकारी कसे करू शकतात ? हा संशोधनाचा विषय ठरावा.आज तर कहरच झाला असून सकाळी जेव्हा यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष,भाजपचे निष्ठावान आणि दिल्ली सारख्या ठिकाणी वरिष्ठ पदावर नेमणूक झालेले एक नेते आपल्या जातभाईंना घेऊन त्यात सहभागी झाले हे मात्र सदसद्विवेक जागृक असलेल्या मनाला वेदनादायी ठरले असल्यास कोणी वावगे मानून घेऊ नये.तालुक्यातील पश्चिम आणि ईशान्य गडावरील पुढाऱ्यांची गोष्टच काढायला नको ते तालुक्यात आहे का नाही हेच अशा बाबीत स्पष्ट होत नाही.नको त्यावेळी त्यांचा पुढाकार शिसारी आणणारा असतो आणि ज्यावेळी त्यांची समाजघटकांना आवश्यकता असते त्या नेमक्या वेळी तालुक्याच्या राजकीय आसमंतातून गायब होतात.जो अधिकारी थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा पाणउतारा करतो तरी ते गप्प बसत असतील तर त्यांचे अस्तित्व ते काय कामाचे असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक मानले पाहिजे असो.

आता विनयभंग झाला असा आरोप करणाऱ्या महिलेबाबत विचार करू.कोणी एक महिला किरकोळ कारणासाठी थेट आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून घेणार नाही यावर विश्वास ठवायला हरकत नाही.कोणी अधिकारी कामावर नाही म्हणून तिची नोकरी जाण्याचा विषय नाही.जो हजर नाही त्याच्यावर कारवाई होईल.म्हणून कोण गैरहजर नोकराची वा अधिकाऱ्यांची नोकरी जाईल असे निदान लोकशाहीत तरी होणार नाही फार तर फार बदली होईल.एरवी प्रत्येकाला सर्व शासकीय कार्यालयांत आता ‘बायोमेट्रिक हजेरी’ सक्तीची केली आहे हे सर्वांना माहिती आहे पण त्याचे किती पालन होते हे सर्वांना माहिती आहे.त्यामूळे सदर परीचारिकेची नोकरी जाईल किंवा जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नसताना ती कशाला कोणा अधिकाऱ्यांसाठी आपली इज्जत पणाला लावेल ? हा खरा प्रश्न.तरीही काही महाभाग यावर संशय व्यक्त करत आहे याला काय म्हणावे ?
मुळात सदर अधिकाऱ्याचे पद कोणते ? त्यांचे अधिकार कोणते ? त्यांची समाजातील प्रतिष्ठा कोणती ? त्यांचे समाजाप्रती दायित्व काय ? ते न समजता तो रात्रभर कोणत्या हॉटेल मध्ये होता ? कोणाच्या संगतीत होता.त्याला एवढ्या रात्री कोणी देशी दारूचे दुकान उघडून मद्य पुरवले ? त्याचे सी.सी.टी.व्ही.फुटेज काढणे गरजेचे बनले आहे.सदर फुटेज पाहिले तर सदर घटना हि येवला नाका ते साईबाबा कॉर्नर याभोवतीच आढळण्याची शक्यता आहे.मग सर्व सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.मात्र यावर संबंधित खात्याचे मंत्री,वरिष्ठ अधिकारी ‘च’ कार शब्द काढायला तयार नाही हे सर्व अजब मानले पाहिजे.

त्या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ प्रसारित होणाऱ्या पोस्ट मध्ये,”साहेब तुम्ही चुकलेच…! आरती ओवाळत,”साहेब’ प्रमोशनवर जाणार आहे.त्यामुळे त्यांना अडविण्यासाठी कोणी तरी हा डाव खेळला आहे.अशी हुशारी त्यात दाखवली आहे.साहेब पहाटे अनेक मोजण्या करतात…कर्तव्यदक्ष अधिकारी आहे..सत्य चपला घालत असताना खोटं गावभर फिरून येते वैगरे…वैगरे…हि पोस्ट एका वाळूचोरांची असल्याची नागरिकांत चर्चा आहे.यात मुळात प्रश्न निर्माण होतो की …या साहेबांना अडविणारा कोणी स्पर्धक तहसीलदार तालुक्यात असण्याची शक्यता फार कमी आहे.राजकीय नेता,कार्यकर्ता त्यात विघ्न आणू शकत नाही.मुळात ज्याचा स्वतःचा इंद्रियांवर ताबा नाही त्याने उगीच काळे कोळसे स्वतःच्या अंगावर उधळण्यासारखे हे आहे.त्यात उधळणाराचे तोंड काळे होते.अशीच काहीशी हि घटना दिसत असून याबाबत विनयभंगाचा खटल्याचा न्यायालय योग्य तो निवडा करीलच.त्यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा.

याच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाने व तेथील डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी,परिचारिका आदींनी आपले प्राण पणाला लावून ‘कोविड’ काळात हजारो नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले हे शहरातील विविध संघटना त्यांचे नेते,कार्यकर्ते आदींनी विसरता कामा नये.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारी कमी आहेत.बऱ्याच वेळा ते जागेवर नसतात.रात्री तर बऱ्याच वेळा त्याचा दाहक अनुभव असतो बऱ्याच वेळा तर आरोप करणारे नेते त्यांना दूरध्वनी करून बोलावून घेतात.आमदार,खासदार,नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक,आदींना माहिती नाही असे कोणी असेल तर त्यांनी जाहीर करावे.हे वास्तव कोण नाकारणार आहे.पण हे ओरडण्यास आता पदे गेल्यावर मुदत संपल्यावर वेळ सापडला का ? हे रुग्णालय पुराण संबंधित पदाधिकाऱ्यास माहित नव्हते असे नाही.मात्र त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची जी वेळ निवडली ती बऱ्याच अंशी संशय निर्माण करणारी आहे.याच ग्रामीण रुग्णालयाने व तेथील डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी,परिचारिका आदींनी आपले प्राण पणाला लावून ‘कोविड’ काळात हजारो नागरिक मृत्यूच्या दाढेतून काढले हे विसरता कामा नये.

दरम्यान या रात्री सदर अधिकारी कोणाचा वाढदिवस साजरा करत होता.त्यांच्या बरोबर अन्य ठिकाणचे कोण साथीदार होते. हे एकदा उघड झाले की सर्व काही स्पष्ट होईल.उगीच साप..साप.. म्हणून भुई बडविण्यात अर्थ नाही.मात्र ग्रामीण रुग्णालयावर प्रश्न उपस्थित करण्याची हि वेळ नाही.एका महिलेच्या इभ्रतीचा सवाल आहे.त्यामुळे आधी प्राधान्य तूम्ही कशाला देणार हा खरा प्रश्न आहे.आपल्याकडे एक म्हण आहे.”चोर फौजदार को डांटे”मात्र ती बदलून आता,”उलटा मामलेदार फौजदार को डांटे” अशी ती करायला हवी.जीवनातील सात सत्य असून त्यातील,”आरसा माणसाला खोटे बोलू देत नाही,ज्ञान माणसाला घाबरू देत नाही,अध्यात्म मोहपाशात अडकवत नाही”असे असताना या अधिकाऱ्यास लपून बसण्याची वेळ का आली.यातच सर्व काही आले आहे.खरे तर कोपरगाव हि दैत्याची भूमी होती.असे पुराणारून दिसते वर्तमानात ती आता देव भूमी ठरण्यास हरकत नाही पण पुन्हा पुन्हा असे दानव (अधिकारी ) या भूमीत प्रकट होत राहिल्यास व त्यांचे समर्थक पैदा होत राहिल्यास ती ‘दानव’ भूमी ठरेल हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांनी समोर अन्याय होत असताना महाभारतातील धुर्तराष्ट्र,गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधू नये हे उत्तम.व समोर घडणाऱ्या विदारक घटनांवर गप्प बसून भीष्माचार्य होण्याचे पाप करू नये इतकेच या निमित्ताने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close