जाहिरात-9423439946
संपादकीय

“देर आये,दुरुस्त आये !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

 
   कोपरगाव शहरात मागील दहा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली होती.त्यानंतर अनेकांनी आपली दुकाने थाटून अवैध व्यवसाय मोठ्या थाटात राजमान्यता असल्यासारखे सुरू ठेवले होते व आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही अशी भावना निर्माण झाली होती.त्यामुळे शहरात अनेक वेळा पोलिसांना हे पदाधिकारी दाद देत नव्हते.त्यामुळे आ.काळे यांना वरिष्ठ नेत्यांकडे धाव घ्यावी लागली होती.मात्र तरीही काहीच होत नसल्याने त्यांनी अखेर आपल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांच्या मुळावर घाव घातला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या कारवाईवर शहर आणि तालुक्यातील जनतेत “देर आये दुरुस्त आहे…” अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

कोपरगाव तालुक्यात वाळूचोर कोणाचे ऐकत नाही.त्यामुळे रस्त्याची वाट लागली हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.मात्र त्याला एकतर्फी वाळू चोर जबाबदार धरणे त्यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल.त्यांची एवढी मुजोरी उगीच वाढली नाही.त्यांचे प्रांत,तहसीलदार,मंडलाधिकारी,तलाठी यांना थेट हप्ते जातात.यावर ही लक्ष वेधून लोकप्रतिनिधीने मौन पाळावे याला काय म्हणणार ? शहर आणि तालुक्यात मटका,गुटखा आदींत अनेक पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध होते हे आधीच जगजाहीर होते.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारणी व कमिट्यांची स्थापना केली होती.त्यानंतर अनेकांनी त्यावर मांड ठोकली होती व अनेकांनी अवैध व्यवसाय वाढीस मदत केली होती.तर बहुतेक महाभागांनी पोलिस.लोकप्रतिनिधी आदींचे स्वीयसहाय्यक यांचेशी हात मिळवणी करून आपले अवैध धंदे मोठ्या टेचित सुरू ठेवले होते.त्यात लोकप्रतिंधींचे अनेक कर्मचारी सहभागी होते.त्यातूनच नवरात्र महोत्सवात मोठे कांड घडले होते.व थेट पोलिसांवर हात वर करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.त्यामुळे आ.काळे यांनी अनेक प्रयत्न करुनही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना अंगठा दाखवला होता.त्यामुळे त्या प्रकरणात त्यांची मोठी नाचक्की झाली होती.आता तर तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन आगामी 02 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.त्याची तारीख मुक्रर झाली आहे.

 

कोपरगाव तालुक्यातील अवैध व्यवसायाचे मूळ लोकप्रतिनिधी यांचे कार्यालयापासून सुरू होते हे येथे ध्यानी घेणे गरजेचे आहे.त्यामुळे कदाचित नगरपरिषद लोकप्रतिनिधींला गमावली लागली असे म्हटले तर अतिशयोक्ती अथवा वावगे वाटू नये.ही कृती नगरपरिषद निवडणुकी आधी केली असती तर कदाचित राजकीय चित्र वेगळे दिसले असते.ओमप्रकाश कोयते यांना माती खावी लागली नसती.आगामी काळात या अशा बदनाम कार्यकर्त्यांना आ.काळे यांना दूर ठेवणे उचित ठरणार आहे तरच आ.आशुतोष काळे यांचे भविष्य उज्ज्वल रहाणार आहे.

   दरम्यान अशातच शिर्डीत अवैध व्यवसायानी येथील पालकमंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर पश्नचिन्ह निर्माण केले होते.त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीचे पाळेमुळे उकरून टाकण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे.ती किती वास्तवात येईल हा संशोधनाचा विषय आहे.पूर्वी कोणा पाप्याने मोठे पुण्य करून शिर्डी शहर वेठीस धरले होते.एवढेच नाही तर साई संस्थानला शंभर कोटींचे दान देणाऱ्याचे खिसे मारण्याचे महान कर्म केले होते.दिवसाढवळ्या दोन दोन खून पडत होते.त्यावेळी कोणा तांबे-पितळ्या शिर्डी पोलिस अधिकाऱ्यास लोकप्रतिनिधींने हाताशी धरून शिर्डीवर दहशत बसवली होती.त्यावेळी पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी त्याची धिंड शहरात काढून ती मोडून काढली होती.त्याला हद्दपार करत नंतर त्यावर मोक्का लावला होता.त्यावेळी काही नेत्यांचे वाढदिवसाचे बॅनर झळकले होते.त्याच वेळी एका गुन्हेगाराने लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाचे मोठमोठे बॅनर लावून मोठा उत्सव साजरा केला होता.त्यावेळी योगायोगाने म्हणा की साडेसाती म्हणा एटीएस ने धाड टाकून यांना पहाटे त्या आरोपीस अटक केलं होती.त्यावेळी प्रस्थापित नेत्यांना ते बॅनर काढताकाढता नाकी नऊ आले होते.त्यांना त्याचा एवढ्या लवकर विसर पडेल असे वाटले नव्हते.त्यानंतरही एट्रोसिटीचा दुरुपयोग करून अनेक कार्यकर्त्यांना बडवून घेतले असल्याची उदाहरणे आहे.आता हीच मंडळी गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यास निघाली आहे हे विशेष !तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत बसलेल्या निळवंडे धरणाचे पाणी मागणाऱ्या निरापराध दुष्काळी निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला केला ही बाब फार जुनी नाही.श्रीरामपूर शहरात मागील महिन्यात झालेला गोळीबाराचे समर्थन केलं त्यात एकाचा बळी गेला आहे.ज्यांनी पूर्वी आणि वर्तमानात ज्याचे आपल्या युक्तीने नव्हे तर कृतीने समर्थन केले त्यांनी हा आव आणावा हे आणखी एक आक्रित आहे.

   कोपरगाव शहरात इतके नाही तरी आरोपींनी थेट एकमेकावर राजरोस गोळीबार करावे आणि पुरवठा विभागात आजही मोठा धिंगाणा सुरू असताना त्यावर आमच्या प्रतिनिधीने वारंवार लिहूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे याला काय म्हणावे ? तालुक्यात वाळूचोर कोणाचे ऐकत नाही.त्यामुळे रस्त्याची वाट लागली हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.मात्र त्याला एकतर्फी वाळू चोर जबाबदार धरणे त्यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल.त्यांची एवढी मुजोरी उगीच वाढली नाही.त्यांचे प्रांत,तहसीलदार,मंडलाधिकारी,तलाठी यांना थेट हप्ते जातात.यावर ही लक्ष वेधून लोकप्रतिनिधीने मौन पाळावे याला काय म्हणणार ? शहर आणि तालुक्यात मटका,गुटखा आदींत अनेक पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध होते हे जगजाहीर होते.मात्र मांजरच दूध डोळे झाकून पित असेल आणि त्याला आपणाला कोणी ही पाहत नाही असा आभास होत असेल तर त्याला काय करावे ? मात्र त्यातून काही नुकसान होणार नाही असा अनेक लोकप्रतिनिधींचा समज असावा त्यामुळे आधी काही कमी प्रमाणात वाढणारा अवैध व्यवसाय आता गळ्याशी आल्यावर आता आणि शेंडीवरून पाणी फिरल्यावर ही सुबुद्धी झाली असे म्हणावे लागेल दुसरे काय ? आता पर्यंत कोणीही नेता राज्याच्या व केंद्राच्या सत्तेत असताना आपल्या मतदार संघात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याचे उदाहरण नाही.त्यांनी आपल्या अधिकारी कक्षात याचा निपटारा केला असल्याचे आम्ही याची देही याच डोळा अनेकवेळा पाहिले आहे.मात्र असे आक्रित कोपरगाव नगरीत घडले आहे हे खरे.

   पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या घडल्या आहेत.अनेकांनी आपले जीवन संपवले आहे.पुरवठा विभागाच्या मालावर गुंड टोळ्या निर्माण झाल्या आहेत.त्या थेट गावठी कट्टे हाती घेऊन एकमेकावर गोळीबार करत आहे.एवढंच नाही तर हे गावठी कट्टे अनेक तलाठी आणि मंडळधिकारी विक्री करताना दिसून येत आहे.त्यामुळे अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.तरीही नेते गुमान गप्प बसत असतील तर या मतदार संघाला ब्रम्हदेव आला तरी वाचवू शकणार नाही.मागील वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले ही पुण्याई अर्थातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि त्यांनी पाठवलेल्या निरीक्षकांची आहे.त्यांनी येथे येऊन आयात भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना पाय देऊन हाकले होते.त्यामुळे सव्वा लाखांचे मताधिक्य मिळाले होते हे सर्वांना माहिती आहे.मात्र एखाद्याच्या नसलेले यश डोक्यात घुसले की त्याची धुंदी आणि भूत मानगुटीवरून उतरवणे अवघड जाते.त्यामुळे खाली सर्व काही अलबेल असे असा गोड समज पसरतो.कोपरगावात हिच बाब झाली आहे.त्यामुळे कार्यकर्ते चेकाळले होते.त्यांना कोणाचीही धाक उरला नव्हता.आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही हा समज पसरला होता.तो आता हे पदाधिकारी हटविल्याने दूर होण्यास मदत होणार आहे.याचे सर्व मूळ लोकप्रतिनिधी यांचे कार्यालयापासून सुरू होते हे येथे ध्यानी घेणे गरजेचे आहे.त्यामुळे कदाचित नगरपरिषद लोकप्रतिनिधींला गमावली लागली असे म्हटले तर अतिशयोक्ती अथवा वावगे वाटू नये.ही कृती नगरपरिषद निवडणुकी आधी केली असती तर कदाचित राजकीय चित्र वेगळे दिसले असते.आगामी काळात या अशा बदनाम कार्यकर्त्यांना आ.काळे यांना दूर ठेवणे उचित ठरणार आहे तरच आ.आशुतोष काळे यांचे भविष्य उज्ज्वल रहाणार आहे.त्यामुळे लोकप्रतिंधी,”दर आये दुरुस्त आये” म्हणणे संयुक्तिक ठरेल इतकेच…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close