जाहिरात-9423439946
संपादकीय

पदग्रहण समारंभाच्या,पहिल्याच घासाला खडा…!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  
  कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाचे पराग संधान यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या पदग्रहण समारंभासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असला तरी या पक्षीय कार्यक्रमाखेरीज कोपरगाव नगरपरिषदेत आधी सकाळी 11 वाजता नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांचा अधिकृत पदग्रहण सभारंभ झाला आहे.नेमक्या या पहिल्याच कार्यक्रमास आपल्याला डावलले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी केला असल्याने सत्ताधारी गटाची अवस्था पहिल्याच घासला खडा लागावा अशी झाली असल्याचे मानले जात आहे.

पदभार स्विकारताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान,विवेक कोल्हे,रेणुका कोल्हे,गटनेते प्रसाद आढाव आदी दिसत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,आधी आपण सर्वांना या पदग्रहण समारंभास बोलावले होते असा दावा केला होता.मात्र नंतर पुन्हा ‘यू’ टर्न घेऊन याबाबत अधिकची माहिती घेऊन तुम्हाला लगेच अपडेट कळवतो असे सांगितले आहे.मात्र त्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.

   कोपरगाव नगरपरिषद नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाला जवळपास नऊ वर्षांनी विजय मिळाला असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान व त्यांच्या १९ सहकाऱ्यांचा विजय महत्वाचा मानला जात असला तरी विरोधी आघाडीचे पन्नास टक्क्यांची घसघशीत वाढ करून 07 जागांवरून 11 व मुसंडी मारून जोरदार टक्कर दिली असल्याचे मानले जात आहे.सत्ताधारी गटाबरोबर चार शिवसेनेचे तर एक अपक्ष उमेदवार अशी आघाडी आहे.त्यामुळे सत्ताधारी भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.त्यातच आ.काळे गटाने या उमेदवारांना आपण पाचही वर्षे विषय समित्या आणि उपनगराध्यक्ष पदाची घासाची पेंढी पुढे केली असल्याचे आता या आघाडीतील नगरसेवकांची बार्गनिंग पॉवर वाढली असल्याचे मानले जात आहे.त्यातच एक नगरसेवकाने तर आपण,”किंग मेकर” असल्याचे फ्लेक्स आधीच सत्ताधारी वर्गाच्या नाकावर टिच्चून झळकावले आहे.त्यातच त्यांनी आपल्या सेवा शपथ सोहळ्यास पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पक्षांतर्गत विरोधक व विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांना बोलावून पालकमंत्री विखे यांना नाक खाजून दाखवले असल्याचे बोलले जात आहे.प्रा.राम.शिंदे यांनी याआधीच जिल्ह्याचे सूत्र आपल्या हाती नाही सर्व सूत्रे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यात असल्याचे सांगून आपली लक्ष्मणरेषा दाखवून दिली आहेच.त्यामुळे परिणामी माजी आ.कोल्हे गटाची खरी कसरत आगामी काळात दिसणार आहे.

तहसील मैदानावर पदग्रहण करताना दृश्य.

सोमवारी तहसील मैदानावर विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष पराग संधान यांनी,”आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणार असून नगरपरिषद ही सर्वांचे कुटुंब आणि सर्व नगरसेवक हे आमचे सदस्य म्हणून काम करणार” असल्याची ‘राणा भीमदेवी’ घोषणा केली होती.तिला छेद गेला असल्याचे दिसून आले आहे.

   मंत्री विखे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार पाडले त्यावेळी होते इतके सख्य आता राहिलेले नाही.विळ्या भोपळ्याचे नाते होऊ पाहत आहे.त्यातून पर्यायी मार्ग शोधून मंत्री विखे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जवळ केले असल्याचे मानले जात आहे.त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विवेक कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच प्रचार सभेत आ.काळे गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे (काका )यांचे निवडणुकीत उभे करणारे,’आका’ कोण आहेत आम्हाला माहिती आहे.त्यांचा आम्ही बंदोबस्त करू अशा दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या होत्या.त्या विखे यांना चांगल्याच झोंबल्या होत्या.त्यातून दोन्ही गटात चांगलीच सनसनाटी निर्माण झाली होती.यावर थांबले तर विखे कसे ? त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भर सभेत पालकमंत्री विखे यांनी थेट मुख्यमंत्री यांचे समोरच माजी आ.कोल्हे आणि त्यांचे सुपुत्र तथा युवराज यांना आका काय करू शकतात हे दाखवून द्यावे लागेल असा धमकीवजा सज्जड इशारा दिला होता.त्यावेळी मायलेकांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते.हे समस्त सभा आणि शहर वासियानी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते.मिडियाने याचे सर्वदूर वार्तांकन केले होते.त्यामुळे ही सभा राज्यभर विशेष गाजली म्हटले तर नवल नाही.आता पहिल्याच पदग्रहण समारंभात कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी आ.काळे गटाचे नगरसेवक यांना बोलवले नसल्याचा आरोप नूतन गटनेत्या गौरी पहाडे यांनी केला आहे.त्यामुळे आता आगामी काळात या चकमकी वेळोवेळी होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

  दरम्यान सोमवारी तहसील मैदानावर विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष पराग संधान यांनी,”आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणार असून नगरपरिषद ही सर्वांचे कुटुंब आणि सर्व नगरसेवक हे आमचे सदस्य म्हणून काम करणार” असल्याची ‘ राणा भीमदेवी’ घोषणा केली होती. त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच हा प्रकार समोर आला असल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

गौरी मंदार पहाडे,गटनेत्या,राष्ट्रवादी आ.काळे गट.

    दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,आधी आपण सर्वांना या पदग्रहण समारंभास बोलावले होते असा दावा केला होता.मात्र नंतर पुन्हा ‘यू’ टर्न घेऊन याबाबत अधिकची माहिती घेऊन तुम्हाला लगेच अपडेट कळवतो असे सांगितले आहे.त्यानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीस अधिकची माहिती दिली नसल्याने,”गड्या,पाणी कुठे तरी मूरत असल्याचे बोलले जात आहे.हा माजी आ.कोल्हे आणि आ.आशुतोष काळे या दोन्ही गटांच्या या शिमग्यात आणि दोन रेड्याच्या टकरीत शहराच्या विकासाला नख लागू देऊ नये अशी रास्त अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close