जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

“मोलें घातलें रडाया…॥

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या,’सचिन वॉच कंपनी’त राज रस्त्यावर भल्या पहाटे मोठी चोरी होऊन यात रोकड ०५ लाख रुपये तर ३५ लाख रुपयांची किंमती टायटन व टाइमेक्स घड्याळे आदीसंह जवळपास ५० लाख रुपयांचा माल लंपास करून चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिल्यानंतर आज व्यापारी महासंघाने बाहया सावरल्या असून आज पोलिस ठाण्यावर थेट मोर्चा आयोजित करून पोलिस अधिकाऱ्यांना चोरट्यांचा शोध लावण्याचे आवाहन केले असून चोरट्यांचा शोध न लगण्यास मोठे आंदोलन छेडू असा इशारा व्यापारी महसंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिला आहे.तर सायंकाळी ५.३० च्या सुमारास आ.आशुतोष काळे यांनी पोलिस ठाण्यात भेट घेऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.

   

महसूल विभागात सरासरी दोन-तीन महिन्यात लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी आढळत आहे.लाचलूचपत विभाग त्यांना बेड्या ठोकत आहेत.गोवंश हत्या तर नित्य पाचवीला पूजेला आहेत.श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी इशारा देऊनही गोहत्या बंद झालेली नाही आणि दक्षिण भारतात आपल्या काठी सर्वाधिक पवित्र तीर्थे असलेली गोदावरी नदी रक्तात रंगण्याची थांबलेली नाही हे विशेष !हे सर्व घडते आहे ते नगरपरिषद आणि पोलिसांच्या नाकाखाली.

  कोपरगाव शहर आणि तालुक्यात गंभीर गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे.मागील वर्षी शहरातील एक वकील,एक लेखापरीक्षक आणि एक डॉक्टर यांच्या एका रात्रीत तीन चारचाकी गाड्या (कार) चोरट्यांनी हातोहात लंपास केल्या होत्या.त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.अन्य चोऱ्या,अवैध व्यवसाय,पुरवठा विभागातील राजरोस धान्य चोरी,वाळूचोर आणि त्यात सामील गुंड पोलिस आणि महसूल विभागास वाकुल्या दाखवत आहेत.गावठी कट्टे तर किराणा दुकानात बिस्कीट पुडा सहज मिळावा असे सहज मिळत आहेत.या घटना पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये वाचावयास मिळत असत.पण त्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात आणि साखर पट्ट्यात आता सहज होत आहे.कोपरगाव शहर आणि तालुका त्याला अपवाद नाही.महसूल विभागात सरासरी दोन-तीन महिन्यात लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी आढळत आहे.लाचलूचपत विभाग त्यांना बेड्या ठोकत आहेत.गोवंश हत्या तर नित्य पाचवीला पूजेला आहेत.श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी इशारा देऊनही गोहत्या बंद झालेली नाही आणि दक्षिण भारतात आपल्या काठी सर्वाधिक पवित्र तीर्थे असलेली गोदावरी नदी रक्तात रंगण्याची थांबलेली नाही हे विशेष !हे सर्व घडते आहे ते नगरपरिषद आणि पोलिसांच्या नाकाखाली.लव्ह जिहाद हा आणखी एक रोग शहरात झपाट्याने पसरतो आहे.मात्र त्यावर बोलणे कोणी स्पष्टपणे बोलणे पसंत करत नाही.मात्र डोळे झाकल्याने वास्तव बदलणार नाही.याचे दाहक चटके बसल्यावर शहर आणि तालुक्यातील अन्य लोक जागे होतील त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल.काही महिन्यांपूर्वी मळेगाव थडी येथे रात्री अज्ञात इसमाने खोड करून मुस्लिमांच्या पवित्र कुराणाच्या पानांची प्रत रस्त्यावर फेकली होती.त्या आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही.आपेगाव येथे काही वर्षापूर्वी वृध्द दाम्पत्याच्या खून त्यांच्याच विहिरीचे काम करणाऱ्या मजुरांनी केला होता.कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपीनी चोरी करताना तीन जणांची निर्घृण हत्या करून अवघे पंधरा दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी कोपरगाव शहराला आपली लीला दाखवली असून पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अहिंसा स्तंभाजवळ पश्चिमेस असलेल्या,’सचिन वॉच कंपनी’तील तब्बल ०५ लाखांची रोकड तर ३५ लाख रुपयांची किंमती टायटन व टाइमेक्स घड्याळे आदीसंह जवळपास ४० लाख (वास्तव मात्र पन्नास लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे) रुपयांचा माल पोलिसांच्या नाकाखालून लंपास माल करून पोलिसांना थेट आव्हान दिले आहे.हा प्रकार शनिवार दि.१९ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजेच्या सुमारास घडला असून या गुन्ह्यात जवळपास ७-८ तरुण चोरटे सामील असल्याचे चलचीत्रणात उघड झाले आहे.दरम्यान छ्त्रपती संभाजीनगर मध्ये आठ दिवसापूर्वी असाच गुन्हा घडला घडला असल्याने त्यात हीच ‘चादर गँग’ यात सामील असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान दुसरीकडे पोलिसांचे हात सर्वोच्च न्यायालयाने बांधले आहे.सात वर्षाच्या आत शिक्षा असणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या घालून अटक करायची नाही असे स्पष्ट निर्देश आहेत.पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले जाते त्यावेळी न्यायालय पहिल्यांदा विचारते,”तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का ? असा सवाल हमखास विचारला जातो.अशा वेळी आरोपींना पोलिसांचा धाक तो काय राहणार असा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे.

   कोपरगाव शहर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे.नजिक शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र आहे.त्या ठिकाणी विमानतळ आणि प्रगत रेल्वे आल्याने आंतरराज्यीय चोरटे या ठिकाणी सहज येवू लागले आहे हे उघड आहे.मागे तर एक टोळी हैद्राबाद तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मधून येवून स्टार हॉटेल मध्ये निवास करून आठवडाभर चोऱ्या करून विमानाने फरार होत होती.त्यातच आता चोरट्यांना फरार होण्यासाठी वेगवान समजला जाणारा मुंबई-नागपूर हा समृध्दी महामार्ग उपलब्ध झालाच आहे.चोरटे हे आता अद्यावत तंत्रज्ञानाने संपन्न झाले आहे.त्या तोडीचे पोलिस बळ आता शासनाने उपलब्ध करून देणे गरजचे बनले आहे.सायबर क्राईम मोठे प्रमाणावर वाढला आहे.चुटकी सरशी हजारो लाखो रुपये लंपास होत आहे.मात्र रक्कम पुन्हा हाती येणे आणि गुन्हेगार अटक होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.मात्र त्या पातळीवर शुकशुकाट दिसत आहे.पोलिस बळ कमी आहे.त्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवणे गरजेचे बनले आहे.मात्र त्या पातळीवर भयाण शांतता आहे.पोलिसांना अद्ययावत प्रशासकीय इमारत आ.आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.उंच इमारती बांधून उंची निवास व्यवस्था पोलिसांना उपलब्ध करून दिली आहे.मात्र त्या पातळीवर गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही.वाळूचे गुन्हे कमी होताना दिसत नाही.तहसील कार्यालयाला तीन मजली प्रशासकीय इमारत माजी आ.अशोक काळे यांनी निर्माण करून दिली आहे.मात्र महसूल मधील भ्रष्टाचाराचा आलेख मंदावताणा दिसत नाही.कोपरगाव शहराने आणि तालुक्यातील नेत्यांनी मोठे मन करून आणि त्याग करून त्यांच्या हक्काची कार्यालये शिर्डी येथे दिली त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे,प्रांत कार्यालय आहे.अपर जिल्हाधिकारी कार्यालय आहे पण प्रशासनात कोणताही बदल होताना दिसत नाही.जनतेची कामे वेगाने होताना दिसत नाही.उलट अवैध धंद्यांना बरकत आली आहे.मग यातून सामान्य जनतेची सोय झाली की गैरसोय असा प्रश्न सामान्य माणसांना पडला आहे.दुसरी बाजू पाहिली तर आरोपींना पोलिसांनी अटक केली तर लोकप्रिय नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांना फोन जातो,” साहेब…! ..’तो’ आपला कार्यकर्ता आहे…! द्या सोडून…! बेरोजगार आहे तो,त्याला दुसरे काम होत नाही भरतो पोट”अशा स्थितीत पोलिसांनी काय डोमले..करायचे ?

  

गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलिसांनी कोपरगाव शहर आणि तालुक्यात गस्त वाढवली तर परिणामी गुन्हेगारीवर वचक निर्माण होतो.आरोपींना त्यांना समजेल अशा भाषेत पोलिसी खाक्या दाखवून वठणीवर आणता येते.कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांचे फोन आलेच तर त्या कार्यकर्त्यास रिंगण करून दोन फटके अधिकचे देतात.त्यामुळे राजकिय नेत्यांचे चुकीचे काम करणाऱ्याना वाचविण्यास फोन कमी होतात.परिणामी गुन्हेगारीचा आलेख कमी होतो याचा अनुभव शहरास यापूर्वी आला आहे.पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर,वाय.डी.पाटील,दौलतराव जाधव आदी नावे शहर आणि तालुक्याला परिचित आहेत.

   दरम्यान दुसरीकडे पोलिसांचे हात सर्वोच्च न्यायालयाने बांधले आहे.सात वर्षाच्या आत शिक्षा असणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या घालून अटक करायची नाही असे स्पष्ट निर्देश आहेत.पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले जाते त्यावेळी न्यायालय पहिल्यांदा विचारते,”तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का ? असा सवाल हमखास विचारला जातो.अशा वेळी आरोपींना पोलिसांचा धाक तो काय राहणार असा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे.तरीही यावर मार्ग काढत काही अधिकारी आपल्या वर्दीचा गुन्हेगारांवर वचक निर्माण करतात.शहर आणि तालुक्यात गस्त वाढवतात परिणामी गुन्हेगारीवर वचक निर्माण होतो.आरोपींना त्यांना समजेल अशा भाषेत पोलिसी खाक्या दाखवून वठणीवर आणतात.कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांचे फोन आलेच तर त्या कार्यकर्त्यास रिंगण करून दोन फटके अधिकचे देतात.त्यामुळे राजकिय नेत्यांचे चुकीचे काम करणाऱ्याना वाचविण्यास फोन कमी होतात.परिणामी गुन्हेगारीचा आलेख कमी होतो याचा अनुभव शहरास यापूर्वी आला आहे.पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर,वाय.डी.पाटील,दौलतराव जाधव आदी नावे शहर आणि तालुक्याला परिचित आहेत.कोरोणा काळात याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.गणेशोत्सव काळात एका माजी नगरसेवकाने मद्य प्राशन करून पोलिस ठाण्यात जावून चुकीच्या कार्यकर्त्यांचे बचावार्थ दादागिरी केली होती त्यावेळी त्यांनी दाखवलेले रौद्ररूप अनेकांना आठवत असेल वर्दीचा असा धाक असेल तर गुन्हेगारीचा आलेख कमी व्हायला वेळ लागणार नाही.हा पोलिसी खाक्या पोलिस अधिकारी कधी दाखवणार आहेत असा सवाल निर्माण झाला आहे.

समाज व्यवस्थेच्या शोषणाची वाट ही लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि पित्यांच्या खिशातून जाते हे वास्तव आहे ते कोणी नाकारू शकत नाही.त्यामुळे चार दिवस हा ‘आक्रोश’ होईल.वर्तमानपत्रे आणि न्युज पोर्टल बातम्या देतील आणि वाचक काही दिवसात विसरून जातील.पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न होईल.

   आज सायंकाळी ५.३० वाजता आ.आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याची बातमी आहे.त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,सचिव सुधीर डागा आणि पोलिस अधिकारी भगवान मथुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.या बैठकीत आ.काळे यांनी या चोरट्यांचा तात्काळ शोध घेण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांना केले आहे.शिवाय गुन्हेगारीचा आलेख का वाढत आहे ? असा जाबसाल केला आहे.पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी पोलिस निरीक्षक म्हणून राकेश मानगावकर पदावर असताना चोरीचा आलेख आणि गुन्हेगारीचा आलेख कमी कसा झाला होता असा रोकडा सवाल केला आहे.मग आताच तो कमी का होत नाही असा सवाल केला आहे.लक्ष घाला असे आवाहन करून त्यानी त्या आधी ‘सचिन वॉच’ या दुकानाला भेट दिली असून परिस्थिती समजावून घेतली हे.व्यापारी संघटित असल्याने कदाचित त्यांनी घटनास्थळी भेट दिली असावी मात्र शेतकरी संघटित नसल्याचे चोरीसाठी पती,पत्नी आणि तरुण मुलगा असे तीन बळी जावून ही त्यांना काकडी या ठिकाणी जाण्याची तसदी घेण्याची गरज वाटली नसावी असे बोलले जात आहे.शेतकऱ्यांच्या भाळी असलेली ही उपेक्षा संपणार कधी असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.कर्ज जाहिर करूनही..’ती’ कर्जमाफी द्यावी असे सरकारला वाटत नाही.आणि मतांच्या पेट्या बंद झाल्यावर तो प्रश्न विधानसभेच्या सभागृहात (हाऊस )मध्ये उपस्थित करावा असे निवडून आल्यावर येथील साखर आणि सहकार सम्राटांना वाटत नाही तरीही येथील शेतकरी त्यांना मते दिल्याशिवाय राहत नाही अशा दृष्टचक्रात तो अडकला आहे.त्याला चोरी आणि अवैध व्यवसाय अपवाद असण्याचे काम नाही.कारण समाज व्यवस्थेच्या शोषणाच्या हप्त्याची वाट ही लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि पित्यांच्या खिशातून जाते हे वास्तव आहे ते कोणी नाकारू शकत नाही.त्यामुळे चार दिवस हा ‘आक्रोश’ होईल.वर्तमानपत्रे आणि न्युज पोर्टल बातम्या देतील आणि वाचक काही दिवसात विसरून जातील.पुन्हा एखादी गंभीर घटना घडल्यावर सर्व जागे झाल्यासारखे अंग झटकतील आणि पुन्हा एकदा तेच रहाटगाडगे सुरू होईल या पेक्षा  वेगळे कोपरगाव काही होणार नाही.कारण मतदारच भ्रष्ट असेल आणि तो कडक गांधीची नोट हातात पडल्यावरच मतदान करून आपला नेता निवडून देत असेल तर त्याला वाचविण्यासाठी कोणी देवदूत थोडाच येणार आहे ? निवडणूक आठवा,व्यापारी,वेगवेगळ्या ह.भ.प.संघटना,विविध राजकीय सामाजिक संघटना,शिर्डीत उंची हॉटेलात कोठे पायधूळ झाडीत होत्या याचे स्मरण योग्य ठरावे आणि मग आपल्या मागण्या रेटाव्या.मग आपल्या राजकीय नेत्यांकडून अपेक्षा कराव्या हे उत्तम.अन्यथा नेत्यांची अवस्था ही संत तुकाराम महाराज यांचे,


“मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥


(अर्थ -एखाद्याला पैसे देऊन फक्त रडवयास सांगितले तर तशी कृती करताना त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात आणि माया ही नसते कारण त्याला पैसे देऊन रडवण्यास सांगितले असते) या अभंगा प्रमाणे ठरेल.नेत्यांचे हे कडवे वास्तव आता मतदारांना स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही.

संपर्क – 9423 43 9946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close