जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

गोदावरी नदीचे पावित्र्य पुन्हा भंगले !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या घडत असताना त्याकडे कोपरगाव शहर पोलीस बघ्याची भूमिका घेत असून गोवंश रक्षक कार्यकर्ते त्यांच्या बचावार्थ समोर गेले असता त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत काही असामाजिक तत्त्व  असल्याची गंभीर बाब हाती आली असून शहर पोलीस वेळीच पोहचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र एवढी गंभीर घटना घडूनही या असामाजिक तत्वांच्याविरुद्ध गुन्हा का दाखल झाला नाही ? व गोदावरी नदीचे पावित्र्य भंग होण्याचे काम बंद कधी करणार असा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

अन्य धर्मीयांबाबत फारच संवेदनशील असलेल्या पोलीस खात्याने घटनास्थळी या गुन्ह्यात अनेक जण गुंतले असताना केवळ सुभाषनगर येथील शकील बागवान या एकाच आरोपीवर का गुन्हा दाखल केला आहे.याबाबत त्यांच्यावर कोणाचा दवाब होता ही बाब स्पष्ट होणे गरजेचे बनले आहे.हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी भा.द.वि.कलम २९५ (अ) कलम लावून हिंदूंच्या भावनांची कदर का केली नाही असा सवाल निर्माण झाला आहे.


 
भारतात गाय,बैल,म्हैस,शेळी,मेंढी हे प्राणी तर कुटुंबव्यवस्थेला जगण्यासाठी आर्थिक हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत.त्यांना उपयुक्त प्राणी म्हटले जाते.गाईचे देखणेपण काही वेगळेच असते.बैल एके काळी व आजही काही प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त व महत्त्वाचा प्राणी मानला जातो.दारात गाय,म्हैस किंवा अगदी शेळी तरी असणे हे त्या कुटुंबाच्या भरलेपणाचे लक्षण मानले जाते.बैलजोडी दारात असणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते.शेतकरी पोटच्या मुलाइतकेच गोठय़ातल्या जनावरांना जपतो.ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे,परंपरा आहे.त्यातूनच भाजप सरकारने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर करून घेतला होता.मात्र त्याची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नाही.सहा वर्षांपूर्वी कोपरगावात याच परिसरात ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी नगर पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेऊन धाड टाकली होती.त्यावेळीही असाच मोठ्या प्रमाणावर गोवंश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गायी व गोमांस आढळून आले होते व हे गोमांस थेट संगमनेर मार्गे गुजरात राज्यात सुद्धा जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती.व संगमनेर येथील व्यापारी हे हि गोवंश कत्तल या ठिकाणाहून करून ती बाहेर पाठवत असल्याचे निष्पन्न झाले होते.सन २०१८ शिवरात्रीच्या दिवशी,१३ जुलै,२०२०,२९ सप्टेंबर २०२०,०२ ऑक्टोबर २०२०,०५ जानेवारी २०२१,या खेरीज कोपरगावात आजही राजरोस अनेक वेळा कोपरगावात गोवंश कायद्याचे दिवसाढवळ्या पोलिसांच्या आणि नगर परिषदेच्या नाकाखाली हे कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.मात्र पोलिसांनी आणि कोपरगाव नगरपरिषदेने डोळे बंद करून घेतले असल्याचे दिसून येत आहे.

या पूर्वी गोदावरी नदीत हे गोवंश हत्येचे सर्व रक्त नदी प्रवाहांत जात असून नदीचे पावित्र्य भंग पावत आहे.आणि भाविकांना त्यातच स्नान करावे लागत आहे.त्यामुळे संतापून श्री क्षेत्र सराला बेटाचे (गोदाधाम) महंत रामगिरीजी महाराज यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला होता.तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे ही गंभीर बाब आहे.

  या पूर्वी गोदावरी नदीत हे गोवंश हत्येचे सर्व रक्त नदी प्रवाहांत जात असून नदीचे पावित्र्य भंग पावत आहे.आणि भाविकांना त्यातच स्नान करावे लागत आहे.त्यामुळे संतापून श्री क्षेत्र सराला बेटाचे (गोदाधाम) महंत रामगिरीजी महाराज यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला होता.तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे ही गंभीर बाब आहे.त्यामुळे नागरिकांना या यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे.दोन दिवसापूर्वी १७ जून २०२४ रोजी कोपरगावात हिंदुत्ववादी संघटनांनी असाच गोवंश हत्या करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला असून कोपरगावात सदर कार्यकर्ते सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी असामाजिक तत्वांनी थेट या कार्यकर्त्यांवर १५०-२०० जणांच्या समूहाने सशस्त्र हल्ला करण्याची तयारी केली होती.काही मिनिट जर पोलीस घटनास्थळी पोहचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.याबाबत काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून ही मस्ती या असामाजिक तत्वांत आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.या संबधी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यात प्रमुख संशयित आरोपीना अभय मिळाले असल्याची प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

पहिल्या घटनास्थळी ०६ गोवंश होते त्यात ०३ गायी,शेडमध्ये हत्ये साठी ठेवण्यात आल्या होत्या.तर दुसऱ्या घटनेत ०९ गोवंश बांधून ठेवण्यात आले होते.त्यातील दोन गोवंश जनावरांची कत्तल सुरू होती.मात्र त्यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात आला नाही हे विशेष !
विशेष म्हणजे ज्यांच्या जागेत ही कत्तल सुरू होती त्यांना या गुन्ह्यात सामील करण्यात आलेले नाही.

दरम्यान कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत नवीन नियमाप्रमाणे गोवंश जनावरांची विक्री करताना त्यांना पशुसंवर्धन विभागाचा टॅग असणे बंधन कारक असताना त्याची शहानिशा का होत नाही असा सवाल निर्माण झाला आहे.बाजार समितीचे प्रशासन डोळे बंद करून हे हत्येचे पातक स्वतःच्या माध्यावर का घेत आहे ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

   अन्य धर्मीयांबाबत फारच संवेदनशील असलेल्या पोलीस खात्याने घटनास्थळी या गुन्ह्यात अनेक जण गुंतले असताना केवळ सुभाषनगर येथील शकील लकिरा बागवान या एकाच आरोपीवर का गुन्हा दाखल केला आहे.याबाबत त्यांच्यावर कोणाचा दवाब होता ही बाब स्पष्ट होणे गरजच बनले आहे.हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी भा.द.वि.कलम २९५ (अ) कलम लावून हिंदूंच्या भावनांची कदर का केली नाही असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस अधीकारी नेमके काय करत आहेत असा सवाल निर्माण झाला आहे.

  

कोपरगाव शहर पोलीस ठाणे आणि नगरपरिषद यांचेकडे हिंदुत्ववादी संघटना माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,सेनेचे माजी शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल आदींनी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन या ठिकाणी वारंवार असे गोवंश हत्येचे गुन्हे का घडत आहे असा सवाल केला आहे.

आज कोपरगाव शहर पोलीस ठाणे आणि नगरपरिषद यांचेकडे हिंदुत्ववादी संघटना माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,सेनेचे माजी शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल आदींनी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन या ठिकाणी वारंवार असे गोवंश हत्येचे गुन्हे का घडत आहे असा सवाल केला आहे.माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात पशु हत्येसाठी मनाई वस्ती या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असतांना यातील काही नागरिक गोदावरी नदीचे वारंवार पावित्र्य भंग करत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी प्रशासन का घेत नाही ? मोठी गंभीर घटना घडण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.त्यांनी वारंवार घटना घडणाऱ्या घटनास्थळचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.आता पोलीस आणि कोपरगाव नगरपरिषद काय भूमीका घेणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close