जाहिरात-9423439946
संपादकीय

शिर्डीत सत्तेचा टिळा कोणाच्या भाळी ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    लोकसभा निवडणुकीचा शिमगा नुकताच मोठ्या उत्साहात संपला आहे.आता उद्या देशभर होणाऱ्या निवडणुक मतमोजणीकडे मतदारांचे व निवडणूक निरीक्षकांच्या लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडीला राज्यात ४८ पैकी तब्बल ३४ ते २४ जागा मिळू शकतील.ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १४ जागा जिंकू शकते,तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ०८ जागा आणि काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.याला शिर्डी लोकसभा निवडणूक अपवाद नाही.याबाबत आपापल्या समर्थकांमार्फत विविध दावे प्रतिदावे सुरू आहेत.त्यामुळे आजची रात्र आणि उद्या सकाळची वेळेचा पडदा कधी एकदा दूर होतो याकडे समस्त देशवासीयांचे लक्ष लागून आहे.

  

केंद्रात नरेंद्र मोदी सरकारचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे यात शंका नाही.मात्र राज्यातील नेत्यांनी त्यांच्या राजकारणाची गत घालवली असल्याचे दिसून येत आहे.त्यांना राज्यात फोडाफोडीच्या आणि भ्रष्टाचारी नेत्यांना पावन करून घेणाऱ्या वाशिंग मशीन छाप किळसवाण्या राजकारणाचा फटका बसणार हे उघड आहे.

  शिर्डी लोकसभा मतदार संघात विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांनी शिंदे सेनेकडून तर माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे गटाकडून आपली निवडणूक लढवली होती.आधी तुलनेने सोपी वाटणारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र खा.लोखंडे यांच्या नाकी नऊ आणणारी ठरली होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही.दहा वर्ष लोक संपर्काचा अभाव आणि विकास कामाची वानवा या गोष्टी त्यांना अडचणीच्या मोठ्या ठरल्या असल्याचे दिसून आले आहे.

   दि.१६ मार्च रोजी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून चालणारे खा.लोखंडे यांना सेना-भाजपचे स्वतंत्र पाहणी केलेले विविध पक्षांचे पाहणी अहवाल आल्यावर त्यांच्या अडचणीत कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे वाढ होत गेली असल्याचे दिसून आले आहे.’नमनाला घडाभर तेल’ या मराठी म्हणी प्रमाणे त्यांची आपल्या उमेदवारीसाठी मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले आहे.तो पर्यंत माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा सुमारे २०० कि.मी.सर्व दूर पसरलेला पूर्व पश्चिम मतदार संघ असलेल्या जवळपास मतदार संघाचा प्रचाराचा उरक आला होता.आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर जवळपास चाळीस टक्के मतदार आपले मत बनवत असताना त्यानुसार दहा वर्षाचा आलेख पाहता त्यासाठी खा.लोखंडे आधीच नापास झालेले होते.एवढेच कशाला ज्या निळवंडे पाटपाणी समितीच्या जीवावर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्या समितीचे पहिल्याच धडाक्यात त्यांना फेकून दिले असल्याचे दिसून आले आहे.निळवंडे कालव्यांसाठी केंद्राच्या निधी बाबत खा.लोखंडे यांनी केलेली दहा वर्ष फसवणूक त्यांना चांगलीच महाग पडली असल्याचे दिसून आले आहे.त्याचा पहिला फटका त्यांना पिंप्री निर्मळ या ठिकाणीच सलामीलाच बसला होता.त्यांनतर त्याची मालिका सुरू झाली होती.

 

  मोदी सरकारच्या काळात शेती मालाचे पडलेले भाव आणि शेती प्रश्न आणि निळवंडे कालव्याबाबत केलेली दिशाभूल आदी बाबत विद्यमान खासदारांना प्रश्न विचारले होते.त्यावर त्यांची वाचा बंद केली असल्याचे वारंवार उघड झाले होते.त्यांनी निळवंडे कालव्यांसाठी आपण मदत केली असल्याचा बनाव केला होता.तो कालवा कृती समितीने सप्रमाण खोडून काढला व सोबत सामाजिक संकेतस्थळावरून तसे पुरावे प्रसिद्ध केले होते.व “केंद्रातून खा.लोखंडे यांनी एक रुपयांचा निधी आणला असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती समिती मान्य करील” असे जाहीर आव्हान दिले मात्र त्यातून खा.लोखंडे यांची मर्यादा उघड झाली होती.

त्यातून अंजनापूर,जवळके,वेस-सोयगाव,टाकळी,रवंदे आदी ठिकाणी दुष्काळी पट्ट्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना मोदी सरकारच्या काळात शेती मालाचे पडलेले भाव आणि शेती प्रश्न आणि निळवंडे कालव्याबाबत ठणकावून प्रश्न विचारले होते.त्यावर त्यांची वाचा बंद केली असल्याचे वारंवार उघड झाले होते.त्यांनी निळवंडे कालव्यांसाठी आपण मदत केली असल्याचा बनाव केला होता.तो कालवा कृती समितीने सप्रमाण खोडून काढला व सोबत सामाजिक संकेतस्थळावरून तसे पुरावे प्रसिद्ध केले होते.व “केंद्रातून खा.लोखंडे यांनी एक रुपयांचा निधी आणला असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती समिती मान्य करील” असे जाहीर आव्हान दिले होते.अर्थातच त्यांना ते पेलता आले नाही.त्यातुन त्यांची मर्यादा स्पष्ट झाली होती.त्या तुलनेत माजी खा.वाकचौरे यांनी सन-२०१४ पर्यंत आपल्या कालावधीत कालवा कृती समितीच्या सहकार्याने दिल्ली स्थित केंद्रीय जल आयोगाकडून मिळवलेल्या १७ पैकी १४ मान्यता जाहीर केल्या होत्या.व उर्वरित तीन मान्यता समितीने ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून व विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या छ.संभाजी नगर येथील खंडपीठातून मिळवल्या असल्याचे सप्रमाण जाहीर केले होते.निळवंडे धरणाच्या लाभ क्षत्राबाहेर शिर्डी-कोपरगाव शहरांना जाणारे पाणी यशस्वीपणें रोखले होते.याबाबत खा.लोखंडे सपशेल नापास झाले होते.त्या पातळीवर त्यांना उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांचा तडाखा बसला नाही तर नवल ! गावोगाव त्यांची दहा वर्षात काहीच कामे दिसली नाही त्यांचा रोष मतदारांनी न दाखवला तर नवल म्हटले पाहिजे.



   एवढेच नाही तर निळवंडे कालवा कृती समितीने पश्चिम घाट माथ्याचे अरबी समुद्रास जाणारे सुमारे ९० टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडून ऐरणीवर आणला होता व नाशिक येथे मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केले होते.सरकार बदलल्यावर या बाबत पुन्हा कालवा कृती समितीने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या सहकार्याने व नानासाहेब जवरे व रुपेंद्र काले यांच्या नावे एक जनहित याचिका (क्र.५/२०२४) उच्च न्यायालयात दाखल केली होती.या उलट खा.लोखंडे यांनी गाडी खाली चाललेल्या ग्रामसिंहासारखी कृती केली होती परिणामी आपली किंमत कमी करून घेतली होती.समितीने काम करायचे आणि उत्तरेतील इतर नेत्यांसारखे खासदार लोखंडे यांनी त्याचे श्रेय लाटायचे या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारख्या मर्कट लीला दहा वर्ष सुरू ठेवल्या होत्या.त्याची किंमत त्यांना चुकवावी लागणार हे उघड होते.

  

  केंद्रात नरेंद्र मोदी सरकारचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे यात शंका नाही.मात्र राज्यातील नेत्यांनी त्यांच्या राजकारणाची गत घालवली असल्याचे दिसून येत आहे.त्यांना राज्यात फोडाफोडीच्या आणि भ्रष्टाचारी नेत्यांना पावन करून घेणाऱ्या वाशिंग मशीन छाप किळसवाण्या राजकारणाचा फटका बसणार हे उघड होते.या शिवाय मराठा आरक्षण हा प्रभावी नाराजींचा सूर उमटण्यास कारणीभूत ठरला,येथील कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जनजागृती घडवली हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही.

   दरम्यान उत्तरेतील शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या पद्धतीने केंद्राने हाताळले ती पद्धत आणि डॉ.स्वामीनाथन समितीच्या शेती उत्पादन खर्चावर आधारित नफा मिळविण्याच्या शिफारशींना ज्या पद्धतीने केराची टोपली दाखवली त्याचा फटका बसणार हे उघड होते.ते कमी होते की काय त्यांनी ऐन निवडणुकिच्या काळात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.ती उठवली तर त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारले होते.त्यामुळे शेतकऱ्यांचा ऐन निवडणुकीत रागाचा पारा वाढत गेला होता.यावर कोणीही माध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी बोलावयास तयार नाही हे विशेष ! 

  या लोकसभा निवडणुकीत खा.लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन बैठका घेतल्या असल्या तरी त्यांच्या हाती काही मोठे घबाड लागण्याची सुतराम शक्यता नाही.उलट त्यांनी काकडी (शिर्डी) विमानतळावर हेलिकॉप्टर मधून आणलेले खोके आणि त्याच्या वाटपासाठी हाती धरलेले पोलीस अधिकारी आणि त्यांची वाहने आणि तत्सम यंत्रणा कुचकामी ठरणार आहे.हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.

   या पलीकडे जाऊन येथील निवडून येथील मतदारांनी हाती घेतली होती.त्याचा फायदा असा झाला की,”येथील आमदार आणि  त्यांचे प्रतिनिधी यांचे शहर आणि तालुक्यातील कोणीही मतदार ऐकायला तयार नव्हते.हे वास्तव माध्यमांनी समोर आणलेच नाही.काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजप आणि शिवसेना शिंदे गट आदींच्या कार्यकर्त्यांनी थेट आपल्या नेत्यांना सांगून टाकले की,”तुम्ही तुमच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे पहा यात भाग घेऊ नका हे तुमच्यासाठी उत्तम” त्यामुळे परिणाम असा झाला की,सर्व पक्षीय कार्यकर्ते गावागावात होते.त्यांचे पोलिंग एजंट होते.तर दुसरी कडे माजी खा.वाकचौरे यांचे पोलिंग एजंट नसताना त्या मतदान केंद्रावर मतदान मोठ्या संख्येने झाले असल्याचे आढळून आले आहे.खा.वाकचौरे यांना आपल्या कार्यकर्त्याना चहापानाच्या खर्चापलीकडे जाता आले नाही.

    दरम्यान या निवडणुकीत खा.लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन बैठका घेतल्या असल्या तरी त्यांच्या हाती काही मोठे घबाड लागण्याची सुतराम शक्यता नाही.उलट त्यांनी काकडी (शिर्डी) विमानतळावर हेलिकॉप्टर मधून आणलेले खोके आणि त्याच्या वाटपासाठी हाती धरलेले पोलीस अधिकारी आणि त्यांची वाहने आणि तत्सम यंत्रणा कुचकामी ठरणार आहे.हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.एवढ्यावर थांबले ते शिंदे कसले त्यांनी शेवटी आपली नवोदित पक्षाची आणि स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली व विद्यमान लोकप्रतिनिधीच्या पक्षांतराच्या वेळी दिलेल्या शब्दाप्रमाणे निवडणूक बिदागी,सर्व शिबंदी दिलीच पण येथील संस्थानिक कामाला लावले होते.एवढ्यावर त्यांनी समाधान मानले नाही.त्यांनी येथील संस्थानिकांना शिर्डी शिवावरील उंची तारांकित हॉटेल मध्ये मुंबईतील एका सचिवास थांबवून पाच-पाच खोक्याची व्यवस्था केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.मतदान केंद्रनिहाय वीस हजारांचा तंग-तोबरा दिला तो वेगळा पण एकूण मतदार संख्येच्या चाळीस टक्के इतकी शिबंदीची व्यवस्था केली ती वेगळीच.(प्रति मतदान जोडीस एक करड्या रंगाच्या नोटेची व्यवस्था व्यवस्था) तरीही परिस्थिती नियंत्रणात आली नाही.मात्र ही शिबंदी उशिरा पोहचली होती.त्यामुळे ती इच्छित मतदारांऐवजी कार्यकर्त्यांच्या खिशात गेली आहे.त्यामुळे या निवडणुकीचे चित्र वेगळे काय दर्शवणार आहे सांगण्याची गरज नाही.उलट माजी खा.वाकचौरे यांना मतदारांनी निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती.शिवाय त्यांची आर्थिक कुवत जाणून त्यांना वेस-रांजणगाव देशमुख आदी ठिकाणाहून लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली ही बाब त्यांच्या उज्वल भविष्याची नांदी दर्शवत नाही का ?

   दरम्यान या निवडणुकीत शहरी व्यापारी आणि उच्च शिक्षित वर्ग यांनी काही अंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आहे हे विसरता येणार नाही.तर मुस्लिम मतदार हा पूर्ण पणे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा तो देशभर महाआघाडीच्या मागे उभा राहिला असल्याचे दिसून आले आहे.तर दलित मतदार हा शिर्डीत तिसऱ्यांदा सर्व पक्षीय नेत्यांनी दलित नेत्यास उमेदवारी नाकारली या प्रखर रागातून वंचितच्या म्हणजेच उत्कर्षा रुपवते यांच्या भक्कम पाठीशी उभा राहिला हे प्रकर्षाने दिसून आले आहे.एरवी हा मतदार निवडणुकीत बांधावर धरला जातो.त्यातून त्यांची खरेदी-विक्री आणि भावफोडीची जगजाहीर चर्चा होत आली आहे.मात्र यावेळी त्यांनी पहिल्यांदा आपला आंबेडकरी बाणा जपला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.मात्र मागील वेळी हा वर्ग वंचित बरोबर होता.पण त्यांना मुस्लिम मतदारही त्यांच्या हातात हात घेऊन उभा होता.मात्र यावेळी मुस्लिम मतदारांनी मोदी विरोध दाखवून आपली दिशा दर्शवली आहे.त्यासाठी त्यांना थेट मदरसे आणि मस्जिदी यातून फतवे निघाले असल्याची मोठी चर्चा दिसून आली आहे.त्यामुळे हे दोन्ही निर्णयाक मतदार यावेळी विभागले होते.त्याचा तोटा अर्थातच महायुतीला अर्थातच शिर्डीत खा.लोखंडे यांना होणार आहे.हा वर्ग जो पर्यंत काँग्रेस बरोबर होता तो पर्यंत सत्ता २०१४ पर्यंत काँग्रेसकडे होती.मात्र त्यानंतर चित्र बदलले होते.ते भाजप-सेना युती कडे सरकले होते.त्यानुसार सत्तेचा लंबकही त्यांच्याकडे सरकला असल्याचे  दिसून येईल.त्यामुळे कोणी काहीही म्हणो.मात्र यात महाआघाडीची सरशी होणार हे उघड सत्य आहे.म्हणूनच दक्षिण नगर मध्ये विखे-लंके लढाईत मुस्लिम मतदार रोखण्याचे प्रयत्न झाले ते उगीच नव्हे.
   उत्तरेतील नेत्यांनी दरम्यान सक्रिय होण्यासाठी आपल्या सत्तेच्या पोळ्या शेकून घेतल्या असल्या तर नवल नाही.विखेंना रोखायचे असेल तर यासारखी नामी वेळ नाही ही संधी ईशान्य गडावरील नेत्यांनी साधली आहे व शिक्षक मतदार संघात आपल्या पोळीवर तूप ओढून घेतले आहे हे वेगळे सांगण्याची वाचकांना आवश्यकता नाही.मात्र विखेंनी आपला नवा डाव खेळला आहे.यात आपल्या बंधूंना डॉ.राजेंद्र विखे यांना उतरून चर्चेच्या फेरीत अडकविण्यासाठी जाळे कोल्हेसमोर अंथरले आहे.त्यामुळे त्यांना चर्चेच्या टेबलवर बसावे लागणार हे उघड आहे.त्यातून राहाता अर्थात शिर्डीतील लुडबुड थांबविण्याची गळ घातली जाणार हे उघड आहे.आगामी ०४ जून नंतर ही खेळी आणखी रंगात येणार आहे.त्यात कोणाचे प्यादे पुढे सरकणार हे थोड्या अवधीत समजणार आहे.त्यामागे अर्थातच माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आहे हे कोणास सांगण्याची गरज नाही.असो आपला लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा सुरू असून यात काहीही झाले तरी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे कोणी कितीही देव पाण्यात घातले तरी किमान दिड ते अडीच लाखांच्या फरकाने विजय नोंदवणार हे उघड सत्य उद्या उघड होणार आहे.इतकेच या निमित्ताने.

प्रतिक्रिया संपर्क मो.-9423 43 9946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close