जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

कुऱ्हाडीने दांडे…..!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
      

कोपरगाव तालुक्यातील ईशान्येकडे दुष्काळी तेरा गावांना वरदान ठरणाऱ्या व जिरायती भागाची कामधेनु असलेली उजनी उपसा जलसिंचन योजना काळे परिवारामुळे जिवंत असल्याचा दावा एका आ.काळे समर्थक कार्यकर्त्याने केला आहे.त्यामुळे उजनी उपसा जलसिंचन अर्थात उजनी चारी हा प्रश्न ऐन निवडणुकीच्या काळी ऐरणीवर आला आहे.हा निवडणूक पूर्व दावा किती खरा मानायचा हा गंभीर निर्माण झाला आहे.

  

राज्यात समन्यायी कायदा सन-२००५ साली लागू झाल्यानंतर कालवे,उपसा सिंचन योजना आणि चाऱ्यांना पूर पाणी बंद करण्यात आलेले आहे हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.तरीही उजनी चारी अर्थातच रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेची निवडणूक पूर्व पिपाणी स्थानिक नेत्यांकडून आवर्जून वाजते त्याला कारण मतांची बेगमी करणे हे आहे व त्याला आजही दुष्काळी तेरा गावातील ग्रामस्थ तथा मतदार बळी पडतात हे विशेष !

रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेसाठी तत्कालीन उजनी कृती समितीने सन-१९९३ साली रांजणगाव देशमुख येथे “रास्ता रोको”आंदोलन केले होते.व त्यासाठी सुखदेव खालकर,सिताराम कोल्हे,नानासाहेब जवरे,बाळासाहेब रहाणे,गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,कौसर सय्यद,अड्.साहेबराव खालकर,हरिभाऊ गांगवे आदींनी सायकलवर फिरून मोठी जनजागृती केली होती.त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप युतीचे शासन पहिल्यांदा राज्यात विराजमान झाले होते.त्यावेळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तत्कालीन आ.सूर्यभान पाटील वहाडणे हे होते.त्यांनी या आंदोलनासह वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन त्यावेळचे पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांना सन-१९९७ साली हि ३.९४ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यास भाग पाडले होते.त्याचा दिमाखदार सोहळा जवळके येथील माध्यमिक विद्यायलासमोर मोठा गाजत वाजत संपन्न झाला होता.मात्र त्यावेळी या योजनेला तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांनी सदर योजना तांत्रिक दृष्ट्या योग्य नसल्याचा शेरा मारून त्यास सन-१९९९ रोजी शिवसेना-भाजप युती सरकार चे मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानसभा पूर्व राजीनामा दिल्यावर कठोर विरोध केला होता.मात्र जनतेचा रेटा पाहून  निवडणुका पाहिल्यावर त्यांनाही मतांच्या वसुलीसाठी या योजनेचा मोह सुटला नव्हता.त्यांनी निवडणूक पूर्व तत्कालिन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांचेकडे या दुष्काळी भागातील शिष्टमंडळ नेऊन त्यांची मिरवणूक काढली होती.व संबंधित मंत्र्यांना,”तुम्ही केवळ तुम्ही हो म्हणा” असे अगोदरच कानात सांगितले होते.त्याचे अनेक साक्षिदार आजही  जिवंत आहेत.काही काळाने त्यांनी हा भाग विरोधात जात आहे.हे सन-१९९६च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पाहिले होते.व त्यांच्या रांजणगाव देशमुख येथील महिला उमेदवाराला मोठया मताधिक्क्याने पराभूत करून अपक्ष व तुलनेने नवख्या असलेल्या कोऱ्हाळे येथील कल्पना दत्तात्रय डांगे या उमेदवाराला पंचायत समितीत विजयी केले होते.त्यात वरील कार्यकर्त्यानी मोठी मोलाची भूमिका निभावली होती हे सांगणे न लगे.तो कधी न होणारा पराभव चाखल्यावर आपल्या ‘ग’ व ‘म’ सोडून देऊन वास्तवादी भूमिका घेतली होती.व नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती.त्यावेळचे सन-२००४च्या विधानसभा निवडणुकीत अशोक काळे आमदार म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्यावर त्यांनी जवळके येथील जिल्हा परिषद शाळेतील सत्कार स्विकारताना झालेल्या कार्यक्रमात बोलताना,”सदर उजनी योजनेचे पाणी दुष्काळी भागात आणल्यावर शिवाय आपण सत्कार स्विकारणार नाही” अशी ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली होती.मात्र पुढे ती त्यांना पाळता आली नाही हे वास्तव होते.त्यांचेसह अनेकांनी या उजनींवर निळवंडे धरणाच्या सारख्या आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजल्या होत्या.आजही तेच चालू आहे.मात्र सदर योजना केवळ निवडणूका आल्यावरच ऐरणीवर येते.निवडणुका संपल्या की या योजनेकडे कोणीही ढुंकूनही पाहत नाही हे वास्तव आहे.हे दुष्काळी तेरा गावांच्या लक्षात आले नाही असे नाही.पण दुष्काळाने पिचलेली जनता व त्यांना त्या जनतेतील कार्यकर्त्यांच्या पुढ्यात टाकलेल्या चार दाण्यासाठी गावास बळी देण्यास तयार असलेले ‘तित्तर रुपी कार्यकर्ते’ हे कायम अडथळा बनत आले आहे.आजही यात काहीही फरक पडलेला नाही हे केवढे मोठे दुर्दैव.

दरम्यान तिकडे १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पावर वर अशाच टोळ्या तयार झाल्या आहेत.त्यांनी तर तब्बल ५३ वर्ष हाच तमाशा मांडला आहे.तरीही ही दुष्काळातील १८२ गावातील काही मंडळी निळवंडे कालवा कृती समिती सोडून ज्यांनी निळवंडे प्रकल्पाचे पाणी पळवून दारू निर्मिती केली अशा नेत्यांच्या मागे जलपूजनासाठी पळताना दिसत आहे.”हुरळली शेळी लागली लांडग्यांच्या पाठी’ याला दुसरे काय म्हणणार !

   याच नेत्यांनी सन-२००४ साली २७ जानेवारीच्या महिन्यात माजी.खा.बाळासाहेब विखे,माजी आ.दादा पाटील रोहमारे,पाटबंधारे राज्य मंत्री बाळासाहेब थोरात,माजी खा.शंकरराव काळे,माजी मंत्री शंकरराव कोल्हे आदी सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र करून रांजणगाव देशमुख माध्यमिक शाळेच्या नजीक माथ्यावर व राहाता तालुक्यातील वाळकी फाटा येथे कुठलीही प्रशासकीय व आर्थिक मान्यता नसताना खोटे उदघाटन केले होते.त्याला फार वर्ष झालेले नाही.अशातच या उजनी चारीची पुन्हा एकदा पिपाणी वाजली आहे.जानेवारी च्या गोदावरी उजव्या कालव्याच्या आवर्तनाच्या वेळी आ.आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्यांत पाणी नसल्याची भूमिका घेतली होती.त्याची संधी उचलत विवेक कोल्हे या युवराजाने एक लाखांचे विद्युत बिल भरत आपणच या योजनेचे तारणहार असल्याचा कांगावा केला होता.मात्र त्यातून धोंडेवाडी एक पाझर तलावही ते पूर्ण क्षमतेने भरु शकले नव्हते.आव मात्र राणा भीमदेवी होता.मात्र असत्य समाजात पसरून व त्याचा आपल्या भाटांकरवी बोभाटा करून बेगडी प्रेम दाखवून आपल्या मतांची बेगमी करण्यात उत्तर नगर जिल्ह्यातील हि मंडळी कधीच कमी पडत नाही हे विशेष ! व त्यांच्या मागे निवडणूक काळात एक तुकड्यासाठी पळणाऱ्या टोळ्या पाहिल्या की,’हसावे की रडावे’ असा प्रश्न कोणाही सुज्ञास पडल्याशिवाय राहात नाही.आता फरक इतकाच आहे की यावेळी आ.आशुतोष काळे यांनी हे (बेगडी) प्रेम दाखवले आहे.मागील वेळी विवेक कोल्हे या तिसऱ्या पिढीने दाखवले होते इतकेच.आज अमुक तमुक नेत्यांचा दावा करणारी मंडळी त्यावेळी कोठेच नव्हती तर टिंगल टवाळी करत होती हे जनता विसरणार नाही.

दरम्यान तिकडे १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पावर वर अशाच टोळ्या तयार झाल्या आहेत.त्यांनी तर तब्बल ५३ वर्ष हाच तमाशा मांडला आहे.तरीही ही दुष्काळातील १८२ गावातील काही मंडळी निळवंडे कालवा कृती समिती सोडून ज्यांनी निळवंडे प्रकल्पाचे पाणी पळवून दारू निर्मिती केली अशा नेत्यांच्या मागे जलपूजनासाठी पळताना दिसत आहे.”हुरळली शेळी लागली लांडग्यांच्या पाठी’ असे जिल्हाभर नव्हे तर राज्य भर सार्वत्रिक चित्र आहे.नेत्यांच्या मागे सात दशके फिरणाऱ्या स्वातंत्र्यानंतर अद्यापही या टोळ्या कोणताही बोध घ्यायला तयार नाही.’गोतास काळ’ ठरणारे ‘कुऱ्हाडीचे दांडे’… अद्याप हि आपल्या आई वडिलांना आणि भावांना विकण्यास तयार आहे हे विशेष.हे दिवस बदलतील तो या दुष्काळी भागासाठी सुदिन !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close