निवड
कोपरगाव तालुक्यात उपसरपंच निवडणूक उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून सर्वाधिक १६ सरपंच राष्ट्रवादी गटाचे निवडून आले आहेत.या सर्व ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक आज मोठ्या उत्साहात पार पडली असून यामध्ये सर्वाधिक काळे गटाच्या ८ उपसरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तात्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नूतन उपसरपंच पुढील प्रमाणे माहेगाव देशमुख-भास्कर किसन काळे,कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे,भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर,सडे-अनिल गणपत बारहाते,रांजणगाव देशमुख-त्रिंबक रामभाऊ वर्पे,वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे,मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे आदींचा समावेश आहे.
यामध्ये माहेगाव देशमुख,कोळपेवाडी,भोजडे,सडे,रांजणगाव देशमुख,वडगाव,मोर्विस,शहापूर,शिंगणापूर,वेस-सोयगाव, पढेगाव,खिर्डी गणेश या गावांच्या उपसरपंच पदाची निवडणूक नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या निवडणुकीत काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच पुढीलप्रमाणे-
माहेगाव देशमुख-भास्कर किसन काळे,कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे,भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर,सडे-अनिल गणपत बारहाते,रांजणगाव देशमुख-त्रिंबक रामभाऊ वर्पे,वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे,मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे हे ८ उपसरपंच राष्ट्रवादी गटाचे निवडून आले आहेत.
या सर्व उपसरपंचांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.दरम्यान या ८ उपसरपंचांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.