Uncategorized
निवडीचा आहार घेण्यापेक्षा परिपुर्ण आहार महत्वाचा – डॉ.पितांबरे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सर्वांनी आपल्या दांताची काळजी घेतली पाहीजे. योग्य आहार असणे आवश्यक आहे. आवडी-निवडीने आहार घेण्यापेक्षा, परिपूर्ण आहार घ्यावा.सर्व पदार्थांची गरज शरीराला आहे त्यामुळे आपल्या शरीराची व बुद्धीची वाढ योग्य प्रकारे होते व प्रगल्भता येऊन व्यक्तीचा सर्वांगिण विकास होईल असे प्रतिपादन डॉ. मैथीला पितांबरे यांनी कोकमठाण येथे एकबकार्यक्रमात बोलताना केले आहे.
इंडियन डेंटल असोसिएशन शिर्डी- कोपरगाव व विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने डेन्टीस्ट डे व महिला दिनाचे औचित्य साधुन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुला मुलीं साठी मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे ,साईनाथ हॉस्पिटल शिर्डी च्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथीला पितांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी जंगलीदास महाराज,परमानंद महाराज, आत्मानंद महाराज , गणेश महाराज , विवेकानंद महाराजासह संत आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गणेश वाघ,सेक्रेटरी डॉ. किरण खांदे,खजीनदार डॉ. निलेश गायकवाड, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, शांतीमाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती. या दंत आरोग्य तपासणी शिबीरात २ हजार पाचशे आदिवासी मुला – मुलींची दंत तपासणी करून दंत निरोगी ठेवण्याचा योग्य सल्ला दिला.
यावेळी डॉ. गणेश वाघ म्हणाले की, इंडियन डेंटल असोसिएशन कोपरगाव शिर्डी च्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कामगिरीची दखल संघटनेच्या राज्य पातळीने घेतली आहे. आत्मामालीक गुरूदेव माऊलींच्या सानिध्यात असलेल्या आदिवासी मुलांची दंत तपासणी करून खऱ्या अर्थाने वंचितांची सेवा केल्याचे समाधान वाटले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आत्मामालीक व डेन्टल असोसिएशन च्या कार्याचे कौतूक केले. या दंत तपासणी आरोग्य शिबीरात दंत चिकित्सक डॉ. सौरभ बागरेचा,डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. विक्रांत आगवन, डॉ. अंजली कांदळकर, डॉ. अंजली बारहाते, डॉ. शितल खांदे, डॉ. भाग्यश्री घायतडकर, डॉ. वृषभ जांगडा , डॉ.निषात शहा, डॉ.रसिका पवार , आदी डॉक्टरांनी मुलांच्या दातांची व तोंडाची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले.