जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या विद्यार्थ्याची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील  समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी साईश निलेश देवकर याची निवड प्रतिष्ठेच्या सीबीएसई क्लस्टर क्रिकेट साऊथ झोन-२ स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे.योग्य संधी आणि सक्षम मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकू शकतात”-ओमप्रकाश कोयटे,संस्थापक,समता इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण.

  नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील तब्बल ७०० खेळाडू सहभागी झाले होते.त्यातून चुरशीच्या निवड प्रक्रियेतून फक्त १८ खेळाडूंची राष्ट्रीय संघासाठी निवड करण्यात आली आहे.या निवडीत साईशने ठसा उमटवत ‘सदन स्ट्रायकर्स’ या संघातून दिल्ली येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा मान मिळवला आहे.साईशच्या यशामध्ये त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अजिंक्य बोबडे,सनी धिवर तसेच क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले यांचे मोलाचे योगदान आहे.साईश हा सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक निलेश देवकर यांचा पुत्र आहे.

  शाळेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी याबाबत बोलताना, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे.योग्य संधी आणि सक्षम मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकू शकतात असे म्हटले आहे.

  साईशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे  अभिनंदन करून त्याला  शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close