Uncategorizedकोपरगाव तालुकाखेळजगततंत्रज्ञान
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
कोपरगाव(प्रतिनिधी)कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गौतम पब्लिक स्कुल , गौतमनगर व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. ०४ ते ०६ जुलै रोजी करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उदघाटन दि.४ जुलै रोजी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांचे शुभहस्ते पार पडले. यावेळी जिल्हाक्रीडा कार्यालयाचे अधिकारी विशाल गर्जे व सौ. गर्जे, प्राचार्य नूर शेख, फिजिकल डायरेक्टर सुधाकर निलक, हॉकी कोच रमेश पटारे , सर्व प्रशिक्षक, हाउस मास्टर्स , पाहुणे संघ व प्रशिक्षक, पंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोसळणाऱ्या पावसामध्ये उभे राहून संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी स्पर्धेचे उदघाटन करून फुटबॉल खेळाचे महत्त्व सिद्ध केले. या स्पर्धेत मुला मुलींचे १४ व १७ वर्षे वयोगटात एकूण २१ संघ सहभागी झालेले आहे आपले प्रमुख भाषणात सौ. काळे यांनी उपस्थित सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा देवून शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याचे आश्वासन दिले. जिल्हा क्रीडाधिकारी विशाल गर्जे यांनी आशुतोषजी काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व गौतम पब्लिक स्कूलमध्ये भव्य क्रीडांगणे व खेळाडूंची निवासाची व्यवस्था चांगली असून कोसळनाऱ्या पावसामध्ये स्पर्धा पार पडत असल्यामुळे सर्वाचे कौतुक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी चेअरमन आशुतोषजी काळे यांच्या वाढदिवसा निमित्त सदरच्या स्पर्धा गौतमच्या मैदानावर घेतल्या बद्दल जिल्हा क्रीडाधिकारी सौ. कविता निंबाळकर यांचे आभार मानले. मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा ऑगस्ट अखेर गौतम पब्लिक स्कूलमध्ये होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी तर फिजिकल डायरेक्टर सुधाकर निलक यांनी आभार मानले.
विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे. प्राचार्य नूर शेख, खेळाडू.