जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

…या संस्थेतील कर्मचा-यांना वार्षीक वेतनाच्‍या ८.३३ टक्‍के सानुग्रह अनुदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने दिपावली निमित्‍त संस्‍थान आस्‍थापनेवरील पात्र असणा-या कायम व कंत्राटी कर्मचा-यांना त्‍यांच्‍या मागील वर्षातील एकुण वार्षीक वेतनाच्‍या ८.३३ टक्‍के इतके सानुग्रह अनुदान देण्‍यास राज्‍यशासनाने मान्‍यता दिली असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली आहे.

“साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर केला असता संस्‍थानच्‍या आस्‍थापनेवरील पात्र असणा-या कायम (स्‍थायी) व कंत्राटी (अस्‍थायी) कर्मचा-यांना माहे ऑक्‍टोबर २०२१ ते सप्‍टेंबर २०२२ या कालावधीतील त्‍यांच्‍या एकुण वार्षिक वेतनाच्‍या ८.३३ टक्‍के इतके सानुग्रह अनुदान मंजुर करण्‍यात येत असल्‍याचे विधी व न्‍याय विभागाने कळविले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे”-श्रीमती बानायत,मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या की,”श्री साईबाबा संस्‍थानच्‍या कर्मचा-यांना १९७७ पासून सानुग्रह अनुदान प्रत्‍येक दिवाळीपुर्वी दिले जाते.त्‍याअनुषंगाने याही वर्षी संस्‍थान कर्मचा-यांना एकूण वेतनाच्‍या ८.३३ टक्के दराने होणारी रक्‍कम सानुग्रह अनुदान म्‍हणून देणेबाबत व्‍यवस्‍थापन समितीने दिनांक २० जुलै २०२२ रोजीचे सभेत मान्‍यता दिली होती.तथापि सदरचे सानुग्रह अनुदान कर्मचा-यांना आदा करण्‍यापुर्वी विधी व न्‍याय विभाग महाराष्‍ट्र शासन यांची मान्‍यता घेण्‍यात यावी असे ठरले.त्‍यानुसार सदरचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर केला असता संस्‍थानच्‍या आस्‍थापनेवरील पात्र असणा-या कायम (स्‍थायी) व कंत्राटी (अस्‍थायी) कर्मचा-यांना माहे ऑक्‍टोबर २०२१ ते सप्‍टेंबर २०२२ या कालावधीतील त्‍यांच्‍या एकुण वार्षिक वेतनाच्‍या ८.३३ टक्‍के इतके सानुग्रह अनुदान मंजुर करण्‍यात येत असल्‍याचे विधी व न्‍याय विभागाने कळविले असल्‍याचे सांगुन संस्‍थानच्‍या सर्व कर्मचा-यांना दिपावलीच्‍या शुभेच्‍छा ही श्रीमती बानायत यांनी दिल्‍या.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या कर्मचा-यांना दिपावली निमित्‍ताने सानुग्रह अनुदान देण्‍याचा निर्णय घेवुन राज्‍यशासनाची मा‍न्‍यता मिळणेसाठी प्रयत्‍न केल्‍याबद्दल शासनाचे तसेच संस्‍थान प्रशासनाचे संस्‍थान कर्मचा-यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close