जाहिरात-9423439946
कामगार जगत

… या शहरात’पेन्शनर डे’उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरगाव पंचायत समिती सभागृहात आज रोजी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष दिलीप ढेपले अध्यक्षतेखाली ‘ पेन्शनर डे’  मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पेन्शनर बंधू-भगिनी उपस्थित होते.

“वयोवृद्ध पेन्शनर बंधू आणि भगिनींनी समाजाची व देशाची सेवा वयाच्या 58 वर्षापर्यंत केलेली असते त्या काळात त्यांना कोणतेही काम करता येत नाही त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचा जो काळ आहे तो चांगला जावा त्यांनी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये त्यांच्यासाठी सरकारने पेन्शन सुरू केलेली आहे”- दिलीप ढेपले,अध्यक्ष,पेन्शनर संघटना,कोपरगाव. 

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पेन्शनर्स डे म्हणजे १७ डिसेंबर रोजी साजरा होणारा दिवस असून जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी डी.एस.नाकारा यांनी लढलेल्या लढ्याला व सुप्रीम कोर्टाच्या 1982 च्या ऐतिहासिक निकालाला स्मरणात ठेवण्यासाठी साजरा केला जातो,ज्याने पेन्शनधारकांना सन्मान व समान हक्क मिळवून दिले.हा दिवस निवृत्तीनंतरच्या आयुष्यात त्यांना येणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पेन्शन प्रणाली अधिक प्रभावी बनवण्यासाठी साजरा करतात.कोपरगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तो कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   सदर प्रसंगी अध्यक्ष दिलीप ढेपले म्हणाले की,”वयोवृद्ध पेन्शनर बंधू आणि भगिनींनी समाजाची व देशाची सेवा वयाच्या 58 वर्षापर्यंत केलेली असते त्या काळात त्यांना कोणतेही काम करता येत नाही त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचा जो काळ आहे तो चांगला जावा त्यांनी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये त्यांच्यासाठी सरकारने पेन्शन सुरू केलेली आहे.  या कार्यक्रमांमध्ये ज्यांचे वय 80 वर्षाच्या पुढे आहे त्या सर्वांना शाल श्रीफळ पुष्प देऊन गौरवण्यात आले आहे.त्यांनी भविष्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर आपल्या जोडीदार पत्नीची देखील काळजी घ्यावी.नोकरीच्या काळात जे करायचे राहून गेलेले आहे ते कार्य करावे असे आवाहन करून वाचन,देवधर्म यामध्ये स्वतःला गुंतून घ्यावे असे म्हटले आहे.

  सदर प्रसंगी श्री इंगळे यांनी संघटना ही प्रश्न सोडवण्यासाठी असती त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून प्रश्न मांडावे असे आवाहन केले आहे.तर रामचंद्र ठोंबरे,श्री वर्पे श्रीमती,विद्या भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी अरुण धुमाळ यांनी प्रास्ताविक केले तर रामचंद्र ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close