जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गावठी कट्टा जप्त,कोपरगावातील आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

शिर्डी पोलिसांनी शिर्डीतील अवैध व्यवसायावर आपली वक्रदृष्टी केलेली असताना आज त्यांनी गुप्त माहितीनुसार सावळीविहीर नजीकच्या परीसरात संशयास्पद फिरत असलेल्या एका तरुणाला देशी बनावटीची पिस्तुल एक जिवंत काडतुसासह सापळा लावून मुसक्या आवळल्या आहेत त्यामुळे शिर्डीसह राहाता परिसरात नागरिकांत खळबळ उडाली आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

दरम्यान भोजडे चौकी ता.कोपरगाव येथील आरोपी योगेश खरात याची झाडा झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे सुमारे २७ हजार रुपये किमतीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. त्याचा शिर्डी पोलिसांनी पंचनामा करून ते जप्त करण्यात आले आहे.पुढील तपास शिर्डी पोलीस अधिकारी करत आहेत.

कोपरगाव आणि राहाता तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असताना आज शिर्डी पोलिसांना एका गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी सावलीविहीर शिवारात सापळा लावून के.के.मिल्क डेअरी जवळ धाड टाकली असता त्या ठिकाणी त्यांना एक तरुण संशयास्पद आढळला होता.त्याला त्यांनी जेरबंद केले असून त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने त्याचे नाव योगेश कैलास खरात (वय-२३) असे सांगितले असून तो रा.भोजडे चौकी ता.कोपरगाव येथील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आरोपीची झाडा झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे सुमारे २७ हजार रुपये किमतीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. त्याचा शिर्डी पोलिसांनी पंचनामा करून ते जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलीस कॉ.नितीन शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास खरात यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद क्रं. ०४०३-२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५,३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपीने तो कट्टा कोणत्या उद्देशाने आणला होता त्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.दरम्यान सदर आरोपीस राहाता येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यास दि.२६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या आरोपीने गावठी कट्टा कशासाठी खरेदी केला? तो कशासाठी जवळ बाळगला होता ? त्याच्यावर या आधीचे काही गुन्हे दाखल आहेत का ? तो कोणाची वाट बघत होता ? तो अन्य कोणाच्या सहवासात होता ? आदींचा तपास करणे बाकी असल्याने त्यासाठी पोलीस दक्ष झाले असून त्या बाबत तपास सुरु आहे.

दरम्यान या पोलीस कारवाईत शिर्डी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल नितीन शेलार,पोलिस नाईक संतोष गोमसाळे,पोलिस कॉन्स्टेबल अजय अंधारे यांनी सहभाग घेतला आहे. शिर्डी पोलिसांचे या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close