जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात कंटेनर-दुचाकीचा अपघात,एक ठार, एक गंभीर जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावरील जवळके येथील चौकात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एक कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जळगाव ता.राहाता येथील अशोक विठ्ठल गुंड (वय-५८) हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी शोभा अशोक गुंड (वय-५३) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शिर्डी येथून लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भांकीत केले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

जखमी इसमाचे नाव अशोक विठ्ठल गुंड (वय-५८) असे असून हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी शोभा अशोक गुंड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शिर्डी येथून लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भांकीत केले आहे.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली तर एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे.

मयत इसम अशोक गुंड यांचे छायाचित्र.

उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्याचा आशियायी विकास बँकेचा सुमारे ९० कोटींचा निधी मंजूर होऊनही त्याची स्थानिक राजकीय नेत्यांनी वाट लावली असून त्यामुळे या रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला असून सदर रस्त्याचे काम त्वरित चालू करा अन्यथा जवळके आणि परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागास वांरवार देऊनही व पावसाळा येऊन ठेपला असताना त्यावर जलद कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होताना दिसत आहे.

दरम्यान अशीच घटना नुकतीच जवळके या ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली असून राहाता तालुक्यातील जोडपे आपल्या नातेवाईकांच्या देवकौठे येथील दहाव्यासाठी जात असताना या मार्गावरून एक आयशर कंपनीचा कंटेनर (क्रं.एम.पी.०९ जी.जे.०१२१) हा भरधाव वेगाने जात असताना त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ एन.३७१०) हिला जोरदार धडक दिली आहे.त्यात या दुचाकीवर प्रवास करत असलेले जोडप्यातील इसम जागीच ठार झाला असून त्यांची पत्नी गंभिररित्या जखमी झाली आहे.

जखमी इसमाचे नाव अशोक विठ्ठल गुंड (वय-५८) असे असून हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी शोभा अशोक गुंड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शिर्डी येथून लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भांकीत केले आहे.

त्याना नजीकच्या नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शिर्डी येथील साई बाबा रुग्णालयात भरती केले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली तर एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे.

सदर पुरुषाने पांढरा शर्ट घातलेला असून दाढी खुरटलेली आहे.तर महिलेने आपल्या अंगात भगव्या रंगाची साडी घातलेली आहे.व खांद्यात काळी पिशवी अडकवली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान या घटनेनंतर कंटेनर वरील चालक मात्र फरार झाला आहे.घटनास्थळावरून चालक फरार होऊन शिर्डी येथील पोलिसांत दाखल झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शिर्डी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी अशोक गुंड यांना मृत घोषित केले आहे.कंटेनर चालकांवर वर पुढील पोलीस कारवाई सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मात्र सदर जोडपे हे जळगाव वरून संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे दाहव्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close