जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात पुन्हा एकदा कार चोरी,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील एकावेळी एका रात्रीत तीन कार चोरी होऊन त्यांचा तपास लागलेला नसताना काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एक मारुती स्विफ्ट कार (क्रं.एम.एच.१७ ए.जे.६४७७) चोरीस गेली असल्याचा गुन्हा वीट व्यावसायिक प्रदीप गोविंद व्यवहारे (वय-४७) यांनी दाखल केल्याने शहरातील कारसह वाहनधारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.त्यानंतरही लहान मोठ्या चोऱ्या थांबलेल्या नाही तरीही चोरट्यांचा शोध लागत नाही त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागत आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.तर दुसऱ्या दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली आहे.अन्य अनेक चोऱ्या सातत्याने सुरु आहे.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तो पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील कालिंदीनगर या उपनगरात एक मारुती स्विफ्ट डिझायर गाडी (क्रं.एम.एच.१७ ए.जे.६४७७)चोरी करून आपला प्रताप दाखवला आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तालुक्यात येवून धाडी टाकत असून हि बाब स्थानिक पोलिसांना खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.यावर राजकीय नेते कोणीही बोलायला तयार दिसत नाही हे विशेष ! नागरिकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता रक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असताना यावर कोणीही बोलायला तयार दिसत नाही त्यामळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

नुकत्याच घडलेल्या घटनेत फिर्यादी वीट व्यावसायिक यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण कोपरगाव शहरातील स्टेशन रोड,कालिंदी नगर येथील रहिवासी असून आपला वीट व्यवसाय आहे.आपण बुधवार दि.१० मे रोजी आपली वरील वर्णनाची मारुती स्विफ्ट कार आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असता रात्री ०९ वाजेनंतर पहाटे ०३ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने आपली पांढऱ्या रंगाची ०१ लाख ४० हजार रूपये किमतीची कार मध्यवर्ती कुलूप तोडून चोरून नेली आहे.याबाबत आपण आजूबाजूला शोध घेऊन पाहिला असता ती मिळून आली नाही. अखेर आपण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२२३/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close