जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकाचा मृत्यू,कोपरगाव पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नुकताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ असललेल्या संतोष फरसाण या दुकानाजवळ एक इसम (वय-४५) मृत अवस्थेत आढळून आला आहे.या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अमित खोकले (वय-३८)यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिसांनी भेट दिली आहे.आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद पुस्तकात नोंद क्रं.२४७/२०२३ सी.आर.पी.सी.७४ प्रमाणे नोंद केली आहे.मात्र या प्रकरणी कोणीही ओळखीचे पुढे आलेले नाही त्यामुळे सदर इसम बाहेरील असावा असा कयास व्यक्त होत आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मर्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close