जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत मनोऱ्यावर आत्महत्या अयशस्वी प्रयत्न,कोपरगाव नजीकची घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या तरुणाने घरगुती भांडणाच्या झाल्याच्या कारणावरून थेट महावितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या मनोऱ्याच्या शिखरावर चढून वीजवाहक तार हातात धरून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.दरम्यान त्या विद्युत वाहक तारांत वीज प्रवाह नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत दि.१५ एप्रिल रोजी घडली आहे.त्यातील तरुणाने घरगुती भांडणाच्या कारणावरून थेट महावितरण कंपनीच्या मनोऱ्यावर चढण्याचा प्रयत्न केला होता.त्यात तो विद्युत वाहक मनोऱ्याच्या थेट शिखरावर गेलेला दिसून येत आहे.मात्र सुदैवाने त्या दिवशी शनिवार असल्याने व तो महावितरण कंपनीचा देखभाल दुरुस्तीचा वार असल्याने सदर वीज वाहक मार्ग बंद होता.त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तरुणांच्या व तरुणींच्या आत्महत्या अलीकडील काळात चिंताजनक पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत.जागतिक पातळीवर बघता,मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे १५-४४ यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे.भारतात देखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.आत्महत्या करणार्‍यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत.यात नुसता प्रयत्न करणार्‍यांची संख्या कितीतरी जास्त आहे.दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे.तरुणांची सहनशीलता संपत चालली असल्याचे दिसून येत आहे.त्यांना संस्काराअभावी नकार पचविण्याची कोणतीच शक्ती उरलेली नाही.अशीच अयशस्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न नुकताच उघड झाला आहे.सदर घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत दि.१५ एप्रिल रोजी घडली आहे.त्यातील तरुणाने घरगुती भांडणाच्या कारणावरून थेट महावितरण कंपनीच्या मनोऱ्यावर चढण्याचा प्रयत्न केला होता.त्यात तो विद्युत वाहक मनोऱ्याच्या थेट शिखरावर गेलेला दिसून येत आहे.मात्र सुदैवाने त्या दिवशी शनिवार असल्याने व तो महावितरण कंपनीचा देखभाल दुरुस्तीचा वार असल्याने सदर वीज वाहक मार्ग बंद होता.त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

दरम्यान सदर बाब नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या सन-१९७६ साली प्रसिद्ध झालेल्या ‘शोले’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे मनधरणी करून त्यास गोडी-गुलाबीने खाली उतरून घेतले आहे.त्यासाठी काही उत्साही तरुणांनी सदर मनोऱ्यावर मध्या पर्यंत चढण्याचे अनाठायी धाडस केल्याचे दिसून आले आहे.केवळ दैव बलवत्तर म्हणून सदर तरुण आणि त्याचा जीव वाचविण्याचा मदत करणारे तरुण वाचले आहे.
दरम्यान याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी याबाबतची खबर कोपरगाव तालुका पोलिसांना दिली होती.त्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन महावितरण कंपनीस त्याची वर्णी देऊन वीज प्रवाह बंद ठेवण्यास सांगितले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.दरम्यान घटनास्थळी येऊन पोलीस येऊन काठीने आपले कंबरडे मोडतील या भीतीने खाली उतरताच सदर तरुणाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे.मात्र सदर घटना काही तरुणांनीं आपल्या भ्रमणध्वनितील कॅमेऱ्याने कैद केली असल्याचे दिसून आले आहे.मात्र याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close