गुन्हे विषयक
तरुणांची आत्महत्या,कोपरगाव परिसरात खळबळ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला तरुण मनीष दिलीप गरुड (वय-२३) हा त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने जेऊर पाटोदा आणि परिसरात खळबळ उडाली आहे.मनीष याने आत्महत्या का केली याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील २३ वर्षीय तरूण मनिष गरूड हा काल रविवार दि.१६ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजेच्या पुर्वी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.सदर बाब लक्षात आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला औषधोपचार कामी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.तेथे त्यास मृत घोषित केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,तरुणांच्या व तरुणींच्या आत्महत्या अलीकडील काळात चिंताजनक पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत.जागतिक पातळीवर बघता,मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे १५-४४ यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे.भारतात देखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.आत्महत्या करणार्यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत.यात नुसता प्रयत्न करणार्यांची संख्या कितीतरी जास्त आहे.दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे.अशीच आत्महत्या नुकतीच कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत दि.१६ फेब्रुवारी रोजी घडली होती.त्या तरुणांचे नाव मनीष दिलीप गरुड असे आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्यावर आज सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील २३ वर्षीय तरूण मनिष गरूड हा काल रविवार दि.१६ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजेच्या पुर्वी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.सदर बाब लक्षात आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला औषधोपचार कामी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौदर यांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू क्रं.२२/२०२३
सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल के.ए.जाधव हे करत आहे.
दरम्यान मयत मनिष हा मयत होण्याच्या पूर्वी आपल्या मित्रांसमवेत कोपरगाव अमरधाम येथे गेल्याची माहिती असून आणि त्याने मित्रांसोबत छायाचित्रण केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे त्याच्या निधनाने त्याच्या मित्रानांही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान यावेळी ग्रामीण रुग्णालयात मयत मनिष यांच्या नातेवाईक,मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली होती.सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.