गुन्हे विषयक
चोर दुचाकीसह पकडले,तीन दिवसांची पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारातील शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे सोयाबीन व १ हजार २०० किमतीचे गहू चोरीतील फरारी आरोपी तालुका पोलिसांनी आज कारवाई करून पकडले असून त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडलेल्या आरोपींकडे सोयाबिनसह गहू आणि अन्य तीन विना क्रमांकाच्या तीन दुचाकी आढळून आल्या आहे.त्यात बजाज प्लॅटिना,बजाज एक्स.सी.डी.टि.व्ही.एस.स्टार सिटी आदींचा समावेश आहे.त्यांचे एकत्रित मूल्य जवळ पास ०१ लाख ३६ हजार असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.सदर गुन्हा पोलिसानी बारा तासात उघड केल्याचा दावा केला आहे.पोलिसांनी मनावर घेतल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण समोर आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते.राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून होऊ लागला होता.गत महिन्यात दि.२२ फेब्रुवारी २०२३ रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला महा प्रताप दाखवला होता व पोलिसांना खुले आव्हान दिले होते.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.तर आणखी दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली होती.बुधवार दि.२२ मार्च रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादी विकास गोरक्षनाथ शिंदे रा.अंचलगाव यांची साईबाबा कॉर्नर वरून काळ्या रंगाची ‘होंडा शाईन’ हि दुचाकी (क्रं.एच.एच.१७ सी.जे.१३५६) हि चोरिस गेली होती.त्यांनी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१३५/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला होता.मात्र सदर फिर्यादीने सोंजुळ ता.फुलंब्री येथील चोरटा सुधाकर कडूबा जाधव या चोरट्यास रंगेहात पकडून दिले होते.त्यानंतर अधिक चोऱ्या उघड होतील अशी अशा निर्माण झाली असताना काल पुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.मात्र चोरटे हाती लागत नव्हते मात्र आता अधिकारी आणि पोलिसांनी अंग झटकले असल्याचे दिसू लागले असून त्यांनी मनावर घेतले तर कुठलाही चोरटा अज्ञात राहू शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.
दरम्यान अशीच घटना उघड झाली आहे.ब्राम्हणगाव शिवारात बुधवार दि.२२ मार्च रोजी सकाळी तेथील शेतकरी रमेश भिकाजी अंबिलवादे (वय-५०)यांच्या कांद्याच्या चाळीतून अज्ञात चोरट्यानी २० हजार रुपये किमतीचे चार क्विंटल सोयाबीन व ०१ हजार २०० रुपये किमतीचे अर्धा क्विंटल गहू असा सुमारे २१ हजार २०० रुपयांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला होता.या प्रकरणी फिर्यादी अंबिलवादे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु. क्रं.१४५/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या गुंह्यातील चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते.
दरम्यान गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना खबर मिळाली होती की,”या गुन्हयात सहभागी असलेले गावातील काही इसम गोदावरी कालव्यांच्या कडेला संशयास्पद रित्या फिरत आहेत.सदर ठिकाणच्या बातमीची पोलिसानी खातरजमा केली असता त्यात तथ्य आढळले होते.त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी आपले सहकारी पाठवले असता त्या ठिकाणी आरोपी संतोष भास्कर पवार (वय-३२),शंकर नामदेव माळी (वय-२८),राहुल आप्पा ठाकरे (वय-२५) सर्व रा.ब्राम्हणगाव आदी आढळून आले आहे.त्यानां पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेतले असता त्यांनी आधी आपल्या लीला दाखवून पाहिल्या मात्र पोलिसांपुढे त्यांचे काही चालले नाही.अखेर पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता ते पोपटासारखे बोलू लागले असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.व चोरलेला वरील वर्णनाचा माल आरोपी शंकर माळी याचे घरात ठेवला असल्याचे कबुल केले आहे व बऱ्या बोलाने काढून दिला आहे.
दरम्यान त्यांच्या कडे या शिवाय अन्य तीन विना क्रमांकाच्या तीन दुचाकी आढळून आल्या आहे.त्यात बजाज प्लॅटिना,बजाज एक्स.सी.डी.टि.व्ही.एस.स्टार सिटी आदींचा समावेश आहे.त्यांचे एकत्रित मूल्य जवळ पास ०१ लाख ३६ हजार असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.सदर गुन्हा पोलिसानी बारा तासात उघड केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या कारवाईत शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे,पो.कॉ.रशीद शेख,के.बी.सानप,चालक साळुंके आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वाढली असून चोरी झालेल्या अनेक नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.