जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरट्यांचा पुन्हा उच्छाद,कोपरगावात दोन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात गत पंधरवाड्यात एका रात्री तीन कारची व अनेक दुचाक्यांची चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर एक चोरटा पकडला असताना या चौकशीतून आणखी चोरटे सापडतील व कोपरगावात शहरातील चोऱ्या बंद पडतील हा आशावाद साफ फोल ठरला असून आज पुन्हा एक दुचाकी आणि दागिने चोरीस गेल्याचे दोन गुन्हे दाखल झाल्याने शहर पोलिसांची झोप उडाली आहे.

शहर पोलीस ठाण्यात साईबाबा कॉर्नर येथुन अंचलगाव येथील विकास शिंदे यांची दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.मात्र सदर फिर्यादीने सोंजुळ ता.फुलंब्री येथील चोरटा सुधाकर कडूबा जाधव या चोरट्यास रंगेहात पकडून दिले होते.त्यानंतर अधिक चोऱ्या उघड होतील अशी अशा निर्माण झाली असताना आज पुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले असून चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा एकदा आपले नाक खाजवून दाखवले आहे.आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते.राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून होऊ लागला होता.गत महिन्यात दि.२२ फेब्रुवारी २०२३ रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला महा प्रताप दाखवला होता व पोलिसांना खुले आव्हान दिले होते.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला होता.तर आणखी दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली होती.बुधवार दि.२२ मार्च रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादी विकास गोरक्षनाथ शिंदे रा.अंचलगाव यांची साईबाबा कॉर्नर वरून काळ्या रंगाची ‘होंडा शाईन’ हि दुचाकी (क्रं.एच.एच.१७ सी.जे.१३५६) हि चोरिस गेली होती.त्यांनी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१३५/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला होता.मात्र सदर फिर्यादीने सोंजुळ ता.फुलंब्री येथील चोरटा सुधाकर कडूबा जाधव या चोरट्यास रंगेहात पकडून दिले होते.त्यानंतर अधिक चोऱ्या उघड होतील अशी अशा निर्माण झाली असताना आज पुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे.

दरम्यान यात पहिला गुन्हा हा दुचाकी चोरीचा आहे.त्यात मढी बुद्रुक येथील फिर्यादी मयूर राजेंद्र जाधव (वय-२६) यांनी आपली दुचाकी हि बाजार समितीसमोर जाधव ऍग्रो सर्व्हिसेस समोर उभी करून ठेवलेली २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस (क्रं.एम.एच.१५ जी.जी.४२१८) हि अज्ञात चोरट्याने दि.२२ मार्च रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास चोरून नेली असल्याचा गुन्हा क्रं.१४०/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.

दरम्यान दुसरा गुन्हा हा येवला गंगा दरवाजा येथील महिला जयश्री मनोज लाडे (वय-४१) यांनी दाखल केला आहे.त्यात यांनी म्हटलं आहे की,”आपण दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव बस आगारात असताना कोणातरी अज्ञात चोरट्याने आपल्या पर्स मध्ये १७ ग्रॅम वजनाचे ४५ हजार रुपये किमतीचे मणीमंगळ सूत्र ठेवले असता अज्ञात चोरट्याने त्यावर हात साफ केला आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१४१/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.

दरम्यान या दोन्ही गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झाली असून याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दारकुंडे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close