गुन्हे विषयक
तीन चोरटे रंगेहात जेरबंद,कोपरगाव तालुक्यातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील महिलेची शेळी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतांना पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फ़त माहिती मिळाली असता तालुका पोलिसांनीं सदर घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपी लक्ष्मण लहू पवार (वय-२४)व सागर राजेंद्र मोरे (वय-१८),भीमा रामदास मोरे (वय-१८) सर्व रा.निमगाव मढ ता.येवला आदींना जेरबंद केले असून त्यांनी आपली चोरी कबूल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की,”तीन अनोळखी इसम एक बजाज डिस्कव्हर हि दुचाकी इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभी करुन तिला तांबड्या रंगाची शेळी बांधलेली आहे.सदरची पक्की माहिती मिळाल्याने याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तात्काळ आपली सूत्रे हलवली व घटनास्थळी आपले सहकारी सहाय्यक फौजदार सुरेश गागरे,पो.कॉ.युवराज खुळे.जयदीप गवारे,चालक चंद्रकांत मेढे आदींना रवाना केले होते.त्यात त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत.त्यात चाकी व दुचाकी वहाने आदींचा समावेश आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान अशीच घटना तालुक्यातील रवंदे येथे घडली होती.तेथील महिला शालिनी संजय कदम (वय-४७) यांची १० हजार रुपये किमतीची शेळी दि.१३ मार्चच्या रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होती.या बाबत त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१३२/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्याबाबत तालुका पोलिसांचा तपास सुरु होता.
दरम्यान पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की,”तीन अनोळखी इसम एक बजाज डिस्कव्हर हि दुचाकी इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभी करुन तिला तांबड्या रंगाची शेळी बांधलेली आहे.सदरची पक्की माहिती मिळाल्याने याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तात्काळ आपली सूत्रे हलवली व घटनास्थळी आपले सहकारी सहाय्यक फौजदार सुरेश गागरे,पो.कॉ.युवराज खुळे.जयदीप गवारे,चालक चंद्रकांत मेढे आदींना रवाना केले होते.
त्यावेळी सदर माहितीबर हुकूम त्यांना कोपरगाव-येवला मार्गावर टोल नाक्याकडून नाटेगावकडे जाणारे मार्गावर त्यांना तीन संशयित तरुण इसम आढळून आले होते.त्यांच्यावर पोलिसांनी झडप घातली व त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी आपली नावे सांगितली असून ती वरील प्रमाणे असल्याचे समजले आहे.
दरम्यान त्यानां पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी चोरी केलेली शेळी हि रवंदे येथील आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.याशिवाय त्यांनी त्याच शिवारातून आणखी चोरीस गेलेला ऐवज म्हणजेच ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी एक १० हजार रुपये किमतीची शेळी असा ५५ हजारांचा ऐवज केवळ चार तासात जप्त केला आहे.याबाबत रवंदे आणि परिसरातील ग्रामस्थानीं पोलीस निरीक्षक देसले व त्यांच्या वरील सहकाऱ्यांचे शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व ग्रामस्थानीं अभिनंदन केले आहे.