गुन्हे विषयक
…’त्या’ अधिकाऱ्याची अडीच तास चौकशी,पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील तहसीलदार विजय बोरुडे यांचा प्रताप जाहीर झाल्यानंतर या महाशयांवर गुन्हा दाखल झाला असून त्यानां काल चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते.त्यात अडीच तासाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले असून त्यांनी वापरलेली गाडी आणि चालक हा समृद्धीच्या ठेकेदारांची असल्याचे उघड झाले आहे.शिवाय त्यावर स्वतः विकत घेतलेला बेकायदा अंबर दिवा लावण्यात येऊन कायद्याची उघड-उघड पायमल्ली सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे तालुक्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोपरगाव येथील तहसीलदार विजय बोरुडे या अधिकाऱ्याने जर संबंधितांवर कोणतीही लेखी कारवाई केली नाही वरिष्ठांना कल्पना दिली नाही.जाण्याचा उद्देश स्पष्ट केला नसताना तो सदर ठिकाणी गेलाच का होता असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे त्याबाबत उलटसुलटच चर्चेला उधाण आले आहे.पोलिसांच्या अधिकच्या तपासात तो स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यात आता नवनवीन खुलासे होत आहे.त्यात हा खुलासा झाला आहे.
दरम्यान वर्तमानात कोपरगाव तहसील कार्यालयाची शासकीय गाडी कालबाह्य झाली असून त्यासाठी समृद्धीच्या सी.एस.आर.फंडातून फेब्रुवारी २०२२ पासून म्हणजेच एक वर्षांपासून सदर महिंद्रा बोलेरो गाडी (क्रं.एम.एच.१२ आर.टी.९०५२)हि समृद्धी कार्यालयातून गाडी घेतली असल्याचे सांगून तिंचा इंधन खर्च तहसीलदार कार्यालयातून केला जात आहे.सदर गाडीसाठी सरकारी चालक उपलब्ध नसून त्या गाडीवर समृद्धीचा चालक रुजू असल्याचे दिसत आहे.त्या खाजगी बोलेरो गाडीवरील चालकाचे नाव अविदास सर्जेराव काकडे रा.काळदरी ता.पुरंदर,जि.पुणे हा असून तो हल्ली झगडेफाटा येथील समृद्धी कॅम्पसमध्ये रहात आहे.त्यामुळे हि गाडी कशी वापरली जाते याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही.
कोपरगाव तहसील कार्यालयाची शासकीय गाडी कालबाह्य झाली असून त्यासाठी समृद्धीच्या सी.एस.आर.फंडातून फेब्रुवारी २०२२ पासून म्हणजेच एक वर्षांपासून सदर महिंद्रा बोलेरो गाडी (क्रं.एम.एच.१२ आर.टी.९०५२)हि समृद्धी कार्यालयातून गाडी घेतली असल्याचे सांगून तिंचा इंधन खर्च तहसीलदार कार्यालयातून केला जात आहे.सदर गाडीसाठी सरकारी चालक उपलब्ध नसून त्या गाडीवर समृद्धीचा चालक रुजू असल्याचे दिसत आहे.मात्र त्यासाठी कोनची परवानगी घेतली त्याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे.
त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की,”आपण सन-२००४ साली नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यानंतर आपण सन-२०१० पासून तहसीलदार या पदावर कार्यरत आहे.या आधी आपण विदर्भात मोहाडी,जि.भांडारा,कळमेश्वर जि.नागपुर,कोर्ची जि.गडचिरोली,देवरी जि.गोंदिया आदी ठिकाणी दंडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.मात्र कोपरगावचा अपवाद वगळता आपण कधीही पहाटे कोणत्याही कार्यालयात भेट दिलेली नाही.कोपरगावात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते ४.३० वाजता कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असल्याची कबुली दिली असून त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचा किंवा अधिकाऱ्यांचा कोणाचाही आदेश नव्हता असे सांगितले आहे.रुग्ण कल्याण समितीचे प्रांताधिकारी अध्यक्ष असून आपण रुग्ण कल्याण समितीचा सदस्य आहे.आपण त्यांना या बाबत कोणतीही विचारणा केलेली नाही किंवा परवानगी घेतलेली नसल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान तयांनी दिलेल्या जबाबात पूढे म्हटले आहे की,”काही लोकांनी रुग्णालयाबाबत आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या असा दावा केला असून त्याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही.मात्र कोपरगाव शहर किंवा तालुका पोलीस ठाण्याची आपल्याला कोणतीही तक्रार दाखल नसल्याची कबुली दिली आहे.मात्र सहज आपण पोलीस ठाण्यास भेटण्यास आलो होतो.मात्र आपण त्या ठिकाणी कोणाही अधिकाऱ्यास शिवीगाळ केली नसल्याचा बनाव केला आहे.मात्र त्याबाबत चलचित्रण दाखविल्यावर मात्र त्यांची बोलती बंद झाल्याची माहिती माहितगार सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.बाकी प्रसिद्ध झालेल्या बातम्या प्रमाणे कबुली दिली असून मात्र आपण डॉक्टरांचा चार्ट फेकून दिला याबाबत नकार दिला आहे.
दरम्यान तेथील फोनवर बोलत असलेले डॉक्टर सचिन यादव यांना शिवीगाळ केली नसल्याबाबत घुमजाव केले आहे.बाकी तेथील परिचारिका आणि रुग्णाची नातेवाईक यांचेशी जो व्यवहार केला आहे त्याचे जे चलचित्रण जे आहे त्या प्रमाणे कबुली दिली असल्याचे समजत आहे,मात्र विनयभंग केल्याबाबत सोयीस्कर घुमजाव केले असल्याचे समजते.त्या त्यांनी म्हटले आहे की,”जाताना आपण कोणताही दम दिलेला नाही.सदर रुग्णालयात गेल्यावर आपण कोणतीही नोंद केलेली नाही वा आदेश दिलेला नाही असे शेवटी म्हटले आहे.
त्यामुळे सदर अधिकाऱ्याने जर संबंधितांवर कोणतीही लेखी कारवाई केली नाही वरिष्ठांना कल्पना दिली नाही.जाण्याचा उद्देश स्पष्ट नाही तर तो सदर ठिकाणी गेलाच का होता असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे त्याबाबत उलटसुलटच चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान आज अधिकारी संशियत ठिकाणी जाऊन विविध ठिकाणचे चलचित्रण तपासणार असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.