जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

१.७८ कोटींची फसवणूक,कोपरगावात मुंबईतील आरोपी विरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील ‘आत्मा मालिक’ या रुग्णालयातील मेडिकल चालविण्याचे बदल्यात सुमारे ०१ कोटी ७७ लाख ६५ हजार ८६२ रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी मुबंई येथील श्री साईबाबा मेडिकल रिसर्च अँड इंडिस्ट्रीज प्रा.ली.चे आरोपी अध्यक्ष डॉ.सुमन सुकुमार बंडोपाध्याय व उपाध्यक्ष संजय नंदू कोळी आदीं विरोधात नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी निलेश रवींद्र चौधरी यांनी गुन्हा दाखल केल्याने कोपरगावसह अ.नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मेडिकल चालविण्याच्या आशेपोटी फिर्यादी निलेश चौधरी रा.शिंगवे यांचा मुंबई येथील श्री साईबाबा मेडिकल रिसर्च अँड इंडस्ट्रीज प्रा.ली.यांचेशी एकूण ०१ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता.त्यात त्यांना ३० लाख करारनामा केल्यावर तर उर्वरित ७० लाख रुपयांची रक्कम आलेल्या नफ्यातून देण्याचे ठरले होते.त्यानुसार फिर्यादीने सदर कंपनीस काही रक्कम दिली होती.तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते.मात्र त्यानंतर या कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे.त्यानंतर फिर्यादिस सदर कंपनीने आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे दिसून आले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव तालुक्यात कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत जंगली महाराज आश्रम यांचे गरीब रुग्णांच्या उपचारासाठी सुमारे आठ वर्षापूर्वी,’आत्मा मालिक’ हे रुग्णालय सुरु केले आहे.मात्र व्यवस्थापनासाठी सदर रुग्णालय चालविणे आतबट्याचे ठरू लागल्याने त्यांनी सदर हॉस्पिटल आधी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयास चालविण्यास दिले होते.मात्र त्याचा करार संपल्यानंतर त्यांनी सदर हॉस्पिटल दोन वर्षांपूर्वी ते मुंबई येथील अध्यक्ष तथा चेअरमन हे डॉ.सुमन बंडोपाध्याय रा.दामिनी सोसायटी पोतदार वर्ल्ड,कलेज मागे जुहूतारा रोड मुंबई हे व उपाध्यक्ष हे संजय कोळी रा.शंकर अपार्टमेंट बारामती जि.पुणे हे असलेल्या श्री साईबाबा मेडिकल रिसर्च अँड इंडस्ट्रीज प्रा.ली.यांना चालविण्यास दिले होते.त्यांनी हे आत्मा मलिक हे रुग्णालय हे कराराने चालविण्यास घेतले होते.व त्यासाठी त्यांना एका मेडिकलची गरज होती.

दरम्यान त्यांना एका मेडिकल चालविणाऱ्या इसमांची गरज होती.फिर्यादिस त्या बाबत वडिलांचे शिर्डी येथील मित्र निवृत्ती गोंदकर यांनी दिली होती.हि माहिती समजल्यावर फिर्यादी यांनी त्यांचेशी संपर्क साधला होता.त्यानुसार डॉ.सुमन बंदोपाध्याय यांचेशी दूरध्वनीवर संपर्क करून दिला होता.त्यानुसार त्यांनी,” आपल्याला सदर मेडीकल मधून तुमचा खूप मोठा फायदा होईल” हे पटवून दिले होते.त्यासाठी त्यांनी आपल्याकडे ३० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली होती.मात्र एवढी रक्कम नसल्याचे सांगून आपण त्यांना त्यांच्या वरील संस्थेच्या नावाने ०५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट करार करण्याचे बदल्यात करून दिला होता.सदर व्यवहारात एकूण ०१ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता.त्यात त्यांना ३० लाख करारनामा केल्यावर तर उर्वरित ७० लाख रुपयांची रक्कम आलेल्या नफ्यातून देण्याचे ठरले होते.त्यानुसार फिर्यादीने सदर कंपनीस दि.३० जुलै २०२१ रोजी ०५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट,०२ ऑगष्ट रोजी १५ लाख धनादेशाने तर दि.३० ऑगष्ट रोजी आर.टी.जी.एस.ने ०५ लाख दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी ०२ लाख असे एकूण २७ लाख रुपये संस्थेच्या नावावर जमा केले होते.व त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांना आपण ६४ हजार ८६२ रुपयांची औषधे दिली होती.व त्यानंतर फिर्यादीने मेडिकलचा ताबा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ चालवली होती.

या दरम्यान फिर्यादीची तेथे येणाऱ्या काही तरुणांची ओळख निर्माण झाली होती.त्यात पुलानी शैणेश सिद्धान गोसावींनगर,नाशिक,नितीन विलास जाधव रा.रानवड,जि.नाशिक,धनंजय श्रीहरी पाटील रा.तळेगाव रोही,ता.चांदवड,आकाश आनंदा मवाळ रा.विष्णूनगर विंचुर,राहुल उत्तम कहाणे रा.नांदूर मधमेश्वर सर्व ता.निफाड आदीं पाच जणांशी ओळख झाली होती.त्यांच्याकडून हि सदर संस्था चालकांनी मेडिकल अनामत रकमेपोटी ०१ कोटी ५० लाख ०१ हजार इतकी विविध बँकांच्या धनादेशाद्वारे रक्कम घेतली होती.त्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे.त्यानंतर आपण त्यांना फोन केलाअसता त्यांनी आपल्याला आपण सदर रुग्णालय चालविण्याचे सोडून दिले असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आपण वेळोवेळी सदर रकमेची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांचे फोन बंद येऊ लागले आहे.त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.त्या फिर्यादीत एकूण सहा जणांनी आपली ०१ कोटी ७७ लाख ६५ हजार ८६२ रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलें आहे.

या प्रकरणी फिर्यादी निलेश रवींद्र चौधरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.६९/२०२३ भा.द.वि.कलम ३४,४०६,४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close