जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्याचा बेत फिस्कटला,आरोपींनीं एकास अपहरण करून मारहाण,दोन आरोपी फरार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

समृद्धी महामार्गावर काल खाजगी कर्तव्यावर असलेले इसम हे आपली गस्त करत असताना त्यावेळी इस्लामवाडी चांदेकसारे येथील अन्सार आलांम शेखसह पाच आरोपींनीं त्याची विचारपूस केली असता त्यास गाडीत उचलून टाकून मारहाण करून दरोड्याचा बेत रद्दबादल केल्याबद्दल मारहाण करून त्यांच्या गाडीस धडक दिली असल्या प्रकरणी फिर्यादी इसम प्रवीण भरत निंबाळकर (वय-३७) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेत कोपरगाव तालुका पोलिसांनी ०३ लाख रुपये किमतीची तवेरा गाडी,०६ हजार रुपये किमतीचे जिओ व आप्पो कंपनीचे दोन मोबाईल,एक धारदार चाकू,एक लोखंडी गज,एक लोखंडी पाइप,एक कटवनी,एक रस्सी आदी दरोडा टाकण्याची हत्यारे जप्त केली आहे टीमुळे मोठा धोका टाळला आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी व समृद्धीच्या कंपनी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम ११ डिसेंबरमध्ये पूर्णत्ववास गेले असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे.त्यामुळे या मार्गावर आता गर्दीही वाढू लागली आहे.त्या गर्दीचा फायदा करून घेण्यासाठी आता चोरटेही सरसावले आहे.सदर रस्त्यावर आता सदर वहातून सुरळीत चालावी व वाहांनाना कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी रस्ते विकास महामंडळ दखल घेत आहे.त्यासाठी विविध ठिकाणी चलचित्रण कॅमेरे बसवले आहे.जागोजागी गस्ती पथक कार्यान्वित ठेवले आहे.त्याना अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या नागरपूरच्या दिशेने असलेल्या मार्गावर आपला हात साफ करण्यास संधी नाही हे पाहून त्यांनी आपली वक्रदृष्टी आता पुन्हा कोकमठाण(शिर्डी)-मुंबईच्या दिशेने अपूर्ण असलेल्या समृद्धी महामार्गावर वळवली असल्याचे उघड झाले आहे.तशी घटना नुकतीच उघड झाली आहे.त्यावरून या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.तरीही या गस्ती पथकास गुंगारा देऊन या प्रगतीपथावर असलेल्या महामार्गावर रस्तालूट करण्यासाठी काही दरोडेखोरांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.

त्याचे झाले असे की,या अपूर्ण समृद्धीवर गस्ती पथकात मूळ फलटण तालुक्यातील निंबळक येथील रहिवासी फिर्यादी प्रवीण निबाळकर हे असून ते वर्तमानात झगडेफाटा येथील शिबिरात राहतात.ते देर्डे-चांदवड ग्रामपंचायत शिवारात सुरु असललेल्या समृद्धीच्या कामावर व आपल्या कर्तव्यावर गस्त करत असताना सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी पहाटे ०१ वाजता आरोपींची एक तवेरा गाडी (क्रं.एम.एच.१७ क्यु.१३४१) या मार्गावर आली त्यांना फिर्यादी प्रविण निंबाळकर हे विचारपूस करण्यास गेले असता,यातील आरोपी अन्सार शेख,अमोल भाऊसाहेब होन,चांदकसारे,सोनू शिंदे,(पूर्ण नाव माहिती नाही) संदीप दहे,शेंडी (पूर्ण नाव माहिती नाही) आदींनी हा धक्कादायक प्रकार केला आहे.ते यावर थांबले नाही त्यांनीं फिर्यादीस उचलून तवेरा गाडीत टाकून अपहरण केले.तसेच फिर्यादीस गाडीत पाठीमागे बसलेल्या तीन आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली आहे.

दरम्यान यातील आरोपी हे फिर्यादीस म्हणाले की,”आज तुम्ही आमचा दरोड्याचा बेत उधळला असल्याचे म्हटले आहे.व फिर्यादीच्या गाडीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोराची धडक दिली आहे.दरम्यान यातील दोन आरोपी हे पळून गेले आहे.

या घटनेत कोपरगाव तालुका पोलिसांनी ०३ लाख रुपये किमतीची तवेरा गाडी,०६ हजार रुपये किमतीचे जिओ व आप्पो कंपनीचे दोन मोबाईल,एक धारदार चाकू,एक लोखंडी गज,एक लोखंडी पाइप,एक कटवनी,एक रस्सी आदी दरोडा टाकण्याची हत्यारे जप्त केली आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी निंबाळकर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.८७/२०२३ भा.द.वि कलम ३९९,३०७,३६४,३२३,१४९,५०४,५०६ प्रमाणे दाखलकेला असल्याची तालुका पोलिसांनी दिली आहे.वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मर्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close