गुन्हे विषयक
भांडण सोडवणे पडले महाग,एकास मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी हे बाजारतळावर सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याच गावातील आरोपी अभिषेक राजेंद्र ससाणे,शुभम संतोष धुमाळ,दर्शन राजेंद्र कटारे आदींनी आपल्याला दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी नकुल सुभाष चांदगुडे (वय-२६) याने दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चासनळी येथील आरोपी अभिषेक राजेंद्र ससाणे,शुभम संतोष धुमाळ,दर्शन राजेंद्र कटारे यांच्यात काही कारणामुळे वाद निर्माण झाला होता.तो वाद वाढू नये यासाठी फिर्यादी नकुल चांदगुडे हा तरुण त्या ठिकाणी वाद मिटविण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेल्या आरोपींनी त्यांचा वाद सोडून दिला व भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे गावात वार्षिक यात्रा महोत्सव आयोजित केलेला होता.त्यानिमित्त काल दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका प्रसिद्ध कंपनीचा आर्केस्ट्रा आयोजित केला होता.त्या निमित्त गावातील रसिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.सदर कार्यक्रम मध्यरात्री बारा वाजता संपला असताना सदर कलाकार काही काळ आपले बिऱ्हाड आवारे पर्यंत थांबले असताना त्या ठिकाणी वरील आरोपी अभिषेक राजेंद्र ससाणे,शुभम संतोष धुमाळ,दर्शन राजेंद्र कटारे यांच्यात काही कारणामुळे वाद निर्माण झाला होता.तो वाद वाढू नये यासाठी फिर्यादी नकुल चांदगुडे हा तरुण त्या ठिकाणी वाद मिटविण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेल्या आरोपींनी त्यांचा वाद सोडून दिला व भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.सदर फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असूनही हा वाद निर्माण झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिन्ही आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.८२/२०२३ भा.द.वि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.हे.कॉ.संदीप बोटे हे करत आहेत.