जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार-माजी मंत्री घोलप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवावारीच्या

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवसेना उपनेते माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी ग्रामपंचायत वारी येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी,”शिवसेनेत प्रामाणिकपणे बावन्न वर्षे काम करत आहे आणि शेवटपर्यंत करीत राहील असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असुन माझे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सदस्यांशी घट्ट नाते आहे त्यांच्याकडे आपल्या गावच्या समस्या मांडुन त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

माजी मंत्री घोलप यांचे तळागाळातील कार्यकर्ते सोबत घेऊन कार्य करण्याची शैली कौतुकास्पद असल्याचे सांगत सामान्य माणसात काम करणारे असामान्य व्यक्तिमत्त्व असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते आपले चाहते आहे-मच्छीन्द्र टेके,माजी सभापती,कोपरगाव पंचायत समिती.

यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज समाजमंदिर वारी येथे भेट देऊन समाजातील तरुणांशी संवाद साधला गावातील विकासकामांची माहिती घेऊन मोठया प्रमाणात सुरु असणारे विकासकामे,गल्लोगल्ली हायमॅक्स आणि दलित वस्ती सुधार योजना प्रभावी पणे राबविल्याबद्दल वारीचे सरपंच सतिश कानडे यांचे घोलप यांनी कौतुक केले

ग्रामपंचायत कार्यालय वारी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले

वारीचे जेष्ठ नेते नामदेवराव जाधव,माजी पंचायत समिती सभापती मच्छिंद्र टेके,माजी उपसरपंच रावसाहेब टेके,अशोक कानडे यांनी मनोगत व्यक्त करत वारीतील समस्या सोडवण्यासाठी मंत्रालय स्तरावर मदत करण्याचे आवाहन केले यावेळी सरपंच सतिश कानडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन घोलप यांना सादर केले आहे.

यावेळी नाशिक महानगरपालिका माजी उपायुक्त दत्तात्रय गोतिसे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे,घोलप यांचे स्वीयसचिव नंदकुमार गोसावी,वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश कानडे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,विशाल गोर्डे,माजी सरपंच बद्रीनाथ जाधव,माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे,ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके,अनिल गोरे,अण्णा पाटील ठोंबरे,राजेंद्र वाळुंज,परशराम टेके,गजानन जंगम,संतोष गायकवाड,सचिन टेके,माजी सरपंच बाबुशेठ कलंत्री,अनिल कानडे,नानासाहेब नेवगे,प्रशांत संत,लक्ष्मण वाघ,भाऊसाहेब कडु,मधुकर कडु,हरी टेके, ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे,रामेश्वर कानडे,रावसाहेब वाघ,गव्हाणे आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close