जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अज्ञात वाहनाचे धडकेत तरुण ठार,एक जखमी,कोपरगावात दोन स्वतंत्र घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी-रवंदे रस्त्यावरून जात असताना टाकळी शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात शिंगणापूर येथील रहिवासी तरुण नवनाथ बन्सी आजगे (वय-३९) याचे निधन झाले आहे.उपचारा दरम्यान हलवत असताना तो बेशुद्ध पडल्याने त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.तर दुसऱ्या घटनेत नगर-मनमाड मार्गावर येसगाव शिवारात मराठवाडा जलद कालव्याच्या दक्षिणेस साधारण १०० मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी काल रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कोटमगाव येथील दुचाकीस्वार अशोक कोटमे यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

मयत इसम नवनाथ आजगे हा इसम दि.०२ फेब्रुवारी रोजी रवंदे-टाकळी रस्त्याने जात असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे.त्यात सदर इसम गंभीर रित्या जखमी झाला आहे.त्यास नजीकच्या नागरिकांनी प्रथम कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता दरम्यान हि घटना घडली आहे.तर दुसरी जलद कालव्याच्या जवळ दुचाकी स्वारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अशोक कोटमे हा जखमी झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत इसम नवनाथ आजगे हा इसम दि.०२ फेब्रुवारी रोजी रवंदे-टाकळी रस्त्याने जात असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे.त्यात सदर इसम गंभीर रित्या जखमी झाला आहे.त्यास नजीकच्या नागरिकांनी प्रथम कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता प्रथमोचार करून त्यास पुढील उपचार करण्यासाठी घेऊन नाशिकला जात असताना जखमी इसम बेशुद्ध झाला असता त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचाराआधी त्याचे निधन झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उंबरकर यांनी याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास दिली आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले यांनी दिली आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत नगर-मनमाड मार्गावर येसगाव शिवारात मराठवाडा जलद कालव्याच्या दक्षिणेस साधारण १०० मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी काल रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कोटमगाव येथील दुचाकीस्वार अशोक कोटमे यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.त्यास उपचारार्थ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती केले असल्याची माहिती मिळाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०७/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close