जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात ५० हजारांची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या निवारा हौसिंग सोसायटीत रहिवासी असलेल्या फिर्यादीचे घराचा कडी-कोयंडा तोडून व घरात घुसून त्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व ०९ हजार रुपये रोख असा जवळपास ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवुन नेला असल्याचा गुन्हा आज फिर्यादी कमल ईश्वर कांकरिया (वय-५५) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने निवारा आणि कोपरगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

निवारा परिसरात अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून जिन्या खालच्या कपाटाची उचकापाचक करून त्यातील काही तर वरच्या खोलीच्या कपाटातील सामानाची उचकापाचक करुन त्यातील सोने नाणे आणि अन्य चिजवस्तू असा सुमारे ५० हजार रुपयांच्या वस्तूंचा पोबारा केला आहे.याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला कमल कांकरिया यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधून भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असतात.त्यामुळे शहरतील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत असते.अशीच घटना नुकतीच निवारा परिसरात घडली असून या प्रकरणी फिर्यादी कमल कांकरिया या निवारा परिसरातील रहिवासी असून त्या आपल्या कुटुंबासमवेत दि.१३ जानेवारी रोजी बाहेरगावी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातच चोरट्यांनी पाळत ठेवून डल्ला मारला आहे.हि बाब आज सकाळी दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ०६ वाजेच्या सुमारास आल्या असता त्यांच्या घराचा काडी व कोयंडा तोडलेल्या स्थितीत आढळून आला होता त्यावेळी उघड झाली आहे.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून जिन्या खालच्या कपाटाची उचकापाचक करून त्यातील काही तर वरच्या खोलीच्या कपाटातील सामानाची उचकापाचक करुन त्यातील सोने नाणे आणि अन्य चिजवस्तूंचा पोबारा केला आहे.
त्याची फिर्यादी महिलेने सविस्तर पाहणी केली असता त्यात त्यांना २०,हजार रु.किमतीचे त्यात सोन्याचे ४ टॉप्स,२२ ग्रॅम वजनाचे,जुने वापरते किंमत अंदाजे,२० हजार रु.किमतीचे त्यात चांदीचा ०५ तोळ्याचे १ नाणे,चांदीचा १० तोळ्याचे १ नाणे,चांदीच्या लक्ष्मीचे १० ग्रॅम वजनाचे २० नाणे व ५ ग्राम वजनाचे ३ नाणे,चांदीचा १ ग्लास,चांदीच्या २ वाट्या,चांदीचे पायातील पैजन जुने वापरते किंमत अंदाजे,०९ हजार रुपये रोख रक्कम त्यात ५० रु.२० रु.,१० रुपये दराच्या कोऱ्या नोटा असा एकुण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यानी लंपास केला असल्याचे लक्षात आले आहे.या प्रकरणी तातडीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याची खबर दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक एस.सी.पवार यांनी आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.२८/२०२३ भा.द.वि.कलम ४५७,४५४,३८० प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close