गुन्हे विषयक
कोयता,गजाच्या सहाय्याने दोन गटात हाणामारी,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी भाऊसाहेब उत्तम वैरागळ यांच्यात जमिनीच्या भूखंडावरून झालेल्या वादात कोयता,गज,आणि काठीचा वापर करत दोन गटात तुफान हाणामारी झाली असून यात नऊ जण जखमी झाले आहे.यात ०८ पुरुष तर ०१ महिला यांचा समावेश आहे.या घटनेने वेळापूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात काल दि.०४ जानेवारी रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात कोयते,गज,काठ्या आदींचा वापर होऊन मोठी हाणामारी झाली असून यात ९ जण जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यात दोन्ही गटात जमिनीचा भूखंड खरेदी करण्यावरून वाद असल्याची माहिती समजत आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना आपापसातील वाद मिटविण्यासाठी,’सलोखा योजना’ आणली असून त्याची अंलबजावणी अद्याप सुरु झालेली नसताना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात काल दि.०४ जानेवारी रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात कोयते,गज,काठ्या आदींचा वापर होऊन मोठी हाणामारी झाली असून यात ९ जण जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यात दोन्ही गटात जमिनीचा भूखंड खरेदी करण्यावरून वाद असल्याची माहिती समजत आहे.त्यावरून फिर्यादी भाऊसाहेब वैराळ हा आपल्याला शिवीगाळ का केली याचा आरोपी दीपक पाटोळे यास जाबसाल करण्यासाठी गेला असता हि घटना झाली आहे.
यात पहिल्या फिर्यादीत भाऊसाहेब उत्तम वैराळ यांनी म्हटले आहे की,”आरोपी दीपक रामदास पाटोळे,दत्तू रामदास पाटोळे,बंडू रामदास पाटोळे,सर्व रा.वेळापूर,विकास शाम जाधव,केतन शाम जाधव,राहुल निकम सर्व सुरेगाव आदींनी मागील भांडणाचे कारणारून गैर कायद्याची मंडळी जमवून हातातील गज,काठ्या,कोयता आदींच्या सहाय्याने जखमी व साक्षिदार व आपल्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.
दरम्यान या घटनेत भाऊसाहेब वैराळ,(वय-४८)संजय उत्तम वैराळ,(वय-५०) प्रसाद सुभाष वैराळ,(वय-२३),शिवम लक्ष्मण वैराळ,(वय-२२),उद्धव लक्ष्मण वैराळ,(वय-१५) ऋषिकेश भाऊसाहेब वैराळ,(वय-२१)माधुरी लक्ष्मण वैराळ (वय-४०) त्यात एक महिलेसह सात जण जखमी झाले आहे.सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी भाऊसाहेब वैराळ यांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या फिर्याद दीपक रामदास पाटोळे यांनी दिली आहे.त्यात त्यांनी आरोपी म्हणून लक्ष्मण वैराळ,भाऊसाहेब वैराळ,संजय वैराळ,प्रसाद वैराळ,शिवम वैराळ,ऋषिकेश वैराळ आदींना आरोपी केले आहे.यात दीपक पाटोळे,विकास जाधव आदी दोन जखमी झाल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद अनुक्रमे क्रं.१२,१३/२०२३ भा.द.वि.कलम-३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ अन्वये नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे,आर.टी.चव्हाण आदी करीत असल्याचे वृत्त आहे.