जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैधरित्या गॅसचे रॅकेट,कोपरगावात दोन टॅंकरसह २८ लाखांचा ऐवज जप्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैधरित्या गॅसचे रॅकेट नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने रंगेहात पकडले असून त्यात कॅप्सूल अशोक लेलंड कंपनीच्या टँकरसह (क्रं.एम.एच.४३ बी.जी.७१५०) दुसरा त्याच कंपनीचा दोस्त कंपनीचे लहान वहान (क्रं.एम.एच.११ सी.एच.४४८०) ३० गॅस टाक्या असा सुमारे २७ लाख ९७ हजार ७१८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे व आरोपी बुधाराम आनंदाराम विष्णोई वय-४० यासह राजस्थान ह.मु.जेऊर कुंभारी मधील पाच आरोपी विरुद्ध विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.ह.शेख शकील अहमद (वय-५३) नाशिक यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

अ.नगर जिल्ह्यात स्थानिक पोलिसांना चकवा देऊन गॅस चोरी करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांना लागली होती.त्यानुसार त्यांच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत काल दि.०२ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून टाकलेल्या धाडीत पाच आरोपी व सुमारे २८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अ.नगर जिल्ह्यात स्थानिक पोलिसांना चकवा (?) देऊन गॅस चोरी करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांना लागली होती.त्यानुसार त्यांच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत काल दि.०२ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्रीच्या सुमारास असलेल्या संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर,’हॉटेल यू.पी.हरियाणा राजस्थानी ढाबा’ या ठिकाणी घटनास्थळाच्या मोकळ्या जागेच्या आजूबाजूस सापळा लावला होता.त्या ठरलेल्या नियोजनानुसार पोलीस आपल्या ठरलेल्या ठिकाणी दबा धरून थांबून होते.

दरम्यान त्या ठिकाणी वरील क्रमांकाचा अशोक लेलंड गॅस टँकर आला होता व त्या टँकर मधून काढलेला गॅस भरण्यासाठी दुसरे वरील क्रमांकाचा त्याच कंपनीचा लहान टँकर आला होता.त्या ठिकाणी त्यांनी मुंबईहून आणलेला गॅस ईच्छितस्थळी पोहचविण्या ऐवजी मोठा टँकर नेहमी प्रमाणे उभा करून विविध साधनांचा माध्यमातून त्यातील द्रवरूप पेट्रोलियम गॅस काढण्यास सुरुवात केली असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धावा बोल केला त्यामुळे त्यांना पळण्यास जागा राहिली नाही.व ते पाच आरोपी मुद्देमालासह पकडले गेले आहे.

त्यात प्रमुख आरोपी बुधाराम बिष्णोई,रा.जंम्बसागर,भियासार,जोधपूर राजस्थान,प्रकाश भगीरथ बिष्णोई (वय-३५) रा.भिनासर,तहसील फलोडी,जि.जोधपूर राजस्थान,ह.रा.जेऊर कुंभारी,भुराराम कोजाराम जाणी (वय-२६) भरजासार,ता.फलोदी,धर्मेंद्रकुमार बचानु बिंद,(वय-२७)रा.बिंद,थाना किरकत जि.जोनपुर,उत्तर प्रदेश,सुखराम मगन्नाराम विष्णोई,रा.राजस्थान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशा पाच जणांना रंगेहात पकडले आहे.

त्यांच्या ताब्यातील वरील २४ लक्ष ६५ हजार २२८ रुपयांचा मोठा १४ चाकांचा गॅस भरलेला त्यात ०९ लक्ष ६५ हजार किमतीचा १७.१ टन भरलेला गॅस,टँकर,सदर टँकर मध्ये ऍटो ट्रॅक-६५,दुसरा ०१ लक्ष रुपयांचा अशोक लेलंड कंपनीचा लहान गॅस टँकर,३ हजार रुपये किमतीचा इंडेन कंपनीचे दोन वापरते गॅस सिलेंडर,२६ हजार रुपये किमतीचे त्याच कंपनीचे ३ गॅस सिलेंडर,२१ हजार किमतीचे त्याच कंपनीचे १४ गॅस सिलेंडर,३६ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे व्यावसायिक वापराचे १० गॅस सिलेंडर,१ हजार ५०० रुपये किमतीचे एच.पी.कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर,३ हजार किमतीचे गॅस काढण्याचे कीट,रबरी नळ्यांचे दोन रेग्युलेटर,एक नटांचा मोठा नोझल असलेले किट,६०० रुपये किमतीचे गॅस काढण्यासाठी वापराच्या दोन रबरी नळ्या,एका बाजूस नटांचे नोझल,असलेले,एक हिंदुस्थान कंपनीची बिल्टी,२०० रुपये किमतीचे स्प्रिंग वजन काटा,१०० रुपये किमतीचा २३ क्रमांकाचा लोखंडी पान्हा,एक तेवढ्याच किमतीचा ११ क्रमांकाचा लोखंडी पान्हा,१०० रुपये किमतीचा एक लोखंडी पाईप,१२ रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे नाव असलेले प्लास्टिकचे १४ सील लावण्याचे बुच,०१ लाख ३८ हजार ८५० रुपये रोख यात ५००च्या २३८ नोटा,२०० दराच्या ३८ नोटा,१०० दराच्या ११० नोटा,५० दराच्या ४ नोटा,२० दराच्या ५१ नोटा,१० दराच्या ३ नोटा,२ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा विव्हो कंपनीचा एअर तेल कंपनीचे कार्ड असलेला भ्रमणध्वनी असं एकूण २७ लक्ष,९७ हजार,७१८ रुपयांचा अवैज जप्त केला आहे.घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद क्रं.६/२०२३ भा.वि.कलम ४०७, ४११,२८५,३४,लिक्विड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन व पुरवठा आणि वितरण ऑर्डर २०००चे दि.२६ एप्रिल २०००चे उल्लंघन केल्याने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये केला आहे.पुढील तपास पोलीस उपधीक्षक संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देसले हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close