गुन्हे विषयक
ट्रॅक्टर,दोन दुचाकीत विचित्र अपघात,एक ठार,दोन जखमी,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा ते धामोरी मार्गावर सांगवी भुसार फाटा,काळधोंडी नदीजवळ नुकताच दोन दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार शिवाजी पोपट मोरे वय-३५ रा.लोहशिंगवे ता.नांदगाव हा ठार तर किरण मच्छीन्द्र सोनवणे,संदीप देविदास सुपेकर हे दोघे जखमी झाले असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चालक आरोपी संदीप देविदास सुपेकर रा.मुखेड व अमोल चांगदेव चव्हाण रा.सोमठाणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
संकल्पित छायाचित्र.
सांगवी फाटा ते रवंदे रस्त्यावरुन दोन दुचाकी व टॅक्टर जात असताना काळधोंडी नदीजवळ दुचाकी (एम.एच.१५ एच.एन.६१८१) याचेवरील चालक संदीप देविदास सुपेकर रा.मुखेड याने आपल्या ताब्यातील दुचाकी हि हयगईने व जोराने,अविचाराने चालवून यामाहा या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ ए.क्यु.०००३) धडक देऊन त्यात आपला मेहुणा शिवाजी पोपट मोरे याचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी किरण मच्छीन्द्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण दि.३० डिसेंबर रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास सांगवी फाटा ते रवंदे रस्त्यावरुन जात असताना काळधोंडी नदीजवळ दुचाकी (एम.एच.१५ एच.एन.६१८१) याचेवरील चालक संदीप देविदास सुपेकर रा.मुखेड याने आपल्या ताब्यातील दुचाकी हि हयगईने व जोराने,अविचाराने चालवून आमच्या यामाहा या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ ए.क्यु.०००३) धडक देऊन त्यात आपला मेहुणा शिवाजी पोपट मोरे याचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झाला आहे.तर त्याच रोडवरुन रवंदे कडे जाणारा ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.१५ डी.यू.०१८७) चालक अमोल चांगदेव चव्हाण याने आपल्या ताब्यातील वाहन हयगईने चालवून आपल्या दुचाकीस धडक दिली आहे.त्यात संदीप देविदास सुपेकर रा.मुखेड याचे कमी-अधिक दुखापतीस कारणीभूत झाला आहे.त्या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पो.हे.कॉ.सुरेश बोटे यांनी भेट दिली आहे.
द। रम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद क्रं.५२९/२०२२ भा.वि.कलम ३०४,(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ) (ब) १७७ अन्वये केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोटे हे करीत असल्याचे वृत्त आहे.