गुन्हे विषयक
बस स्थानकातून सोन्याची चैन लंपास,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातून येवला येथे जाण्यासाठी बस मध्ये बसलेल्या शुभम संजय धाडीवाल ( वय-२६) हा किराणा व्यावसायिक रा.अंबिका चौक कोपरगाव या तरुणांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लांबवली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन्ही छायाचित्रे संकल्पित.
“आपण दि.२० डिसेंबर रोजी सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास आपले कामासाठी येवला येथे जाण्यासाठी निघून कोपरगाव बस स्थानकात आलो असताना सदर ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी ८.४० वाजता राज्य परिवहन मंडळाची बस मिळाली मात्र आपण बस मध्ये चढलो व सीटवर बसलो असता आपल्याला त्याठिकाणी आपल्या गळ्यात असलेली सोन्याची चैन आढळली नाही.तिंचा आपण सदर ठिकाणी खूप शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्या वेळी आपल्याला खात्री झाली की अज्ञात चोरट्याने तिच्यावर हात साफ केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात चोरट्यांची दहशत कमी होण्याची चिन्हे काही कमी होताना दिसत नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असून अशीच घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी कोपरगाव शहरातील तरुण शुभम धाडीवाल रा.अंबिका चौक कोपरगाव याने कोपरगाव शहरात गुन्हा दाखल केला आहे.
त्यात त्याने म्हटले आहे की,”आपण दि.२० डिसेंबर रोजी सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास आपले कामासाठी येवला येथे जाण्यासाठी निघून कोपरगाव बस स्थानकात आलो असताना सदर ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी ८.४० वाजता राज्य परिवहन मंडळाची बस मिळाली मात्र आपण बस मध्ये चढलो व सीटवर बसलो असता आपल्याला त्याठिकाणी आपल्या गळ्यात असलेली सोन्याची चैन आढळली नाही.तिंचा आपण सदर ठिकाणी खूप शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्या वेळी आपल्याला खात्री झाली की अज्ञात चोरट्याने तिच्यावर हात साफ केला आहे.त्यावरून आपली कोणातरी अज्ञात भामट्याने सुमारे ३५ हजार रुपयांची सोन्याची चैन चोरून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.त्याने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीचा गुन्ह्याची नोंद दाखल केली आहे.त्याबाबत फिर्यादीने दुजोरा दिला आहे.
दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४५४/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दिलीप तिकोणे हे करीत असल्याचे वृत्त आहे.