जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना नियमांचे पालन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

विदेशातील कोवीड-१९ संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे राहाता तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे.नागरिकांनी कोवीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे असे जाहीर आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी नुकतेच केले आहे.

“नागरिकांनी आपले हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा,आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.ताप,खोकला,सर्दी,श्वास घेण्यास त्रास,जुलाब इ.लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करून घ्यावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये”कुंदन हिरे,तहसीलदार,राहाता.

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये कोविड-१९ या प्रादुर्भाव होऊ नये.याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरताना नाक व तोंडावर मास्क लावावा,गर्दीच्या ठिकाणी (जसे लग्नसमारंभ,राजकीय,धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम इ.) जाणे टाळावे,सामाजिक अंतराचे पालन करावे,सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर ठेवावे,आपले हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा,आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.ताप,खोकला,सर्दी,श्वास घेण्यास त्रास,जुलाब इ. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करून घ्यावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये,नेहमी खोकताना,शिंकताना नाक व तोंड स्वच्छ रुमालाने,हात कोपरात दुमडून हाताने झाकून कोविड अनुरूप वर्तनाचे (C.A.B.) पालन करावे.

शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक चांगला आहे.नागरिकांनी घाबरून न जाता कोवीड अनुरूप वर्तन व सूचनांचे पालन करावे असे आवाहनही राहाता गटविकास अधिकारी जे.बी.पठारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप यांनीही केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close